ब्रेन रोट म्हणजे काय
2024 साठी ‘Brain Rot’ हा शब्द वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून निवडला गेला आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्येही त्याचा समावेश करण्यात आला आहे. वर्ड ऑफ द इयरच्या यादीमध्ये ब्रेन रॉट – डेम्युअर, डायनॅमिक प्राइसिंग, लॉर, रोमान्स आणि स्लॉपसह 6 शब्दांचा समावेश आहे. हे सर्व शब्द 2024 मध्ये झालेले सामाजिक बदल आणि ट्रेंड दर्शवतात. ऑक्सफर्डने 2023 मध्ये Rizz ची निवड केली होती.
2024 मध्ये इंटरनेटवरील विविध प्लॅटफॉर्मवर या शब्दाच्या लोकप्रियतेत 230% वाढ पाहिल्यानंतर ऑक्सफर्ड डिक्शनरी प्रेसने ‘ब्रेन रॉट’ हा त्याचा ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून घोषित केला आहे. डिजिटल सामग्रीचे व्यसन म्हणून वापरल्या जाण्याव्यतिरिक्त, हलकी चर्चा, स्वस्त कंटेट आणि गुणवत्तेचा अभावदेखील या शब्दाशी जोडलेले दिसतात. (फोटो सौजन्य – iStock)
Brain Rot म्हणजे नेमके काय?
“ब्रेन रॉट” ही एक तांत्रिक संज्ञा नाही, परंतु त्याऐवजी एखाद्या व्यक्तीला डिजिटल कंटेट, सोशल मीडिया किंवा इतर मनोरंजन कंटेटच्या अत्यधिक एक्सपोजरमुळे मानसिक क्षमता, लक्ष आणि विचारशक्ती कमी होते सामान्यतः डिजिटल किंवा मानसिक थकवा म्हणूनदेखील याकडे पाहिले जाऊ शकते, ज्यामुळे व्यक्ती मानसिकरित्या थकल्यासारखी आणि अव्यवस्थित वाटते.
कधी झाला पहिला वापर
“ब्रेन रॉट” हा शब्द प्रथम 1854 मध्ये हेन्री डेव्हिड थोरो यांनी त्यांच्या वॉल्डन या पुस्तकात वापरला होता, इंटरनेटच्याही खूप आधी या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. मात्र TikTok आणि Twitter सारख्या प्लॅटफॉर्मवर Gen Z आणि Gen Alpha मध्ये “ब्रेन रॉट” हा शब्द अधिक लोकप्रिय झाला आहे. “ब्रेन रॉट” कंटेट सामान्यतः वास्तविकतेपासून विचलित व्हिडिओ किंवा सोशल मीडिया पोस्टचा संदर्भ देण्यासाठी वापरले जाते. असा कंटेट पाहून लोक एखाद्याविषयी विचित्र मतं बनवतात अथवा मूर्खासारखा विचार करतात आणि विचित्र वागणूकदेखील करू लागतात.
अनेक जण वास्तवापासून दूर एका वेगळ्याच विश्वात हरवून जातात. “ब्रेन रॉट” हा अति इंटरनेट वापरामुळे होणारा मानसिक बिघाडदेखील दर्शवू शकतो असे म्हणता येते.
‘न्यूड फोटो पाठव’… शिक्षकाचा विद्यार्थीनींना अश्लील मेसेज; पालकांकडून बेदम मारहाण, VIDEO व्हायरल
शॉर्ट लिस्टेट अन्य शब्दाचे अर्थ