Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: नीट पेपरफुटी प्रकरण: ‘RCC’चे संचालक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात

Maharashtra Breaking news marathi: मुंबईतील दुकाने आणि व्यापारी आस्थापनांवर मराठी भाषेतील फलक लावण्याच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या दुकानदाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यांच्याकडून दंड देखील वसूल केला जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 18, 2026 | 06:40 PM
Top Marathi News Today Live : देशातील 16 राज्यांत मान्सून दाखल; उत्तर भारतातही लवकरच सुरुवात

Top Marathi News Today Live : देशातील 16 राज्यांत मान्सून दाखल; उत्तर भारतातही लवकरच सुरुवात

Follow Us
Follow Us:

Maharashtra to National And International Breaking News:

मुंबईतील दुकाने आणि व्यापारी आस्थापनांवर मराठी भाषेतील फलक लावण्याचे आदेश देण्यात आले होते. अनेकांनी या आदेशाचे पालन करत त्यांच्या दुकांनावर मराठी भाषेतील फलक लावले. मात्र अद्यापही काही दुकानदारांनी या आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मात्र या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनाच्या कारवाईसोबतच राजकीय संघर्षही पेटल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिका प्रशासनाच्या या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत १.०५ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

 

The liveblog has ended.
  • 18 May 2026 06:27 PM (IST)

    18 May 2026 06:27 PM (IST)

    Kerala Politics: व्ही. डी. सतीशन यांचा शपथविधी; पहिल्याच बैठकीत महिलांसाठी मोठी घोषणा


    Kerala Politics
    :
     केरळ काँग्रेसचे नेते डि. व्ही. सतीनश यांनी सोमवारी (१८ मे)केरळच्या मुख्यमंत्रीपदाची म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यास लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. शपथविधीनंतर लगेचच झालेल्या यूडीएफ सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत जनतेसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

  • 18 May 2026 06:08 PM (IST)

    18 May 2026 06:08 PM (IST)

    रुपयाची घरसण होत असताना आता पंतप्रधानांची इज्जत घसरत नाही का? काँग्रेसचा संतप्त सवाल

    ‘देशात पेट्रोल व डिझेलची दरवाढ झाल्याने त्याचा मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. इंधन महाग झाल्याने खाद्यतेल, दुधासह सर्वच वस्तुंची महागाई होणार आहे. महागाईची ही झळ इराण युद्धामुळे झाल्याचे चित्र निर्माण करत जनतेने काटकसर व त्याग करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले परंतु ही महागाई केवळ युद्धामुळे नाही तर मोदी सरकारच्या १२ वर्षांतील चुकीच्या आर्थिक व परराष्ट्र धोरणांचा परिपाक आहे,’ असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

  • 18 May 2026 05:46 PM (IST)

    18 May 2026 05:46 PM (IST)

    मिरा-भाईंदरमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत; वनविभाग सतर्क

    भाईंदर पश्चिमेतील राई गाव परिसरात शुक्रवारी काळी संशयित बिबट्यासदृश प्राणी दिसल्याची घटना समोर आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा..

  • 18 May 2026 05:25 PM (IST)

    18 May 2026 05:25 PM (IST)

    रुपयाची घरसण होत असताना आता पंतप्रधानांची इज्जत घसरत नाही का?

    ‘देशात पेट्रोल व डिझेलची दरवाढ झाल्याने त्याचा मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. इंधन महाग झाल्याने खाद्यतेल, दुधासह सर्वच वस्तुंची महागाई होणार आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा...

  • 18 May 2026 04:50 PM (IST)

    18 May 2026 04:50 PM (IST)

    "मतदान करणाऱ्यांची तोंडं आता बंद का?" सांगलीतून काँग्रेसचा भाजपला थेट सवाल!

    सांगली पेट्रोल डिझेल गॅसच्या किमतीमध्ये झालेली दरवाढ आणि निर्माण झालेला तुटवडा याच्या विरोधात आज जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हा अध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत तीव्र निदर्शने करण्यात आली. भाजप काळामध्ये देशातील व्यवस्था विस्कळीत झाली असून याला केवळ मोदी सरकारच जबाबदार आहे. पाच राज्यांच्या निवडणुका नंतर आता दरवाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याचे नियोजन अगोदरच करायला हवे होते. गेल्या 14 वर्षापासून सर्वसामान्य जनता अच्छे दिन ची वाट पाहत आहे. पेट्रोल डिझेल मिळतच नाही मग वाचवायचे काय? भाजपला पाठिंबा देणारे घटक आणि मतदान करणारे नागरिकांची तोंडं आता बंद का आहेत? असा सवाल ही उपस्थित करण्यात आला.

