सासू : सुनबाई टिकली लाव.
सून : जीन्स वर टिकली नाही लावत कोणी.
सासू : अग भवाने, जीन्स वर नाही मी कपाळावर टिकली लावायला सांगत आहे
नवी नवरी सासूच्या पाया पडते.
सासू : सुखी रहा
सून : तुम्ही राहू देणार का?
सासू : सुनबाई हात मोकळे चांगलं नाही वाटत
सून : मोबाइल चार्जिंगला लावला आहे
आई: अग भवाने मी बांगड्या बद्दल विचारते आहे
सासू : प्लेट इतकी स्वछ करायला हवी की त्यात चेहरा कसा आरशासारखा चमकला पाहिजे
सून : हो का, मग उद्यापासून आरशावरच जेवत जा
एका सासूने नवविवाहित सुनेला विचारलं: सुनबाई, समजा तू बेडवर बसली आहेस आणि मीही येऊन त्यावर बसले तर तू काय करणार?
सून : सासूबाई, मग मी उठून सोफ्यावर जाऊन बसेन.
सासू : मग पण येऊन सोफ्यावर बसले तर काय करशील?
सून : तर मी चटई घेऊन जमिनीवर बसेन.
सासू : मी पण चटईवर आले तर काय करशील ?
सून : मग मी जमिनीवर बसेन.
सासू (मस्तीत पुढे म्हणते): आणि मी पण तुझ्या शेजारी जमिनीवर बसले तर काय करशील?
सून (चिडून): मग मी जमिनीत खड्डा खणून त्यात बसेन.
सासू : बरं मी पण खड्ड्यात येऊन बसले तर?
सून : मग मी वर माती टाकून किस्साच संपवून टाकेल
भावी सासू : तुझं मराठी ऐकल्यावरच मी ठरवेन की तू माझी सून होण्याच्या लायकीची आहेस की नाही! तुझं शिक्षण किती?
मुलगी : नेत्र नेत्र चहा
भावी सासू : म्हणजे काय?
मुलगी : आयआयटी
सासू अजून कोमात…
एक खवट सासू तिच्या सुनेला म्हणते, अगं ए बाई… हे काय बनवला आहेस? जेवण आहे की शेण
सून पण तितकीच फाटक्या तोंडाची असते. ती लगेच म्हणते, अरे देवा ! या बाईने सगळंच चाखलेले दिसतेय…
Web Title: Panchat jokes todays segment daughter in law and mother in law these jokes will definitely makes you laugh