मोबाईल फोनने आपल्या जीवनात अढळ स्थान निर्माण केले आहे. अनेकांना या फोनशिवाय जगणे अवघड वाटत आहे. दिवसभरात कोणतेही काम करताना सतत आपण आपला फोन आपल्यासोबत बाळगत असतो. आपल्यासोबतच हा फोन जमिनीवर, बेडवर, खिशात, टेबलवर आपण ठेवतो. अशा परिस्थितीत, तुम्ही कधी विचार केला आहे का की, तुमच्या हातातील फोनवर किती बॅक्टेरिया असतील?
तुम्ही तुमचे शरीर, हात, घर, परिसर अशा सर्व गोष्टींच्या स्वच्छतेची खूप काळजी घेता, परंतु आपले आपल्या फोनकडे दुर्लक्ष होते. आपला फोन ही अतिशय अस्वच्छ वस्तू आहे. एका अभ्यासानुसार, टॉयलेट सीटच्या तुलनेत फोनवर 10 पट जास्त बॅक्टेरिया असतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, कोरोनाच्या काळात लोकांनी वरचेवर हात धुण्याचा आणि स्वच्छतेचा धडा घेतला.
जिवाणू हातावर राहू नयेत म्हणून आपण नेहमी आपले हात सॅनिटायझ करतो. परंतु जी गोष्ट आपल्या हातावरील जंतू आणि जीवाणू संपुष्टात येऊ देत नाही ती म्हणजे आपला मोबाईल. एका अभ्यासानुसार, किशोरवयीन मुलांच्या मोबाईलवर किमान 17 हजार बॅक्टेरिया असतात, जे सामान्य टॉयलेट सीटपेक्षा 10 पट जास्त असतात. आपण आपल्या फोनला हजारो वेळा स्पर्श करतो आणि नंतर तोच हात आपल्या तोंडावर ठेवतो. या प्रकरणात, विविध संसर्गाचा धोका कायम राहतो. यामुळे मोबाईल फोनचा कशाप्रकारे हताळायचा यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे?