73 Year Old Prince Charles Will Be Britains Next King Nrgm
७३ वर्षीय प्रिन्स चार्ल्स होणार ब्रिटनचा पुढचा राजा
णी एलिझाबेथ यांचा उत्तराधिकारी त्यांचा मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्स आहे. चार्ल्स ७३ वर्षांचे आहेत. मात्र, जोपर्यंत राणी एलिझाबेथ जिवंत होत्या, तोपर्यंत ते सिंहासनावर बसण्याची शक्यता नव्हती. चार्ल्स यांचा जन्म एलिझाबेथ यांनी सिंहासनावर बसण्याच्या अवघ्या ३ वर्षांपूर्वी झाला होता.
लंडन : ब्रिटनच्या (Britain) राणी एलिझाबेथ (Queen Elizabeth) यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी काल निधन (Passed Away) झाले. त्या या ब्रिटन आणि कॉमनवेल्थच्या इतिहासात सर्वाधिक काळ राज्य करणारी राणी होत्या. ९६ वर्षीय एलिझाबेथ या सध्याच्या जगातील सर्वात वृद्ध शासकदेखील (Old Ruler) मानल्या जातात. त्यांच्या आधी हा विक्रम राणी व्हिक्टोरियाच्या (Queen Victoria) नावावर होता. त्यांनी १८६७ ते १९०१ पर्यंत सुमारे ६४ वर्षे राज्य केले.
एलिझाबेथ द्वितीय त्यांचे वडील किंग जॉर्ज पाचवे यांच्या निधनानंतर १९५२ मध्ये ब्रिटनच्या सिंहासनावर बसल्या. २ जून १९५३ रोजी त्यांचा राज्याभिषेक अधिकृतपणे वेस्टमिन्स्टर ॲबे येथे झाला. या वर्षी १ जून रोजी एलिझाबेथ यांच्या राजवटीला ७०वर्षे पूर्ण झाली होती.
राणी एलिझाबेथ यांचा उत्तराधिकारी त्यांचा मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्स (Prince Charles) आहे. चार्ल्स ७३ वर्षांचे आहेत. मात्र, जोपर्यंत राणी एलिझाबेथ जिवंत होत्या, तोपर्यंत ते सिंहासनावर बसण्याची शक्यता नव्हती. चार्ल्स यांचा जन्म एलिझाबेथ यांनी सिंहासनावर बसण्याच्या अवघ्या ३ वर्षांपूर्वी झाला होता.
Web Title: 73 year old prince charles will be britains next king nrgm