  • 18 May 2026 04:45 PM (IST)

    18 May 2026 04:45 PM (IST)

    समृद्धी महामार्गावर कांद्याच्या हमीभावासाठी अंबादास दानवे आक्रमक! |

    राज्यात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. अनेक ठिकाणी कांदा फेकून देणे आणि कांद्याला आग लावण्याच्या घटना समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या कांद्याला वाढीव दर मिळावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर लगतच्या समृद्धी महामार्गावर ठाकरे गटाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. या आंदोलनाचे नेतृत्व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • 18 May 2026 04:40 PM (IST)

    18 May 2026 04:40 PM (IST)

    विधवा आणि घटस्फोटीतांचा पुनर्विवाह सोहळा 11 जोडप्यांचे विवाह थाटात संपन्न

    बुलढाण्यात एक नाही अनेक नवरदेव आणि नवरी खुशीत नाचत आहेत हे दृश्य पाहून मेहकरवासी अचंबित झाले हे आहेत विधवा घटस्फोटीत स्त्री पुरुष ज्यांचे सामूहिक विवाह झाले आहे तेही मोठी वरात काढून डिजे आणि वाद्यवृंद चे सोबतीने विशेष म्हणजे त्यांच्या मुलाबाळा चे साक्षीने त्यांचे सहित त्यांचे जीवन गाठी बांधल्या गेल्या आहेत बुलडाणा ची सेवाभावी संस्था मानस फाऊंडेशन आणि इतर सेवाभावी संस्था चे माध्यमाने बुलडाणा येथील मेहकर येथे आज समाजातील विधवा घटस्फोटीत स्त्री पुरुषांचे पुनर्विवाह मोठ्या थाटात संपन्न झाले आहे या संस्थेचे हे सहावे वर्ष आहे आज मेहकर येथे अकरा जोडप्यांचे विवाह संपन्न झाले आहे हा विवाह सोहळा अत्यंत भव्य दिव्य सोहळा असल्याने या अनोख्या विभागाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले.

  • 18 May 2026 04:35 PM (IST)

    18 May 2026 04:35 PM (IST)

    पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई ,मुख्य आरोपी गजाआड!

    भुसावळ येथे आजीकडे शिक्षणासाठी राहत असलेल्या मध्य प्रदेशातील सिवनी येथील अत्याचार करत तिचे धर्मांतरण व निकाह लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी मध्य प्रदेशातील सिवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्हा भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून तरुणाला अटक करण्यात आले आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.

  • 18 May 2026 04:30 PM (IST)

    18 May 2026 04:30 PM (IST)

    आगडगावात २० हजार भाविकांसाठी आमरस-पूरणपोळीचा महाप्रसाद, ७ हजार लिटर आमरस आणि ५०० जावई!

    अहिल्यानगर जिल्ह्यातील आगडगाव येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात अधिक मासानिमित्त भव्य धोंडे जेवणाचे आयोजन करण्यात आले. तब्बल ७ हजार लिटर आमरस, पुरणपोळी आणि महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी ५०० जावयांसह २० हजार भाविक उपस्थित होते.

  • 18 May 2026 04:25 PM (IST)

    18 May 2026 04:25 PM (IST)

    पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई ,मुख्य आरोपी गजाआड!

    भुसावळ येथे आजीकडे शिक्षणासाठी राहत असलेल्या मध्य प्रदेशातील सिवनी येथील अत्याचार करत तिचे धर्मांतरण व निकाह लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी मध्य प्रदेशातील सिवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्हा भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून तरुणाला अटक करण्यात आले आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.

  • 18 May 2026 04:20 PM (IST)

    18 May 2026 04:20 PM (IST)

    २१ वर्षीय मजुराचा इमारतीवरून पडल्याने मृत्यू , दोषींवर कारवाईची काँग्रेसची मागणी

    भाईंदर पूर्व येथील सेव्हन इलेव्हन कोर्टयार्ड या निर्माणाधीन इमारतीमध्ये काम करत असताना ११ व्या मजल्यावरून पडून २१ वर्षीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. मृत मजुराचे नाव आशिष असून, तो बांधकाम ठिकाणी मजूर म्हणून कार्यरत होता.

  • 18 May 2026 04:15 PM (IST)

    18 May 2026 04:15 PM (IST)

    पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई ,मुख्य आरोपी गजाआड!

    भुसावळ येथे आजीकडे शिक्षणासाठी राहत असलेल्या मध्य प्रदेशातील सिवनी येथील अत्याचार करत तिचे धर्मांतरण व निकाह लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी मध्य प्रदेशातील सिवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्हा भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून तरुणाला अटक करण्यात आले आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.

