सोशल मीडियावर येत्या काळात अपघातांचे अनेक व्हिडिओज व्हायरल झाले. यातील दृश्ये नेहमीच फार थरारक असतात. हे अपघात अधिकतर लोकांच्या शुल्लक चुकांमुळे घडून येतात. गाडी चालवताना आपल्या जीवाची, तसेच दुसऱ्याच्या जीवाची काळजी घेणे फार गरजेचे असते, असे न केल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. तसेच बऱ्याचदा लोक नको तिथे घाई करू पाहतात आणि मग ही घाई त्यांना चांगलीच महागात पडते. असेच काहीसे सध्याच्या व्हायरल व्हिडिओत घडताना दिसून आले आहे. व्हिडिओतील दृश्ये पाहून कपाळाला हाथ लावल्याशिवाय राहणार नाहीत.
‘ अति घाई संकटात नेई’ ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. सध्या याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात व्यक्तीला आपली घाई जरा जास्तीच महागात पडल्याचे दिसून आले. मुळातच घडले असे की, रेल्वे फाटकाजवळ काही चालक रेल्वे जाण्याची वाट पाहत होते. यावेळी एक दुचाकीस्वार अतिघाई करतो आणि रेल्वे ट्रकवर आपली गाडी घेऊन जातो आणि मग काय, शेवटी नको तेच घडते आणि ही चूक त्याला जन्मभराची अद्दल घडवून जाते. काय आहे व्हिडिओत? चला जाणून घेउयात.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, रेल्वे फाटकाजवळ गेटवर गर्दी जमलेली दिसते. लोक ट्रेन जाण्याची वाट पाहत आहेत. काही लोक सायकलवर होते, काही बाईकवर होते आणि बरेच लोक पायीही उभे होते. सगळ्यांच्या नजरा ट्रेनच्या पासिंगकडे लागल्या होत्या. फाटकाच्या दोन्ही बाजूला लोक उभे होते. यावेळी अचानक दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने घाई करायला सुरुवात केली. या घाईच्या नादात तो विचार न करता घाईघाईने गेटच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो. त्याला खूप लवकर कुठेतरी जायचे आहे असे दिसते. त्याने आणखी एक पाऊल टाकताच दुसऱ्या ट्रॅकवर भरवेगात ट्रेनही येऊ लागते. यावेळी तो आपल्याला बाइकला येथून खेचून मागे करण्याचा प्रयत्न करतो मात्र असे करणे त्याला शक्य होत नाही आणि ट्रेन आल्याचे पाहून तो बाइक सोडून स्वतः मागे जातो. पुढच्याच क्षणी ट्रेन येते आणि त्याच्या बाइकचा अक्षरशः चुराडा करून निघून जाते.
View this post on Instagram
A post shared by (☞^o^) ☞ jatwa sakar (☞^o^) ☞ (@x._pulkit_007)
या घटनेत व्यक्तीचे मोठे नुकसान होते. हा व्हायरल व्हिडिओ @x._pulkit_007 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “नशीब यात त्याचे प्राण वाचले” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप छान झाले, अशा मूर्खांसोबत असेच व्हायला हवे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.