Eknath Shinde: लंडनच्या ब्रिटिश संसदेत एकनाथ शिंदेंची इंग्रजीमध्ये दमदार गर्जना; ‘स्टेट्समनशिप पुरस्कारा’ने झाला सन्मान ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपल्या तळागाळातील नेतृत्वासाठी ओळखले जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राची मान उंचावली आहे. लंडन दौऱ्यादरम्यान ब्रिटीश संसदेच्या ऐतिहासिक ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ आणि ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्ये आयोजित विशेष आंतरराष्ट्रीय परिषदेत (International Conclave 2026) त्यांनी केलेले भाषण सध्या जगभरात चर्चेचा विषय बनले आहे. एरव्ही मराठी आणि हिंदी भाषेतून जनसंवाद साधणारे एकनाथ शिंदे यांनी या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर तब्बल अर्धा तास अस्खलित आणि प्रभावी इंग्रजीतून भाषण दिले. त्यांच्या या वक्तृत्वाने आणि सादरीकरणाने सभागृहात उपस्थित ब्रिटिश खासदार, उद्योजक आणि परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांना मंत्रमुग्ध केले.
भाषणाची सुरुवात करताना शिंदे यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. यानंतर त्यांनी ज्येष्ठ कवी सुरेश भट यांच्या ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या ओळींचा संदर्भ देत आपल्या मातृभाषेचा अभिमान आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्त केला.
‘लाडकी बहीण’ योजना आणि महिला सक्षमीकरणाचे मॉडेल जगासमोर
आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला. ते म्हणाले की, “मला स्वतःला एक सख्खी बहीण आहे, परंतु ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मुळे आज महाराष्ट्रातील अडीच कोटी बहिणींचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत”. ही योजना केवळ कोणतीही आर्थिक खैरात (Charity) नसून महिलांच्या स्वाभिमानाची आणि आर्थिक स्वातंत्र्याची पायाभरणी आहे. जेव्हा घरातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब प्रगतीच्या पथावर वाटचाल करते, असे प्रतिपादन त्यांनी केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS 2026: 7 वर्षांनंतर चिनी राष्ट्राध्यक्ष येणार भारतात; पंतप्रधान मोदींसोबत होणार ऐतिहासिक भेट, महासत्तांची दिल्लीत महापरिषद
याशिवाय, आईचा सन्मान वाढवण्यासाठी वडिलांच्या नावासोबत आईचे नाव बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. तसेच सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत म्हणून राबवण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचेही ब्रिटनच्या संसदेत भरभरून कौतुक करण्यात आले.
‘डिजाइन इन लंडन, मॅन्युफॅक्चर इन महाराष्ट्र’चा नारा
महाराष्ट्राची आर्थिक ताकद जगभरातील उद्योजकांसमोर मांडताना एकनाथ शिंदे यांनी ‘डिजाइन इन लंडन, मॅन्युफॅक्चर इन महाराष्ट्र’ ही नवी आकर्षक संकल्पना मांडली. मुंबई आणि लंडन ही दोन्ही जागतिक आर्थिक केंद्रे असल्याने दोन्ही प्रदेशांमध्ये सहकार्याच्या अफाट संधी उपलब्ध आहेत. ब्रिटनने आपले हरित भांडवल (Green Capital) आणि प्रगत तंत्रज्ञान घेऊन महाराष्ट्रात यावे आणि फिनटेक, ग्रीन हायड्रोजन, डीप-टेक तसेच कौशल्य विकास या क्षेत्रांत गुंतवणूक करावी, असे आवाहन त्यांनी ब्रिटीश उद्योजकांना केले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्यनेते, मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांना काल House of Lords येथे ‘Commonwealth Public Leadership Recognition’ या सन्मानाने गौरविण्यात आले. त्यानंतर आज लंडनमधील ऐतिहासिक House of Commons येथे World Leadership Forum तर्फे… pic.twitter.com/OhgXAaNCQm — Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) September 10, 2026
credit – social media and Twitter
महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांबद्दल बोलताना त्यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, मुंबई कोस्टल रोड, अटल सेतू आणि वाढवण बंदराचा उल्लेख केला. या मेगा प्रोजेक्ट्समुळे महाराष्ट्र भविष्यात जागतिक व्यापाराचे मुख्य प्रवेशद्वार बनेल आणि राज्याला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sumatran Tiger Cubs: अत्यंत दुर्मिळ सुमात्रन वाघिणीने तीन बछड्यांना दिला जन्म; नामशेष होणाऱ्या प्रजातीसाठी ग्रीसमध्ये आशेचा किरण
प्रतिष्ठेचा ‘स्टेट्समनशिप पुरस्कार’ प्रदान
ब्रिटिश संसदेतील ‘महाराष्ट्र, भारत, यूके संवाद’ आणि आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्वासाठी आणि सार्वजनिक सेवेतील भरीव योगदानासाठी ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड फॉर ट्रान्सफॉर्मेटिव्ह लीडरशिप’ (Statesmanship Award) तसेच ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना शिंदे म्हणाले की, “हा सन्मान माझा वैयक्तिक नसून महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेचा, शेतकरी, कष्टकरी आणि माझ्या लाडक्या बहिणींचा सन्मान आहे”. एकनाथ शिंदे यांच्या या लंडन दौऱ्यामुळे भारत आणि ब्रिटनमधील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार असून महाराष्ट्रातील गुंतवणुकीला नवी गती मिळेल, असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहे.






