कॅलिफोर्निया: अमेरिकेच्या कॅलिफोर्निया (California) येथे आयोजित करण्यात आलेल्या लीजेंड ॲण्ड गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स (Guinness World Records) हॉल ऑफ फेममध्ये 21 वर्षीय अमेरिकन तरुणाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. कमी वेळात 3x3x3 रुबिक क्यूब सोडवून मॅक्स पार्कने (Max Park) वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. सध्या सोशल मीडियावर मॅक्स पार्क आणि त्याच्या या वर्ल्ड रेकॉर्डची चांगलीच चर्चा सुरू आहे.
मॅक्सने युशेंग डूचा रेकॉर्ड मोडला
मॅक्स पार्कनी 3x3x3 रुबिक क्यूब अवघ्या 3.13 सेकंदात सोडवला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. याआधी कमी वेळात रुबिक क्यूब सोडविण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड चीनच्या युशेंग डू नावाच्या व्यक्तीकडे होता. 2018 मध्ये युशेंग डू याने 3.47 मिनिटांमध्ये रुबिक क्यूब सोडवला होता पण आता मॅक्सने युशेंग डूचा रेकॉर्ड मोडला आहे.
Max Park is the speed cubing goat ? On Sunday, he set a new world record for the fastest time to solve a 3x3x3 cube at 3.13 seconds. He smashed the record by 0.4 seconds. It means he now has the fastest times to solve a 3x3x3, 4x4x4, 5x5x5, 6x6x6 and 7x7x7 cube. pic.twitter.com/8Gek14xgZO — Guinness World Records (@GWR) June 14, 2023
Guinness World Records च्या ट्विटर अकाउंटवरून हा मॅक्सचा रुबिक क्यूब सोडवितानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये मॅक्सने फक्त 3.13 सेकंदात कसा रुबिक क्यूब सोडवल्याचं दिसत आहे. व्हिडिओत पुढे तुम्हाला दिसेल की मॅक्सने खूप कमी वेळात रुबिक क्यूब सोडवून वर्ल्ड रेकॉर्ड केल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सगळ्यांनी टाळ्या वाजवून मॅक्सचे कौतुक केले. मॅक्सच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत होता.
मॅक्सच्या नावे अन्य रेकॉर्ड्स
मॅक्सने 3.13 सेकंदात 3x3x3 रुबिक क्यूब सोडवून वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे, मात्र याआधीही त्याच्या नावी 4x4x4, 5x5x5, 6x6x6 आणि 7x7x7 स्पीड क्यूबिंगचे वर्ल्ड रेकॉर्ड आहेत.
कोण आहे मॅक्स?
मॅक्स पार्कला ‘Rubik’s Cube speedsolver’ म्हणून ओळखले जाते. मॅक्सचा जन्म 28 नोव्हेंबर 2001 रोजी झाला. मॅक्सच्या नावे स्पीड क्यूबिंगचे अनेक रेकॉर्ड आहेत. मॅक्स सीरिटोस कॅलिफोर्नियामध्ये (Cerritos California) राहतो. त्याच्या आईवडिलांचे नाव मिकी आणि श्वान पार्क आहेत. ऑटिझम आजाराने ग्रस्त असूनसुद्धा मॅक्सने केलेल्या आतापर्यंतचे वर्ल्ड रेकॉर्ड कौतुकास्पद आहेत.






