अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (फोटो सौजन्य: एक्स/@narendramodi)
या बैठकीदरम्यान रुबियो यांनी पंतप्रधान मोदींना व्हाईट हाऊस भेटीचे निमंत्रण दिले. हे निमंत्रण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या वतीने पंतप्रधानांना अधिकृतपणे देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी या भेटीबद्दल सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. भारत आणि अमेरिका जागतिक कल्ल्यासाठी एकत्र काम करत राहतील असे त्यांनी म्हटले.
Happy to receive the US Secretary of State, Mr. Marco Rubio. We discussed sustained progress in the India-US Comprehensive Global Strategic Partnership and issues related to regional and global peace and security. India and the United States will continue to work closely for… pic.twitter.com/CuD0DdDXB7 — Narendra Modi (@narendramodi) May 23, 2026
याशिवाय २६ मे रोजी नवी दिल्ली येथे येथे क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून मार्को रुबियो देखील उपस्थित राहतील. रुबियो यांचा हा दौरा राजनैतिकदृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वचा मानला जात आहे. अमेरिका आणि भारतातील ताणलेले संबंध पुन्हा नव्या उंचीवर नेणे याचा हेतू आहे.






