(फोटो सौजन्य – Instagram)
पाहुण्यांच्या जीवाशी खेळ! पायनं मळलं पीठ अन्…, लग्नसमारंभातील ‘तो’ धक्कादायक VIDEO व्हायरल
काय घडलं व्हिडिओत?
पर्वतांवर पसरलेल्या या सोलार पॅनेल्सचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हे सोलार पॅनल्स चीनच्या हेबेई प्रांतातील ताईयांग पर्वतरांगांमध्ये पसरलेले आहेत. त्यात असेही म्हटले आहे की, या सौर फार्म्समुळे दरवर्षी २,५०,००० मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन कमी होण्याची अपेक्षा आहे.
सांगितले जात आहे की, चीनच्या हेबेई प्रांतात बसवलेल्या या सौर पॅनल्सच्या मदतीने तयार होणाऱ्या इलेक्ट्रीसिटीला चीनची राजधानी बीजिंग येथे पाठवले जाणार आहे. यावर्षीच्या हिवाळी ऑलिंपिकसाठी सौर आणि पवन ऊर्जेचा वापर करण्याची चीनची योजना आहे. येथे मोठ्या प्रमाणात सौर पॅनल्स बसवण्यात आले आहेत आणि याचे व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहेत.
कामं नाही, पासपोर्टही जप्त… मलेशियात अडकलेल्या भारतीयासोबत क्रूर वागणूक, ‘तो’ धक्कादायक VIDEO VIRAL
चीनच्या तैयांग पर्वतरांगांवर पसरवण्यात आलेल्या या सोलार पॅनल्यचा व्हिडिओ @unilad नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आणि यामुळे होणाऱ्या नुकसानाच काय?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “निसर्गाच्या कोणत्याही गोष्टीबद्दल त्यांच्या पूर्ण दुर्लक्ष आणि अनादराचे हे आणखी एक उदाहरण आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पर्वत नष्ट केल्याबद्दल हे दुःखद आहे”.






