फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. काही लोक फेमस होण्यासाठी असे काही करतात ज्यामुळे त्यांचा जीवही जाऊ शकतो. तसेच ते इतरांचाही जीव धोक्यात घालतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने स्वतासोबत इतरांचाही जीव धोक्यात घातला आहे. एकीकडे काही लोक अतिशय लहान लहान किटकांना देखील घाबरतात. पण या व्यक्तीने जे केले आहे त्याची याला कसलीच भीती वाटत नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एक व्यक्ती गळ्यात अजगर घेऊन मेट्रोच चढला आहे. त्याच्यामुळे इतर प्रवाशांची घाबरगुंडी उडाली आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये धावणाऱ्या सबवे ट्रेनचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत एक व्यक्ती बसलेली आहे. या माणसाने दोन अजगर गळ्यात घेऊन आत शिरला आणि सीटवर बसला. त्याच्या गळ्यात अजगर गुंडाळला आहे. त्या सापांना पाहून आजूबाजूचे अनेक लोक घाबरले, पण ती व्यक्ती न घाबरता त्यांच्यासोबत बसली आहे. त्याच्या हातात साप आहे. पण एक स्त्री त्या सापांना घाबरलेली दिसत आहे. तिचा चेहरा बघून अंदाज लावता येतो की, भीतीने तिचा घसा कोरडा होत आहे. मात्र, त्या माणसाला याची काहीही भिती नाही.
हा व्हिडिओ @braziltouroperator) नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘हे दृश्य फक्त न्यूयॉर्क सिटीमध्ये दिसेल: सबवेच्या आत सापाचा सामना करा.’ एवढेच नाही तर व्हिडिओच्या वर लिहिले आहे की सापाची अनपेक्षित भेट, आश्चर्यकारक गोष्टी प्रत्येक वेळी दिसतात. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर होताच प्रचंड व्हायरल झाला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हजारो लोकांनी लाईक आणि शेअर केले आहेत. त्याचबरोबर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.
व्हायरल व्हिडीओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
एका युजरने लिहिले की, ‘शहरात येऊन असे करणारे हे लोक खरे तर न्यूयॉर्कचे नाहीत. आम्ही कामावर किंवा घरी जाण्याच्या प्रयत्नात खूप व्यस्त असतो.’ आणखी एका युजरने कमेंट केली आहे की ‘अरे देवा! गाडीच्या पलीकडच्या बाजूला बसू शकत नाही, ज्याच्याजवळ साप होता त्याच्या शेजारी बसू दे!’ तिसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘महिला खूप घाबरलेली दिसत आहे, तिच्या घशाला कोरड पडल्यासारखे वाटत आहे.’ मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्टेशन अथॉरिटी अशा प्रकारच्या वर्तनास परवानगी का देत आहे? असा प्रश्न एकाने केला आहे.