  • 18 May 2026 04:10 PM (IST)

    18 May 2026 04:10 PM (IST)

    तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’ एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे रायगड जिल्ह्याच्या विकासाला नवे पंख मिळत असताना, आता स्थानिक युवकांसाठी रोजगार आणि करिअरच्या नव्या वाटाही खुल्या होत आहेत. त्यामुळे रायगडचा तरुण ‌‘गगनभरारी‌’ घेण्यासाठी सज्ज होतोय . अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहात आधुनिक स्किल ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन करण्यात आले असून, एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी हे केंद्र मोठी संधी ठरणार आहे.

  • 18 May 2026 04:05 PM (IST)

    18 May 2026 04:05 PM (IST)

    महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांची महानगरपालिकेला भेट

    वसई विरार महानगरपालिकेमध्ये भेट दिली असता, सफाई कर्मचाऱ्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, ते तात्काळ सोडवण्यात यावे, असे निर्देश मी महानगरपालिका प्रशासनाला दिले. राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावावे, त्यांचे न्याय हक्क त्यांना मिळावे, यासाठी राज्यभर दौरे करणार."

  • 18 May 2026 04:00 PM (IST)

    18 May 2026 04:00 PM (IST)

    चीनच्या हाती लागला ‘विनाशकारी’ खजिना

    जागतिक स्तरावर युद्धाचे ढग दाटून आलेले असताना आणि विविध देशांमध्ये लष्करी वर्चस्वाची स्पर्धा लागलेली असतानाच, चीनच्या (China) हाती एक अमोघ अस्त्र लागले आहे. चीनच्या अत्यंत थंड आणि दुर्गम भागात भूगर्भशास्त्रज्ञांना एका मोठ्या सर्वेक्षणादरम्यान अत्यंत मौल्यवान आणि लष्करी दृष्टीने संवेदनशील असलेल्या १७ दुर्मिळ मृदा खनिजांचा (Rare Earth Minerals) शोध लावण्यात मोठे यश आले आहे. ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या खळबळजनक अहवालानुसार, हा शोध अशा वेळी लागला आहे जेव्हा अमेरिका, रशिया आणि युरोपीय देश हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे आणि सहाव्या पिढीतील लढाऊ विमाने विकसित करण्यासाठी धडपडत आहेत. या शोधामुळे जागतिक संरक्षण बाजारपेठेतील चीनची मक्तेदारी आता अभेद्य होण्याची चिन्हे आहेत. वाचा सविस्तर

  • 18 May 2026 03:55 PM (IST)

    18 May 2026 03:55 PM (IST)

    उकाड्याने हैराण संभाजीनगरकरांसाठी गूड न्यूज! मान्सूनचे अंदमानात आगमन; मराठवाड्यात ‘या’ तारखेला बरसणार सरी

    छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): एकीकडे संभाजीनगर शहर जिल्ह्यासह मराठवाडा आणि राज्यभरात उष्णतेचा कहर सुरु असल्याने लोक त्रासले आहेत तर दुसरीकडे मान्सूनने अंदमान बेटांवर आगमन केल्याची आनंद वार्ता आहे. हवामान खात्याने जाहीर केल्याप्रमाणे वेळेच्या चार दिवस आधीच मान्सूनची वाटचाल सुरु आहे. या वेगाने प्रगती राहिल्यास जूनच्या पहिल्या आठवड्याअखेरीस मराठवाड्यात आणि संभाजीनगर जिल्ह्यात मान्सूनच्या सरी बरसण्यास सुरुवात होण्याची दाट शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर

  • 18 May 2026 03:50 PM (IST)

    18 May 2026 03:50 PM (IST)

    इराणने 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी नवीन संस्थेची स्थापना

    जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक असलेल्या स्ट्रेट ऑफ होर्मुझचे व्यवस्थापन करण्यासाठी इराणने पर्शियन गल्फ स्ट्रेठ ऑथॉरिटी(PGSA) नावाच्या संस्थेची स्थापना केली आहे. इराणच्या 'सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदे'ने दिलेल्या माहितीनुसार, ही संस्था स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील विविध कारवाया आणि तिथे घडणाऱ्या घडामोडींची तात्काळ माहिती जारी करेल. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा पश्चिम आशियातील तणाव आणि सागरी सुरक्षेबाबात चिंता वाढत आहे.

