फोटो सौजन्य - Social Media
या रिक्षाला चालवणारा कुणी नसून ही रिक्षा भरधाव वेगात रस्ता न सोडता समोरच्या दिशेने पळत आहे. बघणाऱ्याच्या अतिशय अंगातून घाम काढणारे आणि डोक्याचा फ्युज उडवून टाकणारे हे क्षण @mr_fejan__khan__ या सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा थरकाप उडाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी तर चक्क कमेंट्समध्ये डायलॉगबाजीच सुरु केली आहे.
एका नेटकाऱ्याने लिहले आहे की ‘Bhoot banne se ghar nahi chalta’. तर दुसऱ्याचे म्हणणे आहे की ‘Tarzan tha wonder reksha’. असे अनेक कमेंट्स आणि प्रतिक्रिया पोस्टखाली पाहायला मिळत आहे. आता यात काही भुताटकीच्या संबंध आहे की काही विज्ञान? याचे उत्तर तर आमच्याकडे नाही. याचे उत्तर कदाचित त्याच्याकडेच असेल जो या क्षणांचा साक्षी झाला आहे. पण हे क्षण पाहणाऱ्याच्या अंगात थरार आणणारे आहे. कारण एखादी गाडी आपल्यासमोरून धावत येत आहे.
आपल्याला हॉर्नही देत आहे पण जेव्हा आपण त्या गाडीच्या आत झाकून पाहतो तर त्या गाडीच्या पुढच्या बाजूलाही कुणी नसतं आणि मागच्या बाजूलाही! असं जर घडलं तर आपल्या काय भावना असतील? आपल्या काय प्रतिक्रिया असतील? याचा विचार करा, जेणेकरून याही क्षणांचा थरार किमान विचारातून तरी अनुभवायला मिळेल.






