Viral news : जोडप्याने ८० वर्ष जुनं घरं खरेदी केलं अन् घडलं भयंकर ; घराच्या बाथरुममध्ये सापडली कवटी, जाणून घ्या काय आहे प्रकरण? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज काही ना काही विचित्र गोष्टी पाहायला मिळत असतात. कधी मजेशीर, तर कधी अंगाचा थरकाप उडवणारे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही अनेक हॉरर चित्रपट बघितले असतील. पण अनेकदा जेव्हा एखाद्या खऱ्या आयुष्यात अशी घटना घडली असल्याचे ऐकले किंवा अनुभवले असेल तर भल्या भल्यांचाही थरकाप उडतो. सध्या एका जोडप्यासोबत असेच काही घडलं आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, एका प्रेमी जोडप्याने एक ८० वर्षे जुने घर खरेदी केले होते. या घरात त्यांना असे काही सापडले आहे की त्यांचा थरकाप उडाला आहे. यादृश्याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
व्हायरल व्हिडिओ दिलेल्या माहितीनुसार, कॅनडाच्या विनिपेग येथे ही घटना घडली आहे. एका जोडप्याने १९४० मध्ये बांधलेला बंगला खरेदी केल्या होता. बंगला खरेदी केल्यानंतर त्यांना तिथे राहण्याची खूप उत्सुकता होती. सर्व का अस्थेटिक असेल असा त्यांचा समज. तसेच त्यांनी घराचे रिनोवेशनही करण्याचे ठरवले होते. पण रिनोवेशनच्या वेळी त्यांना घरात एक आश्चर्यकारक गोष्ट सापडली. या जोडप्याला खरेदी केलेल्या या जुन्या घराच्या बाथरुममध्ये एक कवटी भितींमध्ये गाडलेली दिसली.
नेमकं काय आहे हे पाहण्यासाठी त्यांनी भिंत फोडली तेव्हा जोडप्याचा थरकाप उडाला होता. त्यांच्यासमोर एक मानवी सापळा होता. यासोबत एक चिठ्ठी देखील ठेवण्यात आली होती. ती चिठ्ठी उचलताना त्यांचे हात थरथर कापत होते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही या संपूर्ण दृश्य पाहू शकता. तुम्ही पाहू शकता की, या सापळ्याला मानवाप्रमाणे कपडे घातलेले आहेत. तसेच त्यांच्या शर्टच्या खिशात एका चिठ्ठी देखील ठेवलेली आहे. जेव्हा जोडपे ती चिठ्ठी काढून वाचते तेव्हा….
त्यात लिहिले होते – हा, हा, हा, मी तुम्हाला घाबरवले ना? जेसन लेन २०१३. हे वाचून तुम्हाला हसू फुटले ना. जोडप्यालाही हसू आवरणे कठीण झाले होते. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर संपूर्ण सोशल मीडियावर भितीचे आणि हास्यचे वातावरण आहे. सुरुवातील सर्वांचा थरकाप उडाला आहे, पण शेवटी सगळेजण खळखळून हसले आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @memezar या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.
अति घाई संकटात नेई! भरधाव गाडीचे नियंत्रण सुटले अन् तरुणी थेट हवेत उडाली, भयावह Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.