फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर हसावे की रडावे कळत नाही. तर अनेकदा आश्चर्यकारक गोष्टी देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर कधी हैराण करून सोडणारे जुगाडाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक तरूणाने एक वेगळेच हेल्मेट घातलेले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तुम्ही आत्तापर्यंत इंडिकेटर आणि हेडलाईट गाडीला पाहिले असतील. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाला हे इंडिकेटर आणि हेडलाईट गाडीच्याऐवजी डोक्यावर कसे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही हैराण व्हाल. तुम्हाला काय बोलावे ते समजणार नाही. अनेकांनी यावर आपल्या भन्नाट प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्तीने त्याच्यासाठी एक अनोखे हेल्मेट बनवले आहे. असे हेल्मेट तुम्ही कधी पाहिले नसेल. हे हेल्मेट सामान्य नसून व्यक्तीने ते स्वतःसाठी कस्टमाइझ केलेले आहे. हे हेल्मेटसारखे कमी आणि बाइकच्या हेडलाइटसारखे जास्त दिसते. व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, व्यक्तीने घातलेल्या हेल्मेटला बाईकच्या इंडिकेटरसह स्क्रीन आहे. या हेल्मेटमध्ये एलईडी बल्ब लावण्यात आला आहे आणि तितकेच चमकत आहेत. बाईकवर बसलेली व्यक्ती पूर्ण स्वॅगने बाईक चालवताना दिसत आहे. याशिवाय ती व्यक्ती दोन्ही हात पसरून दुचाकी चालवताना दिसत आहे. तसेच, रस्त्यावरून जाणारे त्याच्याकडे पाहत राहतात.
हे देखील वाचा – अरे देवा! लॅपटॉप स्क्रीनच्या आत मुंगी; व्हिडिओ पाहून लोक थक्क म्हणाले…
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @aarti_rohit_yadav या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकजण हा व्हिडिओ पाहून हैराण झाले आहे. तसेच या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील व्यक्त केल्या आहेत. माणसाच्या या जुगाडाने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे – “स्प्लेंडर लोकांमध्ये वेगळेच आकर्षण असते.” तर एका युजरने म्हटले आहे की, भाऊचा स्वॅगच वेगळा आहे. तसेच दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ आता डोक्यावर आणखी ओझे वागवावे लागणार काय? तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, ते ठीक आहे पण याला कोणीतरी पुरस्कार दिला पाहिजे.