Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक झटका अन् मृत्यू होता अटळ…! रेल्वे स्टेशनवर २५,००० व्होल्टच्या तारांमध्ये लोकांची हाणामारी, पोलिसही हैराण; Video Viral

Manmad Railway Station Video : निव्वळ मूर्खपणा! भांडणात एवढे रंगले की रेल्वे स्टेशनवरील गँट्रीवरच चढून घातला राडा. इथूनच २५,००० व्होल्टच्या तारा वाहून नेल्या जात असल्याने पाहणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 19, 2026 | 01:38 PM
एक झटका अन् मृत्यू होता अटळ...! रेल्वे स्टेशनवर २५,००० व्होल्टच्या तारांमध्ये लोकांची हाणामारी, पोलिसही हैराण; Video Viral

एक झटका अन् मृत्यू होता अटळ...! रेल्वे स्टेशनवर २५,००० व्होल्टच्या तारांमध्ये लोकांची हाणामारी, पोलिसही हैराण; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे स्थानकावर काही लोकांनी अतिशय धोकादायक ठिकाणी चढून गोंधळ घातल्याचा व्हिडिओ समोर आला.
  • परिस्थिती इतकी गंभीर झाली की आसपासच्या लोकांमध्ये घबराट पसरली.
  • अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
सोशल मिडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे. व्हिडिओने लोकांना थक्क केलं असून हा व्हिडिओ एका रेल्वे स्टेशनवरील आहे. रेल्वेची तार आपल्या जीवासाठी धोकादायक असते हे माहिती असूनही काही लोक रेल्वे स्टेशनवरील उंच गँट्रीवर चढताना दिसले. मुख्य म्हणजे या गँट्रींवरून २५,००० व्होल्टच्या उच्च-व्होल्टेज पॉवर केबल्स वाहून नेल्या जातात. अशावेळी विजेचा एक झटका सहजतेने डझनभर लोकांना मृत्यूच्या दारी पोहचवू शकतो. आपण अनेक ठिकाणी लोकांना भांडताना, मारामारी करताना पाहिले असेल पण विजेच्या तारांजवळ सुरु असलेल्या हाणामारीने पोलिसांचेही बीपी वाढवले. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

हनुमानाचाच आशिर्वाद जणू…! बाल्कनीतून खाली पडणाऱ्या चिमुकल्याचा वानराने वाचवला जीव… घटनेचा Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

व्हिडिओतील माहितीनुसार, ही घटना महाराष्ट्रातील मनमाड रेल्वे स्टेशनवर घडून आली. व्हिडिओमध्ये लोक एका उंच लोखंडी खांबावर चढून एकमेकांचा पाठलाग करताना आणि भांडताना दिसले. ते भांडणात इतके मग्न झाले होते की थेट विजेच्या तारेजवळ जाऊन हाणामारी करु लागले. सर्वात भीतीदायक बाब म्हणजे एक तरुण विजेच्या तारेजवळ लटकलेला दिसून आला. हे दृष्य इतके धोकादायक होते की पाहणाऱ्यांच्याही पायाखालची जमिन सरकली. व्हिडिओमध्ये रेल्वे प्लॅटफाॅर्मवरील इतर प्रवासी या लोकांना थक्क होऊन पाहत असल्याचेही दिसले. यावेळी काहींनी फोनमध्ये ही घटना कैद देखील केली. व्हिडिओच्या शेवटी पोलिस यात हस्तक्षेप करत गँट्रीच्या खाली थांबलेल्या रेल्वेवर चढून हाणामारीत गुंग झालेल्या लोकांना खाली उतरवताना दिसून आले. घटनेत जीवितहानी झाली की नाही याची मात्र अधिकृत माहिती समोर आलेली नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, सोशल मीडियावर लोकांनी रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Real footage, not a movie: Violent brawl on overhead electric gantries at Manmad railway station. Chaos on the Manmad-Kakinada-Shirdi Express route. pic.twitter.com/EzblTSVzZE — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 18, 2026

माकडाला पकडायला गेला अन् आयुष्य गमावून बसला… शॉक लागताच शरीर जळालं, हाॅटेल परिसरातील धक्कादायक घटनेचा Video Viral

दरम्यान सदर घटनेचा हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘चित्रपट नव्हे, तर वास्तविक दृश्य: मनमाड रेल्वे स्थानकावरील विजेच्या गँट्रीवर हिंसक हाणामारी. मनमाड-काकीनाडा-शिर्डी एक्सप्रेस मार्गावर गोंधळ’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “या बजरंग दलाच्या गुंडांनी ‘मनमद’ ऐवजी ‘मोहम्मद’ असे वाचून तात्काळ स्टेशन आणि इतर मालमत्तेची तोडफोड सुरू केली”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शेवटी भारतात स्पायडरमॅन” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सार्वजनिक वाहतुकीतील हिंसाचाराला स्थानिक गुन्ह्यांपेक्षा अधिक कठोर शिक्षा झाली पाहिजे. विमानतळांवर आणि विमानांमध्ये जशी प्रतिबंधात्मक उपाययोजना असते, तशीच इथेही असली पाहिजे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral people fighting on 25000 volt wires at manmad railway station viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • Electric Shock
  • Indian Railway
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

अरे बापरे! चिमुकली अजगरासोबत खेळू लागली रस्सीखेच, Viral Video पाहून यूजर्स अवाक्
1

अरे बापरे! चिमुकली अजगरासोबत खेळू लागली रस्सीखेच, Viral Video पाहून यूजर्स अवाक्

ही व्यथा काही आगळीच… सिग्नल लागताच तरुणाने लगेच बाईकच्या टाकीवर सुरु केला लॅपटाॅप; म्हणाला, हेच आहे कॉर्पोरेटचे आयुष्य
2

ही व्यथा काही आगळीच… सिग्नल लागताच तरुणाने लगेच बाईकच्या टाकीवर सुरु केला लॅपटाॅप; म्हणाला, हेच आहे कॉर्पोरेटचे आयुष्य

काय सांगता सापदेखील निघाला Oggy चा फॅन, चिमुकल्याच्या शेजारी बसून पाहू लागला कार्टून; मजेदार Video Viral
3

काय सांगता सापदेखील निघाला Oggy चा फॅन, चिमुकल्याच्या शेजारी बसून पाहू लागला कार्टून; मजेदार Video Viral

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क
4

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.