माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सेफ हाऊसमध्ये हलवले (फोटो -एएनआय)
नवी दिल्ली: काही महिन्यांपूर्वी बांग्लादेशमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसिना यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्या ठिकाणी लष्कराच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. आरक्षणाच्या विरोधामुळे मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि हिंसाचारामुळे बांगलादेशमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना या भारतात आश्रयाला थांबल्या आहेत. दरम्यान आता आता माजी पंतप्रधान शेख हसीना हिंडन एअरबेसवर आश्रयाला थांबल्या आहेत. दरम्यान त्यांना आता दिल्लीतील सेफ हाऊसमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.
बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना अमेरिका आणि इंग्लंड या देशांनी व्हिजा नाकारला आहे. सुरुवातीस शेख हसीना या हिंडन एअरबेसवर आश्रयाला होत्या. मात्र त्या ठिकाणी हवाई दलाचे ठिकाण असल्याने आणि त्या ठिकाणी शेख हंसीना यांना राहण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने त्यांना दिल्लीमधील सेफ हाऊसमध्ये हलवण्यात आले आहे. शेख हसीना यांना दिल्लीमधील लुटीयन झोनमधील एका बंगल्यात शिफ्ट केल्याची माहिती समोर येत आहे.
केंद्र सरकारने बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. लुटीयन झोनमधील एका बंगल्यात त्यांची व्यवस्था केल्याचे समजते आहे. हा बंगला विशेषतः केंद्रीय मंत्री, वरिष्ठ अधिकारी यांना दिला जातो त्यापैकी एक आहे. मात्र केंद्र सरकार आणि सुरक्षा यंत्रणेने शेख हसीना यांच्याबाबत अन्य माहिती दिलेली नाही. त्यांची सुरक्षा आणि गोपनीयता यामुळे अन्य गोष्टी समोर आलेल्या नाहीत.
शेख हसीना यांच्याविरोधात अटक वॉरेंट
तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना या भारतात आश्रयाला थांबल्या आहेत. दरम्यान आता आता माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे म्हटले जात आहे. यांचे कारण म्हणजे बांग्लादेशमधील एका कोर्टाने शेख हसीना यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. या अटक वॉरंटनुसार माजी पंतप्रधान शेख हसीना यांना १८ नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे आदेश बांग्लादेशमधील कोर्टाने दिले आहेत.
बांग्लादेशमधील आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायधिकरणाचे मुख्य अभियोक्ता यांनी याबद्दल माहिती दिल्याचे समजते आहे, शेख हसीना यांच्यावर बांग्लादेशमधील विद्यार्थी आंदोलनादरम्यान अनेक विद्यार्थ्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. तसेच बांग्लादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. शेख हसीना यांच्याविरुद्ध मानवाधिकार उल्लंघन प्रकरणाशी संबंधित अनेक प्रकरणाची चौकशी सुरू आहे. भारताचा शेजारील देश असलेल्या बांग्लादेशात सध्या मोठा हिंसाचार उफाळला होता. परिस्थिती ही टोकाला पोहचली होती की, आंदोलकांनी थेट पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे त्यांनी बांगलादेश सोडून भारतात आसरा घेतला आहे. तसेच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तिथे अंतरिम सरकार स्थापन झाले आहे.