     

     

  • 18 May 2026 03:45 PM (IST)

    18 May 2026 03:45 PM (IST)

    ४३ अंश तापमानात शाळा तपासणीचे फर्मान! छत्रपती संभाजीनगरमधील शिक्षक आक्रमक

    राष्ट्रीय कार्य जनगणनेची शिक्षकांना ड्युटी देण्यात आली आहे. ही मोहीम उन्हाळ्याच्या सुट्यात होणार असल्याने शिक्षकवर्गात नाराजी आहे. दोन्ही कामे करताना प्रचंड ओढाताण होणार आहे. त्यातच भर उन्हात ही कामे करावी लागणार असल्याने शिक्षकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर राहणार आहे. यासाठी १५ जूननंतर ही मोहीम राबवावी अशी मागणी शिक्षकवर्गातून होते आहे. याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन देण्यात आले आहे. १८ मे ते ३० मे दरम्यान रखरखत्या उन्हात प्रशासनाकडून होणारी शाळा तपासणीचा नेमका उद्देश काय आहेत? वाचा सविस्तर

  • 18 May 2026 03:40 PM (IST)

    18 May 2026 03:40 PM (IST)

    अमेरिकेच्या छातीवर रशिया आणि इराणचे ‘300’ ड्रोन तैनात; ट्रम्पचा क्युबाला थेट लष्करी कारवाईचा इशारा

    जागतिक भू-राजकारणात सध्या अत्यंत खळबळजनक आणि तितकीच धोकादायक घडामोड समोर आली आहे. अमेरिकेचे कट्टर शत्रू मानले जाणारे रशिया आणि इराण (US-Israel Iran War) यांनी मिळून अमेरिकेला तिच्याच दारात घेरण्याची संपूर्ण तयारी केली आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या धक्कादायक अहवालानुसार, अमेरिकेच्या अगदी जवळ असलेल्या क्युबा या द्वीपकल्पीय देशाने रशिया आणि इराणकडून ३०० हून अधिक अत्याधुनिक आणि घातक लष्करी ड्रोन खरेदी केले आहेत. अमेरिकन न्यूज वेबसाईट ‘ॲक्सिऑस’ (Axios) ने दिलेल्या वृत्तामुळे वॉशिंग्टन आणि ट्रम्प प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली असून, हा अमेरिकेला एकाच वेळी अनेक बाजूंनी वेढण्याचा रशियन-इराणी प्लॅन असल्याचे बोलले जात आहे. वाचा सविस्तर

  • 18 May 2026 03:35 PM (IST)

    18 May 2026 03:35 PM (IST)

    Maruti Suzuki च्या उत्पादन क्षमतेत आता होणार वाढ, हरियाणात सुरु केला आणखी एक प्लांट

    भारतीय वाहन उद्योगात आघाडीवर असलेल्या Maruti Suzuki ने हरियाणातील खारखोडा येथे आपल्या दुसऱ्या उत्पादन प्रकल्पातून वाहन निर्मिती सुरू करत उद्योग क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. वाढती ग्राहक मागणी, SUV वाहनांची लोकप्रियता आणि भविष्यातील बाजारपेठेचा विचार करून कंपनीने उत्पादन विस्ताराचा निर्णय घेतला आहे. झपाट्याने बदलत असलेया भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात ग्राहकांची मागणी लक्षात घेत Maruti Suzuki ने हे पाऊल उचलले असून कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. वाचा सविस्तर

  • 18 May 2026 03:30 PM (IST)

    18 May 2026 03:30 PM (IST)

    KL Rahul रॉयल्स विरुद्ध ‘ही’ खेळी करत मोडला डिविलियर्सचा रेकॉर्ड

    IPL 2026/KL Rahul: आयपीएलचा अंतिम सामना होण्यासाठी केवळ 10 ते 12 दिवस उरले आहेत. 26 तारखेपासून प्ले ऑफचे सामने सुरू होणार आहेत. मात्र अद्याप टॉप 4 संघ निश्चित झाले नाहीत. आरसीबीचा संघ क्वालिफाय झाला आहे. तर अजूनही 3 जागा रिकाम्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सने काल राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे. त्या सामन्यात केएल राहुलने एक नवा विक्रम रचला आहे. त्याबाबत जाणून घेऊयात. वाचा सविस्तर

  • 18 May 2026 03:25 PM (IST)

    18 May 2026 03:25 PM (IST)

    ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर तेलाच्या किमतीत मोठी वाढ

    ट्रम्प यांनी सोमवारी(१८ मे) इराणला गंभीर इशारा दिला आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय तेल बाजारात मोठी तेजी दिसून आली. ट्रम्प यांनी इराणसोबत शांतता करार करण्यासाठी वेळ निघून जात असल्याचते म्हटले. या नंतर कच्चा तेलाच्या किमतीत जवळपास २% वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल ११०.७२ डॉलरवर पोहोचली आहे. तर अमेरिकेचे ब्रेंट क्रूड ऑईल १०७.२८ डॉलर्स प्रति बॅरलवर आहे. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांच्या विधानामुळे मध्यपूर्वेतील तणावा वाढून बाजारातील परिस्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता आहे.

     

  • 18 May 2026 03:20 PM (IST)

    18 May 2026 03:20 PM (IST)

    पंतप्रधान मोदींचा स्वीडन दौरा पूर्ण; भारत-स्वीडन संबंधांना स्ट्रेटेजिक पार्टनरशिपचा दर्जा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसीय स्वीडव दौरा संपुष्टात आला आहे. या दौऱ्यात त्यांनी दोन्ही देशांच्या संबंधाना स्ट्रेटेजिक पार्टनशिप संबोधले आहे. याअंतर्गत दोन्ही देशात पुढील पाच वर्षासाठी द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि तंत्रज्ञान कॉरिडॉर सुरु करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींना स्वीडनच्या क्राउन प्रिन्स व्हिक्टोरिया स्वीडनमधील सर्वोच्च नागरी पुरस्कार रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टारने स्नमानित करण्यात आले. हा पुरस्कार पंतप्रधानांनी भारतातील १.४ अब्ज नागरिकांना समर्पित केला. सध्या पंतप्रधान मोदी नॉर्वेत दाखल झाले आहेत. येथे ते  'भारत-नॉर्डिक शिखर परिषदे'मध्ये सहभागी होतील.

    My visit to Sweden was marked by several important outcomes that will add new momentum to India-Sweden relations.

    From elevating our ties to a Strategic Partnership, launching the Joint Innovation Partnership 2.0 and the India-Sweden Technology and Artificial Intelligence… pic.twitter.com/KhzfaXbSey

    — Narendra Modi (@narendramodi) May 18, 2026

  • 18 May 2026 03:15 PM (IST)

    18 May 2026 03:15 PM (IST)

    गाझात २४ तासांत ६ पॅलेस्टिनी ठार, ४० जखमी

    सध्या गाझामध्येही इस्रायलचे हल्ले सुरुच आहे. गाझा आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत इस्रायलने भीषण हल्ले केले असून यामध्ये ६ पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत. तर ४० जण जखमी झाले आहेत. याशिवाय अनेक लोक इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडले आहेत. या लोकांपर्यंत मदत आणि बचाव पथकांना पोहोचण्यात अडथळा येत आहे. सतत होणारे हल्ले आणि बाधित क्षेत्रांची झालेली दुरवस्था यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत असल्याचे गाझा आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

  • 18 May 2026 03:10 PM (IST)

    18 May 2026 03:10 PM (IST)

    युद्धबंदीसाठी अमेरिकेने इराणसमोर ठेवल्या ५ अटी

    पश्चिम आशियातील तणाव कमालीचा वाढला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वांरवार इराणविरोधी मोठ्या कारवाईचे संकेत मिळत आहे. दरम्यान इराणसोबत शांतता प्रक्रिया पुढे नेण्यासाठी अमेरिकेने नव्या पाच अटी ठेवल्या असल्याचा दावा इराणच्या माध्यमांनी केला आहे.

    या अहवालानुसार,

    • बॉम्बहल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानची अमेरिका कोणतीही भरपाई करणार नाही. त
    • सेच इराणने त्यांच्याकडील ४०० किलोग्राम समृद्ध युरेनियम साठा अमेरिकेच्या स्वाधीन करावा असेही या अटींमध्ये नमूद आहे.
    • तसेच इराणम्ध्ये केवळ एकच अणुउर्जा केंद्र कार्यरत असावे अशी मागणीही अमेरिकेने केली आहे.
    • याशिवाय इराणची गोठवण्यात आलेली मालमत्ता मुक्त करण्याचा अमेरिकेचा हेतू नाही.
    • तसेच सर्व आघाड्यांवरील युद्ध संपवण्याच्या मुद्द्यावर चर्चेतून तोडगा काढला असे अमेरिकेने म्हटले आहे.

    मात्र, अद्याप या प्रस्तावाबाबत इराण किंवा अमेरिकेकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

  • 18 May 2026 03:05 PM (IST)

    18 May 2026 03:05 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी ओस्लोमध्ये दाखल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे दाखल झाले आहेत. विमानतळावर नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोअर यांनी त्यांचे स्वागत केले. १९ मे रोजी ओस्लो येथे होणाऱ्या तिसऱ्या 'भारत-नॉर्डिक शिखर परिषदे'मध्ये पंतप्रधान मोदी सहभागी होतील.

    #WATCH | Prime Minister Narendra Modi landed in Oslo, Norway. He was received at the airport by Norway PM Jonas Gahr Store.

    PM Modi will attend the third India-Nordic Summit in Oslo on May 19. pic.twitter.com/CUcOtTDPBV

    — ANI (@ANI) May 18, 2026

  • 18 May 2026 03:00 PM (IST)

    18 May 2026 03:00 PM (IST)

    नमाज पढण्यावरून CM योगी आदित्यनाथांचा मोठा इशारा

    Yogi Adityanath News Marathi : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बकरीद सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रस्त्यावर नमाज अदा करण्याच्या मुद्द्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, जर तुम्हाला नमाज अदा करायची असेल, तर ती शिफ्टमध्ये अदा करा. जर ते प्रेमाने तयार असतील, तर ठीक आहे; नाहीतर, आम्ही दुसरी पद्धत अवलंबू. राज्याची राजधानी लखनौ येथे एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले. वाचा सविस्तर

  • 18 May 2026 02:57 PM (IST)

    18 May 2026 02:57 PM (IST)

    विधानसभा क्षेत्रातील 14 गावातील उत्तरशिव गावातील ग्रामस्थांनी म्हाडा प्रकल्पाला विरोध

    उत्तरशिव गावात गुरचरण जागेवर म्हाडा (MHADA) गृहनिर्माण प्रकल्प स्थगित दयावी अशी मागणी करत त्यांनी सर्वेला विरोध केला असून आपल्याला तिखट प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या आहेत

  • 18 May 2026 02:45 PM (IST)

    18 May 2026 02:45 PM (IST)

    “भाडेकरू पडताळणी करा, बकरी ईद शांततेत साजरी करा”

    मिरा-भाईंदर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा वरिष्ठ नेते मुझफ्फर हुसैन यांनी पत्रकार परिषद घेत शहरातील सुरक्षिततेसाठी भाडेकरूंची पडताळणी आवश्यक असल्याचे सांगितले.

    प्रॉपर्टी डीलर्स, एजंट्स आणि सोसायटींनी आधार कार्ड, पॅन कार्ड व पोलिस व्हेरिफिकेशनसह सर्व कागदपत्रांची तपासणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

    तसेच येणारी बकरी ईद शांतता आणि सौहार्द राखून, कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेत साजरी करण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.

  • 18 May 2026 02:36 PM (IST)

    18 May 2026 02:36 PM (IST)

    भाईंदरमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत?

    भाईंदर पश्चिमेतील राई गाव परिसरात शुक्रवारी सायंकाळी संशयित बिबट्यासदृश प्राणी दिसल्याची घटना समोर आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. मात्र, संबंधित प्राणी खरोखरच बिबट्या आहे की अन्य वन्यप्राणी, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
    मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर पश्चिमेतील शिवम गार्डन परिसरातील एका महिला रहिवाशाने आपल्या इमारतीच्या बाल्कनीतून मोकळ्या मैदानात फिरणाऱ्या एका प्राण्याचा व्हिडिओ चित्रित केला. व्हिडिओमध्ये तो प्राणी इमारतीमागील गटारालगतच्या जागेत शांतपणे फिरताना दिसत असून काही वेळातच तो नजरेआड झाल्याचे सांगितले जात आहे.

  • 18 May 2026 02:24 PM (IST)

    18 May 2026 02:24 PM (IST)

    निवृत्त झालेली युद्धनौका “आयएनएस गुलदार” सिंधुदुर्गच्या समुद्रतळाशी विसावणार

    निसर्ग संपन्न कोकण किनारपट्टीच्या शिरपेचात आता एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतीय नौदलातून ३९ वर्षाच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झालेली युद्धनौका “आयएनएस गुलदार” आता सिंधुदुर्गच्या समुद्रतळाशी विसावणार आहे. ही युद्धनौका विजयदुर्ग बंदरातून निवतीच्या दिशेने मार्गस्थ झाली असून तिथे तिला आता विधिवत जलसमाधी दिली जाणार आहे. गेल्या नऊ महिन्यापासून विजयदुर्ग बंदरात असलेल्या या जहाजाने अखेर निवतीच्या दिशेने आपला शेवटचा प्रवास सुरू केला. हे जहाज सोमवारी पहाटे निवतीत पोहोचले आहे. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या नकाशावर एक प्रमुख “अंडरवॉटर टुरिझम” केंद्र म्हणून नावारूपास येणार आहे. तसेच पर्यटनाचे एक नवीन दालन उभे राहणार आहे. निवती येथील समुद्रतळाशी हे जहाज स्थापित करून तेथे आहे. यामुळे समुद्रीजीवांना हक्काचे घर मिळेलच पण सोबतच स्कुबा डायविंग करणाऱ्या पर्यटकांसाठी हे मोठे एक जागतिक आकर्षण ठरणार आहे.

  • 18 May 2026 02:13 PM (IST)

    18 May 2026 02:13 PM (IST)

    भिवंडीत प्रसूतीदरम्यान माता-बालकाचा मृत्यू

    भिवंडी शहरातील गायत्री नगर परिसरातील अल फलाह क्लिनिकमध्ये प्रसूतीदरम्यान गर्भवती महिलेसह नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहनाज मोहम्मद जावेद अन्सारी (30) असे मृत महिलेचे नाव असून तिच्यावर याच क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते. शनिवारी रात्री प्रसूती वेदना सुरू झाल्याने तिला क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र डिलिव्हरीदरम्यान आई व बाळाचा मृत्यू झाला.

  • 18 May 2026 02:06 PM (IST)

    18 May 2026 02:06 PM (IST)

    लातूरातील नामांकित खासगी क्लासेसवर CBIचा रात्री छापा

    लातूर शहरातील एका नामांकित खासगी क्लासेसच्या कार्यालयात सीबीआयच्या पथकाने रविवारी रात्री अचानक तपासणी करत झाडाझडती सुरू केली. दोन दिवसांपूर्वी संबंधित क्लास चालकांच्या घरी जाऊन चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा चार सदस्यीय सीबीआय पथकाने क्लासेसच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रांची पडताळणी आणि तपासणी केली. रात्री उशिरापर्यंत हे पथक कार्यालयात उपस्थित होते.

  • 18 May 2026 01:58 PM (IST)

    18 May 2026 01:58 PM (IST)

    कांद्याच्या दरासाठी लासलगावात शेतकऱ्यांचा एल्गार

    कांद्याला अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. लासलगाव बाजार समितीत आज शेतकऱ्यांनी एल्गार आंदोलन सुरू करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कांद्याला किमान 3000 रुपये हमीभाव आणि 1500 रुपये अनुदान तातडीने जाहीर करावे, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे.

  • 18 May 2026 01:47 PM (IST)

    18 May 2026 01:47 PM (IST)

    संभाजीनगरात कांद्याच्या घसरत्या दरांविरोधात ठाकरे गटाचा एल्गार!

    कांद्याचे दर सतत कमी होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. याच्या निषेधार्थ संभाजीनगरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना कांद्याला हमीभाव द्यावा आणि तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. कांदा उत्पादकांच्या अडचणींमुळे परिसरातील राजकीय वातावरणही तापले आहे.

  • 18 May 2026 01:39 PM (IST)

    18 May 2026 01:39 PM (IST)

    लातूरमध्ये CBIची चौकशी वेगात; NEET पेपरफुटी प्रकरणात मोठ्या हालचाली

    NEET पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी CBIचे पथक गेल्या चार दिवसांपासून लातूरमध्ये ठाण मांडून आहे. कोचिंग क्लासेस, संशयास्पद व्यवहार आणि संबंधित व्यक्तींची कसून चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणांनी पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया वेगवान केली असून या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी चर्चा रंगली आहे.

  • 18 May 2026 01:27 PM (IST)

    18 May 2026 01:27 PM (IST)

    गडचिरोलीत डिझेल टंचाईचा फटका; शेतीची कामे ठप्प

    गडचिरोली जिल्ह्यात डिझेलची मोठी कमतरता निर्माण झाल्याने नागरिकांसह शेतकरी अडचणीत आले आहेत. अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्याने वाहनधारकांची गैरसोय वाढली आहे. शेतीच्या महत्त्वाच्या काळात ट्रॅक्टर, पंप आणि कृषी यंत्रणा बंद पडल्याने शेतकामांवर परिणाम झाला असून, तातडीने डिझेल पुरवठा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

  • 18 May 2026 01:13 PM (IST)

    18 May 2026 01:13 PM (IST)

    गडचिरोलीत इंधन संकट तीव्र; डिझेलसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा

    गडचिरोली जिल्ह्यात डिझेलच्या कमतरतेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल पंपांवर वाहनांच्या सुमारे 4 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या असून इंधनासाठी रांगेत थांबावे लागत आहे. या परिस्थितीमुळे वाहतूक व्यवस्था आणि दैनंदिन कामांवर परिणाम झाला असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • 18 May 2026 01:07 PM (IST)

    18 May 2026 01:07 PM (IST)

    शिवराज मोटेगावकर यांना अटक

    नीट पेपरफुटीप्रकरणी अखेर लातूर येथील आरसीसी कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयकडून ११ तासांच्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली.

