मगरींच्या जाळ्यात अडकला छावा, इतक्यात गरुड आला अन् घडला चमत्कार; व्हिडिओ पाहून लोक हैराण, म्हणाले... (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये प्राण्यांचे देखील हैराण करवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका ताकदवर प्राण्याला देखील त्याच्या शत्रूच्या मदतीची गरज भासली आहे.
असे म्हणतात जंगालाचा राजा सिंहासमोर कोणीही टिकू शकत नाही. त्याचे नाव ऐकले तरी भल्या भल्यांचा थरकाप उडतो. पण कोणी कितीही मोठा शिकारी असला तरी त्याला दुसऱ्याच्या मदतीची गरज भासतेच. केवळी ताकदवान असून आपण मोठे होत नाही. याचेच उदाहरण पाहायला मिळाले आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील हैराण व्हायरल. तसेच तर हा व्हिडिओ खरा वाटत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. पण हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सिंहाचा छावा पाण्याच्या मध्यभागी अडकलेला दिसत आहे. त्याच्या चारी बाजूने मगरींनी त्याला घेरलेले आहे. याच ठिकाणी एक सिंह देखील नदीच्या काठावर उभा आहे. परंतु मगरींच्या तावडीत सापडलेल्या आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी तो असाहाय्य झाला आहे. मगरी हळूहळू सिंहाच्या पिल्लावर हल्ला करण्यासाठी जात असतात. पण इतक्यात असे काही घडते की,ज्याची सिंहाने देखील कल्पना केली नसेल. याच वेळी एक गरुड अचानक उडत येते आणि सिंहाच्या छावाला पंजात उचलून उडतो. यानंतर त्याला सिंहापशी किनाऱ्यावर सोडतो. यामुळे सिंहाच्या पिल्लाचा जीव वाचतो.
“मी मरेपर्यंत मराठी बोलणार नाही…”, गणपती विसर्जनदरम्यान हिंदी मराठी भाषेवरून हाणामारी
व्हायरल व्हिडिओ
जब संकट गहरा हो जाए तो राजाओं को भी सहारे की ज़रूरत पड़ती है,
आसमान के राजा ने ज़मीन के शेर को बचाकर यही साबित किया। 🦅🦁 pic.twitter.com/T9ckea0ieW— Shagufta khan (@Digital_khan01) August 30, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Digital_khan01 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देताना हा एआय व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे.
कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, जेव्हा संकट अधिक गडद असते, तेव्हा राजालाही मदतीची आवश्यकता असते. गरुडाने सिंहाच्या छावाला वाचवून त्याने हे सिद्ध केले. एका युजरने म्हटले आहे की, संकटाच्या काळात मानव नाही, तर फक्त तारणहारच आधार बनतात.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.