फोटो सौजन्य: रेडिट अकाऊंट Your_Friendly_Panda
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा अशा गोष्टी सोशल मीडियावर पाहायला मिळतात ज्यामुळे आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे आपण पुन्हा पुन्हा पाहिल्याशिवाय राहत नाही. आत्तापर्यंत तुम्ही डान्स, भांडण, स्टंट जुगाड यांसारखे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. पण सध्या एक वेगळीच पोस्ट व्हायरल होत आहे. एका कॅब चालकाची ही पोस्ट असून त्याने ग्राहकांसाठी बनवलेली नियमांची लिस्ट व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेली ही लिस्ट पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही लोकांनी या नियमांना अन्याकारक म्हटले आहे तर काहींनी या कॅबवाल्याचे कौतुक केले आहे. ड्रायव्हरने हे नियम प्रवाशांच्या सीटसमोर लावले आहेत. हे नियम वाचून तुम्ही देखील हैराण व्हाल. सध्या ही लिस्ट सोशल मीडियवर चर्चेचा विषय बनली आहे. मात्र हा कॅब ड्रायव्हर कुठे आहे हे अद्याप कळालेले नाही.
व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कॅब ड्रायव्हरने मागच्या सीटसमोर काही नियम लावले आहेत. यामध्ये नियम तुम्ही कॅबचे मालक नाही तर चालवणारा मालक आहे. तसेच बोलताना आदराने बोलायचे, याशिवाय दार लावताना हळू लावायचे आपटायचे नाही. हे नियम दिले आहेत. तसेच त्याने असेही म्हटले आहे की, तुमचा ॲटीट्यूड तुमच्या खिशात ठेवा, मला दाखवू नका तुम्ही जास्त पैसे देत नाही. तसेच मला भैया म्हणू नका असेही त्याने म्हटले आहे. तसेच गाडी जोरात चालवा लवकर पोहचा असेही म्हणायचे नाही असे नियम या लिसटमध्ये आहेत.
व्हायरल पोस्ट
I have booked a cab and the cab driver mentioned some guidelines on the cab! What do you about these guidelines?
byu/Your_Friendly_Panda inCarsIndia
नेटकरी हैराण
व्हायरल असलेली ही पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर Your_Friendly_Panda या अकाऊंटवर व्हायरल होत आहे. ही लिस्ट एका कॅबच्या ग्राहकाने शेअर केली आहे. ही लिस्ट पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. एका युजरने या पोस्टवर कमेंट केली आहे की, भाऊ तुमचे बरोबर आहे, तर दुसऱ्या एका युजरने म्हणले आहे की, हा ग्राहकांवर अन्याय आहे. तसेच आणखी एका युजरने म्हटले आहे की, भाऊ पहिला तुमचा ॲटीट्यूड कमी करा, ग्राहक हा देव असतो, तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, त्याच्या कॅबमध्ये आता कोणीही बसणार नाही. या पोस्टला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे.