मराठमोळ्या रोहित शर्माचा 'बिहारी' अंदाज; Video पाहून हसू आवरणार नाही (Photo Credit - X)
बिहारी अंदाजात झाली मित्राची ओळख
नेमके झाले असे की, रोहित शर्मा एअरपोर्टवर सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत चालत होता. समोरून त्याला रिसिव्ह करण्यासाठी माजी क्रिकेटपटू शहाबाज नदीम आले, पण सुरक्षा रक्षकांनी नदीमला अडवण्यास सुरुवात केली. नदीमला पाहताच रोहित शर्मा बिहारी अंदाजात बोलला. त्याने विनोदी स्वरात म्हटले, “अरे भाई ई तो हमरा दोस्त है (अरे भाऊ, हा तर माझा मित्र आहे).” रोहितचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे आणि चाहत्यांना त्याचा हा ‘कॅप्टन कूल’ अंदाज चांगलाच आवडला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना रांचीमध्येच होणार आहे, त्यासाठी रोहित शर्मा शहरात दाखल झाला आहे.
Rohit Sharma talking in Bihari accent after meeting Sehwaz Nadeem.😹
pic.twitter.com/JbrOHAbckk — Gems of Cricket (@GemsOfCrickets) November 27, 2025
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहितचा दमदार रेकॉर्ड
रोहित शर्माचा वनडे क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रेकॉर्ड नेहमीच दमदार राहिला आहे. हिटमॅनने प्रोटियाज संघाविरुद्ध आतापर्यंत एकूण २६ वनडे सामने खेळले आहेत. या दरम्यान खेळलेल्या २५ डावांमध्ये रोहितने ३३ च्या सरासरीने ८०६ धावा ठोकल्या आहेत. त्याच्या नावावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन शतके आणि दोन अर्धशतके नोंद आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत रोहितची स्फोटक फलंदाजी
यापूर्वी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही रोहितने जबरदस्त फलंदाजी केली होती. त्याने ३ सामन्यांत १०१ च्या सरासरीने २०२ धावा केल्या होत्या, ज्यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश होता. तिसऱ्या वनडेत रोहितने १२१ धावांची अविस्मरणीय खेळी केली होती. आता रोहित शर्माकडून आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतही दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.






