NASA Breaking : ...अखेर ती परतणार; एलॉन मस्क स्पेसएक्सचे अंतराळयान ISS वर दाखल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नासा: गेल्या 9 महिन्यांपासून भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळात स्थानकात अडकल्या आहेत. त्यांच्या परत येण्यासाठी नासा एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्ससोबत मिळून काम करत आहे. दोन दिवसांपूर्वी 16 मार्च रोजी दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर परतणार असल्याची अधिकृत माहिती नासाने जाहीर केली होती. मात्र, अंतराळवीरांची परत येण्याची योजना आणखी लांबणीवर पडली आहे.
तांत्रिक अडचणींमुळे रॉकेटचे उड्डाण होऊ शकले नाही
दोन्ही अंतरावीरांना परत आणण्यासाठी स्पेसएक्सचे फाल्कन रॉकेट चे 12 मार्च रोजी प्रक्षेपण होणार होते. मात्र, प्रक्षेपणादरम्यान तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या यामुळे फाल्कन उड्डाण घेऊ शकले नाही. NASA ने दिलेल्या माहितीनुसार, ग्राउंड सपोर्ट क्लॅम्प आर्मच्या हायड्रॉलिक सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने ही मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे.
ISS वर 280 दिवसांपासून अडकलेले अंतराळवीर
सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर जून 2024 मध्ये बोईंगच्या स्टारलाईनर स्पेसक्राफ्टमधून ISS वर गेले होते. त्यांचा हा प्रवास फक्त 8 दिवसांचा होता. मात्र, बोईंगच्या तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा प्रवास लांबला. स्टारलाईनरमध्ये हायड्रोजन गळती आणि थ्रस्टरच्या बिघडामुळे दोन्ही अंतराळवीरांना परत येण्यास विलंब झाला. नंतर सप्टेंबर 2024 मध्ये स्टारलाईनर रिकामे अवस्थेत पृथ्वीवर परत पाठवण्यात आले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ISS वरच राहिले.
एलॉन मस्क यांच्यावर अंतराळवीरांना परत आणण्याची जबाबदारी आणि बायडेनवर टीका
डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही अंतराळवीरांना सुरक्षित पृथ्वीवर परत आणण्याची जबाबदारी स्पेसएक्सचे CEO एलॉन मस्क यांच्यावर सोपवली आहे. ट्रम्प यांनी सुनिता विल्यम्सच्या परत येण्याच्या विलंबसाठी जो बायडेन प्रशासनाला जबाबदार धरले आहेत. ट्रम्प यांनी म्हटले होते की, “मी मस्कला दोन्ही शूर अंतराळवीरांना परत आणण्यास सांगितले आहे. तसेच त्यांनी जो बायडेन यांच्यावर टीका करत, बायडेन प्रशासनाने त्यांना अंतराळातच सोडले असल्याचेही म्हटले होते. त्यांच्या परत येण्यास विलंब होणार नाही अशी हामी देखील ट्रम्प यांनी दिली होती.
पुन्हा एकदा होणार लॉन्चिग
NASA नुसार, आता पुढील प्रयत्न 15 मार्च रोजी सकाळी 4:56 वाजता केला जाणार आहे. जर सर्व तांत्रिक अडचणी सोडवल्या गेल्या, तर स्पेसएक्सच्या मदतीने सुनीता आणि विलमोर यांना सुरक्षित पृथ्वीवर परत आणता येईल.
सुनिता विल्यम्स यांची भावनिक प्रतिक्रिया
दरम्यान सुनिता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्री अंतराळ स्थानकातून पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, पृथ्वीवर त्यांच्या परत येण्यात पुन्हा एकदा अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, “सगळ्यात कठीण बाब म्हणजे, पृथ्वीवरील लोकांना आमच्या परत येण्याबद्दल काही माहिती नाही. त्यांच्यासाठी हा एक भावनिक प्रसंग आहे. कदाचित आमच्यापेक्षाही जास्त.” हा त्यांच्यासाठी सर्वात कठीण काळ आहे.