फोटो सौजन्य सोशल मीडिया
ट्रम्प यांनी धमकी वजा भाषण केले . भारताचे पंतप्रधान मोदीजी उपस्थितच राहिले नाहीत .यातच इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील भाषणात इस्रायलवर वसाहतवादाचा आरोप करणाऱ्या देशांवर जोरदार टीका केली . खासकरून ब्रिटन आणि फ्रान्सचा उल्लेख करत त्यांनी या देशांच्या ऐतेहासिक वसाहतवादी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे .
Iran Trade Crisis : बंदरांवरील निर्बंधांचा फटका; तुर्की सीमेवर किलोमीटरच्या ट्रकच्या रांगा
नेतन्याहू म्हणाले कि इस्रायलवर वसाहतवादाचा आरोप करणाऱ्यांमध्ये ब्रिटन आणि फ्रान्स मधील लोकं आहेत . त्यांच्या म्हणण्यानुसार या दोन्ही देशांच्या वसाहती जगभर पसरल्या होत्या . ब्रिटनच्या साम्राज्याचा सूर्य तर अस्ताला जात न्हवता अशा आख्यायिका गायला जायच्या .
आता तेच दुसऱ्यांवर आरोप करत आहेत . म्हणजे हे असं झाले कि सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली . त्यामुळे आमच्यावर आरोप करण्याचा नैतिक अधिकार ब्रिटन आणि फ्रान्समधील लोकांना अजिबात नाही . असे नेतन्याहू यांनी कडक शब्दात सांगितले आहे .
आपल्या भाषणात नेतन्याहू यांनी इस्रायलच्या स्थापनेनंतरच्या युद्धाच्या आणि देशाच्या सुरक्षेच्या मुद्यांचा संदर्भ दिला . इस्रायलच्या भूभागाबाबतचे आरोप आणि देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न यांची सांगड घालत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली . हेच बोलताना त्यांच्या भाषणादरम्यान काही देशांचे प्रतिनिधी सभागृहातून बाहेर पडले आणि नेतन्याहूच्या प्रतिनिधींनी इस्रायलच्या घोषणा दिल्या .
दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनची वाट लागल्याने ब्रिटनला जिथे जिथे आपला बाजार गुंडाळता येईल येईल तेथून त्यांनी बाजार आवरायला सुरवात केली . त्यावेळी ब्रिटन आणि युरोपियन देश हे जगाचा बाप होऊन बसले होते . जसे त्यांनी भारताला कायम त्रासात ठेवायचे या वृत्तीने भारतातील काही लोकांना हाताला धरून भारताची फाळणी करून पाकिस्तानला जन्म दिला .
एकाच भूभागात रेषा आखून तो भूभाग किंवा प्रदेश वास्तवात जळती चिता बनवून ठेवला . तेच तोडा आणि राज्य करा या तत्वाने त्यांनी मध्यपूर्वेत पॅलेस्टाईनची जमीन इस्रायलला देऊन मध्य पूर्वेशी शांतता गायब करण्यासाठी मुस्लिमांच्या मध्ये इस्रायलला जन्म दिला .
आज तोच देश जेव्हा त्यांच्या पाऊलावर पाय ठेवून गाझा , लेबनॉन मध्ये जागा बळकावत आहे . तेव्हा हे इस्रायलला शहाणपणाचे धडे देत आहेत . पण आता आंतरराष्ट्रीय राजकरणात ब्रिटनचे पाहिल्यासारखे महत्व राहिले नसल्याने त्यांच्या बोलण्यावर इस्रायल किती गांभीर्याने पाहतो हे आपल्याला त्याच्या टिकेवरून समजते आहे . तेव्हा जगातली जाणकार ब्रिटन आणि फ्रान्सला आपल्या कर्माची फळे खा असा सल्ला देताना दिसत आहेत .






