Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रद्धा की वेडेपणा? फ्रिजरमध्ये जमा झालेल्या बर्फाला मानलं शिवलिंग, दर्शन घेत फ्रिजमध्येच अर्पण केला नैवेद्य; Video Viral

Shivlinga In Fridge : काय सांगता! साक्षात भगवान शंकर फ्रिजमध्ये प्रकट झाले? उत्तर प्रदेशच्या आग्र्यात अंधश्रद्धेचे नवीन उदाहरण पाहायला मिळाले. फ्रिजमध्ये जमा झालेल्या बर्फाच्या आकृतीला देव मानलं आणि लोकांनी त्याची पूजा करायला सुरुवात केली.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 14, 2026 | 03:24 PM
श्रद्धा की वेडेपणा? फ्रिजरमध्ये जमा झालेल्या बर्फाला मानलं शिवलिंग, दर्शन घेत फ्रिजमध्येच अर्पण केला नैवेद्य; Video Viral

श्रद्धा की वेडेपणा? फ्रिजरमध्ये जमा झालेल्या बर्फाला मानलं शिवलिंग, दर्शन घेत फ्रिजमध्येच अर्पण केला नैवेद्य; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • उत्तर प्रदेशातील एका कुटुंबाच्या अनोख्या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
  • घटनेनंतर परिसरात लोकांची गर्दी झाली असून विविध चर्चा रंगल्या.
  • व्हिडिओवर नेटकऱ्यांनी श्रद्धा, अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या.
अस म्हणतात की, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात यात फार धुसट रेषा असते. ही रेषा आपण वेळीच ओळखायला हवी नाहीतर श्रद्धा केव्हा अंधश्रद्धेत बदलेल ते सांगता येत नाही. अलिकडे अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या आग्रातून समोर येत आहे. व्हिडिओमध्ये एक फ्रिज दिसत असून यातील फ्रिजरमध्ये बर्फाचा एक गोळा तयार झाल्याचे दिसते. हा गोळा एका विशिष्ट आकारात तयार झाल्याने कुटुंबाने त्याला भगवान शिवाचे शिवलिंग मानले आणि त्याची पूजा करायला सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी निव्वळ वेडेपणा म्हणत व्हिडिओवर आपल्या टिका व्यक्त केल्या आहेत. चला नक्की काय प्रकरण आहे ते सविस्तर जाणून घेऊया.

Viral Photo : पुणे तिथे काय उणे! ना कार, ना फ्लॅट… २५ हजाराची नोकरी, पुण्यातील युवक वधूच्या शोधात; थेट बिलबोर्डवर दिली जाहीरात

काय घडलं व्हिडिओत?

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही आग्रा येथील खेरिया मोडच्या नागला भुजा परिसरात घडली आहे. आपल्या रेफ्रिजरेटरमध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेली बर्फाची ही आकृती पाहून कुटुंबातील सदस्य थक्क झाले आणि त्यांनी याला शिवलिंग मानत याची पूजा करायला सुरुवात केली. घटनेची माहिती पसरताच मोठ्या संख्येने श्रद्धाळू फ्रिजजवळ जमा झाले आणि त्यांनी ‘बम-बम भोले’ आणि ‘हर-हर महादेव’ असा जसघोष करायला सुरुवात केली.

अनेकजण या घटनेच्या टाइमिंगला अमरनाथच्या बाबा बर्फाणी यांच्यासोबत देखील जोडत आहेत. खरंतर यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये पवित्र अमरनाथ यात्रा सुरु आहे जिथे लोक खडतर प्रवास करत बाबा बर्फाणी म्हणजेच बर्फाच्या शिवलिंगाला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने यात्रेत सामील होत आहेत. याच घटनेला एकत्र जोडत जणू बाबा बर्फाणी फ्रिजमध्येच प्रकट झाले आहेत असा अंधविश्वास लोकांच्या मनात निर्माण होत आहे. लोक नैवेज्ञ घेऊन फ्रिजजवळ जात आहेत आणि बर्फाच्या गोळ्यासमोर फुले देखील अर्पण करत आहेत.

कुणाला विचारुन फोटो काढला? पर्यटकावर जंगली बैल झाला नाराज, धावत आला अन् ८ फूट उंचावर व्यक्तीला हवेतच फेकले…; VideoViral

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @TheClickBuss नावाच्या यूट्यूब अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला चांगलेच व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “हा फक्त नैसर्गिकरित्या तयार झालेला बर्फ आहे, त्याला धार्मिक स्वरूप देणं चुकीचं आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “श्रद्धा असावी, पण प्रत्येक गोष्टीत चमत्कार शोधणं योग्य नाही”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “अरे त्या बर्फाला फोडा आणि आईस्क्रिम बनवून खा”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral agra family worships unusual ice formation in fridge viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Shivlinga
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Viral Photo : पुणे तिथे काय उणे! ना कार, ना फ्लॅट… २५ हजाराची नोकरी, पुण्यातील युवक वधूच्या शोधात; थेट बिलबोर्डवर दिली जाहीरात
1

Viral Photo : पुणे तिथे काय उणे! ना कार, ना फ्लॅट… २५ हजाराची नोकरी, पुण्यातील युवक वधूच्या शोधात; थेट बिलबोर्डवर दिली जाहीरात

कुणाला विचारुन फोटो काढला? पर्यटकावर जंगली बैल झाला नाराज, धावत आला अन् ८ फूट उंचावर व्यक्तीला हवेतच फेकले…; VideoViral
2

कुणाला विचारुन फोटो काढला? पर्यटकावर जंगली बैल झाला नाराज, धावत आला अन् ८ फूट उंचावर व्यक्तीला हवेतच फेकले…; VideoViral

‘५०० रुपये देईन, माझी खोली जवळच आहे’, रिक्षा ड्रायव्हरने महिला प्रवाशाला दिली ती अश्लिल ऑफर; Video Viral
3

‘५०० रुपये देईन, माझी खोली जवळच आहे’, रिक्षा ड्रायव्हरने महिला प्रवाशाला दिली ती अश्लिल ऑफर; Video Viral

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! मुलगा छतावरुन खाली पडला अन् आई रील शूट करत राहिली; VIDEO पाहून येईल संताप
4

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! मुलगा छतावरुन खाली पडला अन् आई रील शूट करत राहिली; VIDEO पाहून येईल संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.