Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Quad Summit : क्वाड परिषदेत नेमकं काय घडलं? परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितला मुख्य अजेंडा

Quad Summit Update : नवी दिल्लीत क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भूषवले. यावेळी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आणि आर्थिक विकासावर सहकार्य करण्यावर सविस्तर चर्चा झाली. सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी क्वाड देशांनी एकत्र येण्यावर सहमती दिली.

  • By स्वराली शहा
Updated On: May 26, 2026 | 12:17 PM
Quad Summit

Quad Summit

Follow Us
Close
Follow Us:
  • नवी दिल्लीत पार पडली क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक
  • परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भूषवले अध्यक्षपद
  • जाणून घ्या का होता परिषदेचा मुख्य अजेंडा?
Quad Summit News in Marathi : नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आज, मंगळवार २६ मे २०२६ रोजी क्वाड (Quad) देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदत पार पडली. या परिषदेचे अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी भूषवले. यावेळी जयशंकर यांनी हिंद-प्रशांत महासागरातील (इंडो-पॅसिफिक) सागरी सुरक्षा आणि आर्थिक विकासावार सविस्तर चर्चा केली. हैदराबाद हाऊस येथे पार पडलेल्या या हाय-प्रोफाइल बैठकीत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वँग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोतेगी उपस्थित होते. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

‘I Love Modi…’ : दिल्लीतील कार्यक्रमात Donald Trump यांचा थेट व्हिडिओ कॉल; स्वत:ला केलं PM मोदींचा मोठा फॅन घोषित

बैठीकीतील महत्त्वाचे मुद्दे

क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

  • या बैठकीत जागतिक विकास आणि स्थिरतेसाठी इंडो-पॅसिफिक क्षेत्र चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले.
  • याशिवाय जयशंकर यांनी क्वाडचा मूळ उद्देश प्रादेशिक शांतता आणि समृद्धी आणण्यासाठी एक विश्वासू आणि पारदर्शक भागीदारी तयार करण्याचा असल्याचे स्पष्ट केले.
  • याशिवाय हिंद-प्रशांत महागारात कोणत्याही देशाची मक्तेदारी किंवा लष्करी दबाव रोखण्यासाठी क्वाड देशांनी वचबद्धता दर्शवली.
  • याशिवाय पुरवठा साखळी अधिक मजबूत करण्यावर आणि पॅसिफिक देशांमध्ये बंदरांचा विकास करण्यासाठी संयुक्तपणे काम करण्याचे निश्चित आले.
  • याशिवाय खाणकाम आणि तंत्रज्ञानाशी संबंधित क्रिटिकल मिनिरल्स फ्रेमवर्क करारावरही अमेरिका आणि भारतामध्ये स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
  • तसेच तंत्रज्ञान, व्यवस्थापन, धोरण, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे विश्लेषण आणि आपत्कालीन प्रतिसाद सराव यांसारख्या क्षेत्रात सहकार्य करण्यावर सहमती दर्शवण्यात आली.

जयशंकर यांचे विधान

यावेळी परिषदेला संबोधित करताना एस. जयशंकर यांनी क्वाड देशांच्या जबाबदारीचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, आपण लोकशाहीवादी आणि खुल्या अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणारे देश आहोत. यामुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रात मुक्त, खुले आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची मोठी जबाबदारी क्वाड देशांवर आहे, असे म्हटले. तसेच त्यांनी जगासोमर विश्वासार्ह आणि पारदर्शक भागीदारी निर्माण करण्याची गरजही ओधोरेखित केली. क्वाड सदस्य राष्ट्रांचा उद्देश जागतिक आव्हानांना खंबीरपणे तोंड देणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सागरी सुरक्षेवर विशेष भर

बैठकीदरम्यान सागरी सुरेक्षाचा मुद्दा अविभाज्य भाग होता. सागरी क्षेत्रातील अडथळ्यांपासून, मोठ्या धोक्यापांसून मुक्त राहण्यासाठी क्वाड राष्ट्रांनी प्रयत्नशील राहण्याचे ठरवले. यासाठी एक मजबूत आणि सुरक्षित आर्थिक आराखड्यावर संयुक्तपणे कार्य सुरु केले. यासाठी Maritime Surveillance Co-operation उपक्रम सुरु करण्यात आला.

क्वाड समितीचा मुख्य उद्देश

क्वाड संघटनेत भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेचा समावेश आहे. या देशांचा उद्देश चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखणे असून याला ड्रॅगनने तीव्र विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत झालेली क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक जागतिक रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक आणि महत्त्वाची मानली जात आहे.

Just completed a productive QUAD FMM with colleagues @SecRubio of the US, @SenatorWong of Australia, and FM @moteging of Japan. Three major takeaways: ➡️ Agreed on Indo-Pacific Maritime Surveillance Initiative and on a Common Operating Picture in the maritime domain. Will… pic.twitter.com/4b0dFtiAHC — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 26, 2026


Chile Earthquake : उत्तर चिलीमध्ये भूकंपाचा जोरदार झटका; ६.९ रिश्टर स्केलची नोंद, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

Web Title: Quad summit 2026 jaishankar explains main agenda and key decisions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • America
  • Australia
  • Japan
  • S. Jaishankar
  • World news

संबंधित बातम्या

US Vs Iran: हॉर्मुझमध्ये अमेरिकेचा इराणवर अटॅक… कच्च्या तेलाच्या किमतीत अचानक खळबळ, आता पुन्हा महागाईची भडका!
1

US Vs Iran: हॉर्मुझमध्ये अमेरिकेचा इराणवर अटॅक… कच्च्या तेलाच्या किमतीत अचानक खळबळ, आता पुन्हा महागाईची भडका!

Chile Earthquake  : उत्तर चिलीमध्ये भूकंपाचा जोरदार झटका; ६.९ रिश्टर स्केलची नोंद, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
2

Chile Earthquake : उत्तर चिलीमध्ये भूकंपाचा जोरदार झटका; ६.९ रिश्टर स्केलची नोंद, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

Israel Attack Lebanon : इस्रायलचा लेबनॉनवर भीषण प्रहार; हिजबुल्ल्हाच्या कमांड सेंटर्सना क्षेपणास्त्रांनी केले उद्धवस्त
3

Israel Attack Lebanon : इस्रायलचा लेबनॉनवर भीषण प्रहार; हिजबुल्ल्हाच्या कमांड सेंटर्सना क्षेपणास्त्रांनी केले उद्धवस्त

US Iran Strike : शांततेच्या प्रयत्नांना मोठा सुरुंग? होर्मुझच्या खाडीत अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला, पुन्हा युद्धाचे ढग गडद?
4

US Iran Strike : शांततेच्या प्रयत्नांना मोठा सुरुंग? होर्मुझच्या खाडीत अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला, पुन्हा युद्धाचे ढग गडद?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.