ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक( rishi sunak) हे त्यांची भारतीय परंपरा कधीही विसरत नाही हे त्यांच्या अनेक कृतींमुळे दिसून आलं आहे. नारायण मूर्ती यांचे जावई ही त्यांची ओळख जरी असली तरी, त्यांनी ब्रिटनमध्ये आपला ठसा उमटवला आहे.
ऋषी सुनक यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमधला एक व्हिडिओ शेअर केला आहे. या मुलाखतीत ऋषी सुनक यांनी अनेक मुद्द्यांवर आपलं मत मांडलं आहे. त्यावेळी त्यांनी त्यांच्या आईने बनवलेली भारतीय मिठाई अर्थात बर्फी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.
“झेलेन्स्कीनी ऋषी सुनक यांच्या आईने बनवलेली बर्फी टेस्ट केली असं काही रोज घडत नाही”, अशी पोस्ट त्यांनी या व्हिडीओबरोबर इन्स्टाग्रामवर केली आहे. या व्हिडीओमध्ये ऋषी सुनक यांनी त्यांच्या आईनं त्यांना स्वत: बनवलेली बर्फी दिल्याचं सांगितलं.
“माझी आई जेव्हा मला एका फुटबॉल सामन्यादरम्यान भेटली, तेव्हा तिने स्वत: तयार केलेली भारतीय मिठाई, माझ्यासाठी दिली. त्यानंतर मी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतली. आम्ही दोघं जेव्हा बोलत होतो, तेव्हा त्यांना मी ती बर्फी दिली. त्यांनीही ती चवीनं खाल्ली. माझ्या आईला हे ऐकून खूप आनंद झाला”, असं सुनक म्हणाले.
ऋषी सुनक हे त्यांच्या अशा व्हिडीओंमुळे किंवा फोटोंमुळे चर्चेत असतात. त्यांना क्रिकेट खूप आवडत त्यासंदर्भातला एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. ते प्रत्येक क्षणाचा आनंद घेताना दिसतात.
I’ll always love cricket…
But I could get into this ?⚾️ pic.twitter.com/AUkXjwUVrB
— Rishi Sunak (@RishiSunak) June 8, 2023
I’m working hard to deliver on your priorities and build a better future for our children and grandchildren.
Let’s run through another week of delivery? pic.twitter.com/n065buAVsV
— Rishi Sunak (@RishiSunak) June 2, 2023
नुकताच त्यांचा बुलेटप्रूफ जॅकेट घालून रस्त्यावर सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा करतानाचा फोटो व्हायरल झाला होता.
लंडनमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या स्थलांतरितांना अटक करण्याची मोहीम ब्रिटन सरकारनं सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘डे ऑफ अॅक्शन’ या कृती कार्यक्रमात सुनक स्वत: सहभागी झाले होते.