फोटो सौजन्य - Social Media
Viral Video @cry__mems या सोशल मीडिया हँडलवर इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये सिंहीण तिच्या पिल्लाला पकडून तिच्या सिंहाकडे आणते. सिंहाच्या जवळ ठेवते आणि सिंह ते बघूनच चाट पडतो. कारण सिंह सावला आणि सिंहीणपण सावली मग हा पिल्लू इतका गोरा कसा? पिल्लाचा रंग बघून सिंहाच्या तोंडावरचा रंग उडतो आणि तो गोंधळत मागे उभा असणाऱ्या त्याच्या मित्राकडे पाहतो. कारण त्याचा सिंह मित्राचा रंग त्या पिल्लासारखाच असतो. कदाचित सिंहाला वाटत असावे की हे बेणं नक्कीच माझ्या मित्राचं आहे. त्यामुळे रंगाच्या भरात तो त्याच्या मित्रावर आक्रमण करतो. दोघांची भांडण होतात.
ही Viral Video पाहून नेटकऱ्यांचे अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांचे म्हणणे आहे की ही Video AI पासून निर्मित केलेली आहे. जे काही अंशा बरोबरही आहे. पोस्टखाली आलेले कमेंट्स पाहिले तर अनेकांनी या प्रसंगाला क्युट म्हंटले आहे तर काही जणांनी सिंहीण आणि सिंहाच्या त्या मित्राच्या नात्याला अनैतिक संबंध म्हंटले आहे.
सिंहाची प्रतिक्रिया पाहून अनेक नेटकरी तो आपल्या हक्कासाठी त्याच्या मित्राशी लढा देत असल्याचे म्हणत आहेत तर काही जण म्हणत आहेत की माणसांमध्ये धोका होतो ते माहिती होत पण प्राण्यांमध्ये धोका पहिल्यांदा पाहत आहोत.






