जगविख्यात लेखक सलमान रश्दी (Salman Rushdie) यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये नुकताच हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांना चाकूने वार करून जखमी करण्यात आलं आहे. लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्क येथे हल्ला झाला आहे. दरम्यान काही प्रत्यक्षदर्शीने सलमान रश्दी यांना मारण्याचा प्रयत्न झाल्याचे ट्वीट केले असून एक घटनास्थळाचा व्हिडीओही यावेळी पोस्ट करण्यात आला आहे. दरम्यान सुरक्षा दलांनी हल्लेखोराला पकडण्यापूर्वी रश्दी यांच्यावर अनेक वेळा वार करण्यात आले होते. त्यानंतर प्रेक्षकांमधील काही सदस्य मंचावर देखील गेले. या हल्ल्यात जखमी झालेल्या सलमान रश्दी यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान न्यूयॉर्कच्या गव्हर्नर यांनी सलमान हे जिवंत असून त्यांच्यवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती दिली आहे.
[read_also content=”इस्रायलचे ऑपरेशन ब्रेकिंग डॉन, इस्लामिक जिहादच्या नावाखाली गाझामध्ये हल्ले; ४७ पॅलेस्टिनी ठार https://www.navarashtra.com/world/attacks-in-gaza-in-the-name-of-islamic-jihad-not-even-america-47-palestinians-killed-315270.html”]
न्यूयॉर्कमधील चौटौका येथे व्याख्यानापूर्वी स्टेजवर रश्दी यांच्यावर चाकूने वार करण्यात आले असून त्यात ते जखमी झाले आहे. शुक्रवारी सकाळी व्याख्यान देण्यापूर्वी CHQ 2022 कार्यक्रमाच्या मंचावर असताना 75 वर्षीय सलमान रश्दी यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. मिडनाईट्स चिल्ड्रन (Midnight’s Children) तसंच द सॅटेनिक व्हर्सेस (The Satanic Verses) ही सलमान रश्दी यांची गाजलेली पुस्तकं आहेत.
[read_also content=”माजी खेळाडूने टोचले पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे कान; म्हणाला भारताकडून शिका! https://www.navarashtra.com/sports/former-player-pricks-pakistan-cricket-boards-ears-and-said-learn-from-india-315228.html”]