फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात जे पाहून आश्चर्य वाटते की, खरच असे घडू शकते का? तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहून हसू आवरता येत नाही. डान्स, भांडण, स्टंट, जुगाड याशिवाय खाण्याच्या व्हिडिओ देखील तुम्ही पाहिल्या असतील. अलीकडे जसे विज्ञानामुळे तंत्रज्ञानात बदल झालेला आहे तसेच जेवण बनवण्याच्या गोष्टींमध्ये देखील बदल झाले आहेत. हे म्हणायला हरकत नाही. कारण लोक असे असे प्रयोग करताना दिसत आहेत की पाहून किळसवाणे वाटत आहे.
तुम्ही फूड फ्युजनचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. जिथे काही लोक फूड फ्युजनच्या नावाखाली विचित्र प्रयोग करताना दिसतात. सध्या असाच एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मोमो विक्रेता फ्रूट मोमो बनवताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मोमो विक्रेत्याने फळे टाकून मोमोज बनवलेले आहेत. यामुळे व्हिडिओ पाहून नेटकरी संतापलेले आहेत.
फ्रूट मोमोज
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर एक विक्रेता फळांनी भरलेल्या मोमोजची विचित्र डिश तयार करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक हैराण झाले आहेत. या मोमो विक्रेत्याने केळी, सफरचंद आणि पेरू टाकून मोमोज बनवले आहेत. त्याने या फळांचे बारिक तुकडे केले आणि मग त्यात त्यांने मेवनीज, आणि आणखी काही मसाले टाकले आहेत. आमि त्यामध्ये दुसरे मोमोज टाकून ग्राहकाला सर्व्ह केल आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी विक्रेत्यावर संतापले आहेत. विशेषत: मोमो लव्हर्सला खूप राग आला आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर @realfoodler या अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रीया दिल्या आहेत. अनेकांनी विक्रेत्याच्या या रेसिपीला हास्यास्पद म्हटले आहे तर अनेकांनी त्या विक्रेत्यावर कारवाई केली जावी असे म्हटले आहे. एका यूजरने म्हटले आहे की, ‘भाऊ, तुम्ही यात गन पावडर टाकायला विसरलात.’ तर दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, ‘येथे मोमोच्या शक्तींचा गैरवापर केला जात आहे.’ आणखी एका युजरने म्हटले आहे की, मी तर हे पाहूनच मेलो खाणाऱ्यांचे तर काय होत असेल, चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, फ्यूजनच्या नावाखाली लोक काहीही बनवू लागले आहेत.