सीरिया : अमेरिकेच्या (America) स्पेशल ऑपरेशन्स फोर्सने (Special Operations Force) गुरुवारी सकाळी सीरियात (Syria) अल कायद्याच्या (Al Qaeda) नेत्याला टार्गेट करण्याचे अभियान राबवले. हे मिशन यशस्वी झाल्याचा दावा अमेरिकेच्या संरक्षण विभागाने (UौS Department of Defense) केला आहे. मात्र आता घटनास्थळावरुन अशी माहिती समोर आली आहे की, या हल्ल्यात मुलांसह १३ निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत.
उत्तरी इदबिल प्रांतातील रहिवाशांनी सांगितले की, रात्री एकच्या सुमारास हेलिकॉप्टर उतरल्याचा आवाज आला आणि नंतर गोळीबार सुरु झाला. अमेरिकन कमांडोज अर्ध्या रात्री बेलिकॉप्टरमधून सीरियाच्या आतल्या भागात उतरले. जे गाव तुर्कीच्या सीमेला लागून आहे. या ठिकाणी एका घरावर अमेरिकन कमांडोंनी हल्ला केला.
[read_also content=”पति-पत्नी और वो : पार्टनरने फसवणूक केली, तर अशी घ्या काळजी https://www.navarashtra.com/lifestyle/after-a-breakup-these-ways-to-take-care-of-yourself-nrvb-231888.html”]
हा हल्ला करण्यापूर्वी दोन तास आधी त्या परिसरातील महिलांना आणि लांना घरे खाली करण्याची सूचना लाऊडस्पीकरवरुन देण्यात आली होती, त्यानंतर दोन तासांनी हे मिशन सुरु करण्यात आल्याची माहिती काही अधिकाऱ्यांच्या आधाराने न्यूयॉर्कच्या वृत्तसंस्थांनी दिली आहे. सैन्याने घरावर ग्रेनेड हल्ला केला. त्यानंतर घरातील दहशतवाद्यांनीही प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूने बराच वेळ गोळीबार सुरु होता.
हे ऑपरेशन सुरु असताना अमेरिकेच्या एका हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचण उद्भवली त्यामुळे नाईलाजाने हे हेलिकॉप्टर लँड करावे लागले. त्यानंतर अमेरिकन अटॅक एयरक्राफ्टने हे हेलिकॉप्टर नष्ट केले. कारवाईनंतर रात्रीतूनच अमेरिकन कमांडो आणि हेलिकॉप्टर्स उडून गेली.
[read_also content=”३२००० प्राथमिक, उच्च माध्यमिक शिक्षक पदांसाठी भरती; त्वरित करा अर्ज https://www.navarashtra.com/career/recruitment-for-32000-primary-higher-secondary-teacher-posts-in-rajasthan-government-jobs-apply-now-nrvb-231931.html”]
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या अधिकारामध्ये असलेल्या अमेरिकन स्पेशल ऑपरेशन फोर्सेसने उत्तर पश्चिमी सीरियात दहशतवादी विरोधी कारवाई केली. हे मिशन यशस्वी झाले. यात कोणत्याही अमेरिकन व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. अशी माहिती पेंटागॉनच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
दुसरीकडे सोशल मीडियावरील पोस्ट वेगळीच हकीकत सांगत आहेत. वॉशिंग्टनमध्ये असलेल्या मिडल ईस्ट इन्स्टिट्यूच्या सीरिया अँड काऊंटरिंग टेररिझम प्रोगामचे संचालक चार्ल्स लिस्टर यांनी व्हिडिओ पाहून वेगळीच माहिती दिली आहे. या व्हिडिओत अमेरिकन सैन्याने हल्ला केलेल्या घराच्या ढिगाऱ्याखालून महिला, माणसांचे आणि मुलांचे ९ मृतदेह बाहेर काढत असल्याचे दिसत आहे.
अमेरिकन्सनी केलेल्या हल्ल्यामुळे घराचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. तर गोळीबार सुरु असताना घरात स्फोट झाला. जो अमेरिकेच्या गोळीबारामुळे झाला नसल्याचा दावा सैन्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे.






