
Bangkok Pub Fire
मिळालेल्या माहितीनुसार, स्टेटजवळील सर्किट ब्रेकरमधून सुरुवातील धूर निघू लागला. यानंतर काही क्षणांतच संपूर्ण पबमधील वीजपुरवठा खंडित झाला. यानंतर मोठा स्फोट झाला आणि आगीने संपूर्ण परिसराला वेढले. या दुर्घटनेवेळी पबमध्ये मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. यामुळे एकच गोंधळ उडाला.
आग आणि धुरापासून बचावा करण्यासाठी अनेकजणांना पबच्या बाथरुमकडे धाव घेतली. परंतु तेथून बाहेर पडण्यासाठी कोणताही आपत्कालीन मार्ग उपबल्ध नसल्याने अनेकजण आतच अडकून पडले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकांचा मृत्यू धुरामुळे गुदमरुन झाला आहे. अनेक मृतदेह बाथरुममध्येच आढळले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन अधिकाऱ्यांना आग विझवण्यात यश आले. बचाव पथकांनी अनेकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. तसेच त्यांना आणि भाजलेल्या ६३ जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यातील २२ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पबमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. पबमध्ये एका फायर एक्झिट देखील होते. परंतु आगीने पूर्ण पबला वेढल्याने याचा वापर झाला नाही.
थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चार्नविराकुल यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. तसेच दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
थायलंडमध्ये पब आणि नाइटक्लबमधील आगीची ही पहिली घटना नाही. यापूर्वी २०२२ मध्ये म्युझिक पबमधील आगीत १४ जण ठार झाला होते. तर २००९ मध्ये सांतिका नाइटक्लब दुर्घटनेत ६६ जणांचे प्राण गेले होते. सध्या रविवारी घडलेल्या घटनेनंतर सार्वजिक ठिकाणांवरील अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
💔 27 dead and 18 injured as tragedy strikes Bangkok nightlife Late last night, a massive fire engulfed the popular entertainment venue “Rong Beer at Ladprao” near the Ladprao Intersection. Emergency services responded around midnight to a fierce blaze, with thick smoke and… pic.twitter.com/vuPsMO7eZn — Thai Enquirer (@ThaiEnquirer) July 12, 2026