(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं. व्हायरल होण्यासाठी लोक वाटेल त्या थराला जाऊ पाहतात. याचे बरेच व्हिडिओज आपण सोशल मीडियावर पाहतो. तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्ही असे काही व्हिडिओज नक्कीच पाहिले असतील. यात कधी विचित्र जुगाड दाखवले जातात तर जधी जीवघेणे स्टंट्स. सध्या असाच एक व्हिडिओ इथे व्हायरल झाला आहे, ज्यात एक तरुणी चक्क विजेच्या खांब्यावर चढून रील बनवत आहे. व्हिडिओतील दृश्ये तुम्हाला अचंबित केल्याशिवाय राहणार नाहीत.
इंस्टाग्राम रील या दिवसेंदिवस लोकांमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. यात लोक एक शॉर्ट व्हिडीओ तयार करून शेअर करतात. सध्या याची क्रेझ फारच वाढली आहे. मात्र काही लोक इथे व्हायरल होण्यासाठी नको त्या गोष्टीही करू पाहतात. या गोष्टी अनेकदा जीवास हानिकारक आणि धोकादायक ठरू शकतात. कित्येक लोक आपला जीव धोक्यात टाकून या रिल्स बनवतात. नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्येही असेच काहीसे घडल्याचे दिसून आले आहे. यात एक तरुणी आपला जीव धोक्यात घालून रील तयार करताना दिसून येत आहे. व्हिडिओत नक्की काय घडले? चला जाणून घेऊयात.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही नीट पाहिले तर यात दिसते की, एक मोठा विजेचा खांब आहे. या खांबावर एक तरुणीगुलाबी रंगाचा ड्रेस परिधान करून चक्क या विजेच्या खांब्यावरच उभी आहे. पुढे ती या विजेच्या खांब्यावर उभी राहून डान्स करताना दिसून येते. “दिल देख रहा रस्ता अब दिलदार का” या गाण्यावर ही तरुणी डान्स करत आहे. आता यातील आश्चर्याची बाब म्हणजे, दत्त एका शुल्लक रीलसाठी ही तरुणी आपला जीव धोक्यात घालते. यावेळी तिच्या जीवाचे काही बरेवाईट होण्याची शक्यता होती. तरुणीचा हा सर्व प्रकार पाहून आता सोशल मीडियावर युजर्सद्वारे तिच्यावर टीका करण्यात येत आहे.
नशीबच फुटकं त्याला काय करणार! तरुणींची मदत करायला गेला अन् होत्याच नव्हतं करून बसला, Video Viral
तरुणीचा हा व्हिडिओ @maheshpatel8819 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ बऱ्याच लोकांनी पाहिला असून अनेकांनी यावर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या. एका युजरने लिहिले आहे, “यमराज आता अशा मूर्खांचा मार्ग पाहत आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कधी कधी असं वाटतं की आपण इंग्रजांपासून नाही तर इंग्रज आपल्यापासून मुक्त झालो होतो”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.