(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मिडियावर सध्या एक रंजक आणि तितकाच मजेदार असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एका छोट्या प्राण्याने भल्यामोठ्या हत्तीशी पंगा घेतल्याचे दृश्य दिसून आले. हा चिमुकला प्राणी म्हणजे हनी बॅजर जे दिसायला सहसा खूप लहान असतात, पण त्यांचा हिम्मत मात्र फार मोठी असते. व्हिडिओमध्ये आपल्या हिमतीच्याच जोरावर हा प्राणी हत्तीला आवाहन देत असल्याचे दिसून आले. मग हत्तीने असे काहीतरी करुन दाखवले की छोट्या प्राण्याला दिवसाच रात्रीचे तारे दिसले. चला यात नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
माहितीनुसार, ही घटना ह्वांगेच्या साबाले व्हॅली परिसरात घडून आली. अमलिंडा सफारी कलेक्शनने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “या दृश्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटते की जंगलाचा खरा राजा कोण आहे.”व्हिडिओमध्ये हत्ती पाण्याजवळ उभा असल्याचे दाखवले आहे जेव्हा एक बॅजर त्याच्या दिशेने धावत येतो. हत्ती जागेवरच राहतो, परंतु बॅजर पुढे जात राहतो आणि अखेर हत्तीवर हल्ला करून त्याला चावण्याचा प्रयत्न करतो. या कृतीमुळे संतप्त झालेला हत्ती त्याच्या पायाने बॅजरला उडवून लावतो. हत्ती गर्जना करतो आणि त्याच्या खूराने हनी बॅजर चिरडतो. जवळ उभे असलेले काही ब्रिटिश पर्यटक हे दृश्य पाहून हसतात.
अति घाई संकटात नेई! भरधाव गाडीचे नियंत्रण सुटले अन् तरुणी थेट हवेत उडाली, भयावह Video Viral
या मजेदार घटनेचा व्हिडिओ @amalindasafaricollection नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ती लास्ट किक मजेदार होती” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हनी बॅजरला काही फरक पडत नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो शेवटचा शॉट पेनल्टी होता.. गोल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.