रिलसाठी भलताच प्रताप! वॉकी-टॉकी घेऊन धावत्या ट्रेनच्या छतावर चढला अन्... नेमकं काय केलं तरुणाने? VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन वाऱ्याच्या वेगाने धावत आहे. या ट्रेनच्या छतावर एक व्यक्ती डोक्याला गमछा बांधून हातात वॉकी-टॉकी घेऊन उभा आहे. जणू तो एक रेल्वे कर्मचारी आहे. ट्रेन वेगाने धावत असून त्याच्या आसपास असलेल्या विजेच्या तारा तरुणाच्या डोक्याला लागत आहेत. परंतु तरुणाला याची जराही भीती नाही. या तरुणासोबत एक व्यक्ती असून याचा व्हिडिओ बनवत आहे. यामुळे हा स्टंट नेमका रीलसाठी करण्यात आला की खरेच तो एक कर्मचारी आहे अशा चर्चांणा सोशल मीडियावर उधाण आहे.
रेलवे ओर रील दोनों से पैसा कमाना चाहता है भाई, इतना जोखिम भी ठीक नहीं pic.twitter.com/1DVBT4gQkF — RAJENDRA (@Razanagnostic) June 28, 2026
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Razanagnostic या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये रेल्वे आणि रिल अशा दोन्हीकडून पैसा कमवायचा आहे पठ्ठ्याला… पण एवढा मोठा धोका घेणे योग्य नाही असं लिहिलं आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तरुणाच्या वेडेपणावर संताप व्यक्त करत आहेत. एका नेटकऱ्याने विजेच्या तारांना चिकटला की जळून खाक होईल मग समजेल याला असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने हा निव्वळ वेडेपणा आहे, काम असो किंवा रिल असा वेडेपणा करुन नये असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






