Typhoon Kalmaegi : कालमेगी वादळाचा फिलिपिन्समध्ये हाहा:कार ; 200 हून अधिक लोकांचा मृत्यू, आणीबाणी जाहीर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
फिलिपिन्सच्या मध्यवर्तीय प्रांतात किमान २४१ लोकांचा पूरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. तसेच १२७ लोक बेपत्ता झाले आहेत. मदत आणि बचाव कार्यात अनेक अडथले येत आहेत. गुरुवारी (०६ नोव्हेंबर) फिलिपिन्सचे अध्यक्ष फर्डिनंड मार्कोस ज्युनियर यांनी आणीबाणी जाहीर केली आहे.
बुधवारी (०५ नोव्हेंबर) फिलिपिन्समध्ये कालमेगी वादळाने जोरदार धडक दिली होती. यानंतर हे वादळ दक्षिण चीन समुद्राच्या दिशेने गेले. या वादळामुळे २० लाख लोक प्रभावित. ५६ लाखाहून अधिक लोकांना स्थलांतर करावे लागले आहे. सध्या वादळानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. लोकांपर्यंत मदत आणि निधी पोहोचवण्याचे कार्य सुरु आहे. हे कालमेगी वादळ गेल्या काही वर्षातील सर्वात मोठी आपत्ती मानले जात आहे.
सर्वात जास्त फिलिपिन्सच्या सेबू प्रांतामध्ये नुकसान झाले आहे. अनेक भागांमध्ये वीज आणि दळवणळ सेवा खंडित झाले आहे. लोक पूराच्या पाण्यामुळे घराच्या छतावर अडकले आहे. यापूर्वी भूकंप आणि फेंगशेन वादळाने कहर माजवला होता. त्यातून सावरत असतानाचा या नव्या वादळाने विध्वंस घडवला आहे.
कालमेगी वादळापूर्वी फिलिपिन्समध्ये ऑक्टोबरमध्ये ( दि. २०) फेंगशेन वादळाने कहर माजवला होता. या वादळाने ७ जणांचा बळी घेतला होता. तसेच १४ हजाराहून अधिक लोक बेघर झाले होते. याशिवाय फेंगशेन वादळाच्या काही आठवड्यांपूर्वी ३० सप्टेंबर रोजी फिलिपिन्समध्ये ६.९ तीव्रतेचा भूकंप झाला होता. यामुळे ७२ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २०० हून अधिक लोक जखमी झाले होते. तर त्या आधी बुआलोई वादळाने कहर माजवला होता.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. फिलिपिन्समध्ये कालमेगी वादळाने किती जणांचा बळी घेतला?
फिलिपिन्समध्ये कालमेगी वादळाने हाहा:कार माजवला असून २४१ लोकांचा बळी घेतला आहे.
प्रश्न २. फिलिपिन्समध्ये वादळामुळे किती लोक बेपत्ता झाले आहेत?
फिलिपिन्समध्ये भयानक कासमेगी वादळामुळे १२७ लोक पूरात वाहून गेल्याने बेपत्ता झाले आहेत.
प्रश्न ३. फिलिपिन्स सरकारने कोणती घोषणा केली आहे आणि का?
फिलिपिन्समध्ये कालमेगी वादळाने प्रचंड कहर केला आहे. परिस्थिती बिकट असून आणीबाणीची जाहीर करण्यात आली आहे.






