(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना खजुराहो रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या ‘द खजुराहो हेरिटेज रिसॉर्ट’मध्ये घडली. मृताची ओळख प्रदीप रायकवार उर्फ रिंकू अशी पटली असून, तो त्याच रिसॉर्टमध्ये काम करत होता. या तरुणाने केवळ पाच दिवसांपूर्वीच हॉटेलमध्ये कामाला सुरुवात केली होती आणि अशातच त्याच्यासोबत हा अपघात घडला. मुख्य म्हणजे यात त्याचा जीव पणाला लागला. घटनेच्या सासीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, रिसॉर्टच्या बागेत शिरलेल्या माकडाला घाबरवण्यासाठी प्रदीप एक लांब लोखंडी सळई घेऊन त्याच्या मागे जात होता. यादरम्यानच सळई वरील उच्च दाबाच्या तारेला धडकते ज्यामुळे एका मोठ्या स्फोटासह प्रदीपला जोरदार विजेचा झटका लागतो. या घटनेनंतर तो लगेच खाली पडतो आणि यातच त्याचा मृत्यू होतो. व्हिडिओमध्ये त्याचा आवाज ऐकून काही महिला कर्मचारी काय झालं ते पाहण्यासाठी बाहेर येताना दिसतात पण प्रदीपची अवस्था पाहून त्याही घाबरतात.
📍Chhatarpur, Madhya Pradesh: A hotel room boy, Pradeep Raikwar alias Ranu, came in contact with a 33 kV power line while trying to scare away a monkey with an iron pipe in the hotel premises, lost his life.pic.twitter.com/JR6Pc6QveP — Deadly Kalesh (@Deadlykalesh) April 15, 2026
माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच बामिठा पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी पोहचून त्यांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. बुधवारी शवविच्छेदनानंतर त्या तरुणाचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. रिसॉर्टच्या छताजवळून जाणारी उच्च-दाबाची वाहिनी नियमांनुसार बसवण्यात आली होती की विभाग किंवा हॉटेल व्यवस्थापनाने निष्काळजीपणा केला होता, याचा सखोल तपास आता केला जात आहे. दरम्यान सदर घटनेचा हा व्हिडिओ @Deadlykalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






