Dussehra Jokes : अरे जरा हस की भावा...! रावणाचं दहन होत असताना त्याने लांबूनच सर्व दृश्ये पाहिली आणि म्हणाला, "अरे हरामखोरांनो, मी काय तुमच्या बायकोला.... " अहो वाचाल तर हसू आवरणंही कठीण होईल बघा.
अप्सरा रावणाला म्हणाली – तु माझ्याशी लग्न करशील का?
रावण म्हणाला – हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा
अप्सरा – यात हसण्याची काय गोष्ट आहे, नाही करायचं तर सरळ बोल ना, मी चालले…
रावण (अप्सरा निघून गेल्यानंतर) – अरे नालायकांनो, पुढच्या वेळेपासून फक्त मधलं डोकंच ‘हा’ बोलेल…
तुम्ही कधी विचार केला आहे का की औषधांच्या पॅकेटमध्ये नेहमी १० गोळ्या का असतात
कारण रावणाला जेव्हा डोकेदुखी होत होती तेव्हा त्याने या प्रथेची सुरुवात केली होती
रावणKBC खेळण्यासाठी गेला
अमिताभ बच्चन – तुमच्याकडे ४ लाइफलाइन्स आहेत
रावण – अरे म्हणजे, म्हणजे त्या १४ लाइफलाइन्स झाल्या
या नवरात्रीत ज्या पद्धतीने पाऊस पडत आहे,
मला खात्री वाटते की, यावर्षी दसऱ्याला रावण जळून नाही डुबून मारणार…
हवालदार – साहेब, दसऱ्याच्या दिवशी, सर्व कैद्यांनी तुरुंगात रामायण सादर केले…
जेलर – ही चांगली गोष्ट आहे, तुम्हाला त्याची इतकी काळजी का वाटत आहे मग?
हवालदार – साहेब, समस्या अशी आहे की हनुमानाची भूमिका एका कैद्याने केली होती जो अजून संजीवनी बुटी घेऊन परतला नाही… (हवालदार खातोय मार आता)
रावणाला न्यायालयात गीतेवर हात ठेवण्यास सांगण्यात आले…
त्याने कोणताही विचार न करता थेट नकार दिला…
आणि म्हणाला, “सीतेवर हात ठेवून एवढ्या अडचणीत आलोय! आता परत गीता नको…
जळत्या रावणाने गर्दीला विचारले,
अरे हरामखोरांनो! मी काय तुमच्या पत्नीचे अपहरण केले होते का, की दरवर्षी तुम्ही तोंड उचलून मला जाळायला येता…
गर्दीतील एक माणूस म्हणाला, “तुम्ही तिचे अपहरण केले नाही ना म्हणूनच आम्ही तुम्हाला जाळत आहोत.”
अमन (चमनला) – रावण एके दिवशी डिस्कोमध्ये गेला तेव्हा काय झाले माहित आहे का?
चमन – अरे… अरे, काय झाले… मला लवकर सांग…!
अमन – रावण बेशुद्ध पडला कारण बाहेर लिहिले होते, “प्रति व्यक्ती प्रवेश २५०० रुपये.”
रावणाला जाळताच लोक अशाप्रकारे धावतात
जणू त्याच्या मर्डरची केस त्यांच्यावरच उलटणार आहे
चिंटू – दसऱ्याच्या तुला शुभेच्छा मिंटू
मिंटू – अरे सकाळपासून मला दसऱ्याच्या इतक्या शुभेच्छा मिळाल्या आहेत जणू रावणाला मीच मारलं आहे…
Web Title: Panchat jokes funny dussehra jokes in marathi once in a day apsara proposed to ravan he want to say yes but his 10 head make all the confusion