  • 18 May 2026 01:02 PM (IST)

    18 May 2026 01:02 PM (IST)

    दिवे घाटात हातात कोयते अन् बुलेटस्वारांचा धुडगूस

    १३ मे रोजी रात्री दिवे घाटात हातात नंग्या तलवारी आणि लोखंडी कोयते घेवून भररस्त्यात नंगानाच करणाऱ्या टोळी विरोधात सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४० ते ५० बुलेटगाड्या आणि त्यावरील चालक आणि त्यांचे सहकारी अशा एकूण १०० व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता त्यांच्यावरील कारवाईकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

  • 18 May 2026 12:48 PM (IST)

    18 May 2026 12:48 PM (IST)

    झोपेत असलेल्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला

    मावळ तालुक्यातील निळशी गावात झोपेत असलेल्या व्यक्तीवर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वडगाव मावळ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हरिभाऊ वसंत कांबळे (वय २४, रा. ढोरेवाडा, वडगाव मावळ) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे चुलते कुलदीप चंद्रकांत कांबळे (वय ३४, सध्या रा. दहिसर, मुंबई) हे गावातील प्रमोद दत्तात्रय म्हसे यांच्या टेरेसवर झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अचानक हल्ला केला आहे.

  • 18 May 2026 12:36 PM (IST)

    18 May 2026 12:36 PM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

    राज्यात कर्करोगाच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. वेळेत निदान आणि उपचार मिळाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. यासाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ‘कर्करोग ग्रीड’ तयार करण्यात येत आहे. पुणे महापालिकेने सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

  • 18 May 2026 12:24 PM (IST)

    18 May 2026 12:24 PM (IST)

    शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईताला ठोकल्या बेड्या

    पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांत शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईताला अलंकार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कारच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या आरोपीकडून १२ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राजू बाबूराव जावळकर (वय व ५७, रा. डोणजे फाटा, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ निरीक्षक उल्हास कदम, पोलिस निरीक्षक स्मिता पाटील, उपनिरीक्षक गणेश दीक्षित, पोलिस अंमलदार धीरज पवार, सोमेश्वर यादव, माधुरी कुंभार, राकेश क्षीरसागर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

  • 18 May 2026 12:12 PM (IST)

    18 May 2026 12:12 PM (IST)

    पुण्यात 'हिट अँड रन', 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

    दारू पिऊन भरधाव वेगात कार चालवून रस्त्याच्या कडेला उभारलेल्या चारचाकी तसेच दुचाकींना उडवून झालेल्या भीषण अपघातात एका चार वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर, दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या चालकाला पळून जाताना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा अपघात शनिवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास झाला आहे. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. यशराज निलेश कांबळे (रा. धायरी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर, त्याचे वडिल निलेश अरूण कांबळे (वय ३६) व आई असे गंभीररित्या जखमी झाले आहेत. याप्रकरणी नांदेडसिटी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी कार चालक अमोल गोरक्षनाथ गेगडे (वय ३२, रा. अहिल्यानगर) याला अटक केली आहे.

  • 18 May 2026 11:30 AM (IST)

    18 May 2026 11:30 AM (IST)

    Global Digital Crisis 2026:  होर्मुझ खाडीतील अंडरसी केबल्सवर 'डिजिटल टॅक्स' वसूलण्याची इराणची धमकी 

    अमेरिका आणि इराणमधील वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर आता जागतिक इंटरनेट व्यवस्थेवर मोठे संकट घोंघावू लागले आहे. गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या युद्धामुळे होर्मुझची खाडी (Strait of Hormuz) आधीच व्यापारी जहाजांसाठी बंद असून जगाला ऊर्जा संकटाचा सामना करावा लागत आहे. अशातच, इराण आता जगाची 'डिजिटल नस' दाबण्याच्या तयारीत असून समुद्राखालून जाणाऱ्या इंटरनेट फायबर-ऑप्टिक केबल्सना (Undersea Internet Cables) नवे शस्त्र बनवण्याची धमकी दिली आहे.

    काय आहे इराणची नवी रणनीती?

    इराणी रेव्होल्युशनरी गार्ड्सशी (IRGC) संबंधित सैन्य प्रवक्ते इब्राहिम जोलफघारी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, या केबल्सवर इराणकडून शुल्क (टोल टॅक्स) वसूल करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

    गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा आणि ॲमेझॉन सारख्या दिग्गज जागतिक टेक कंपन्यांचा डेटा या भागातून ट्रान्सफर होतो. इराणच्या नव्या नियमांनुसार, या कंपन्यांना इराणी कायद्यांचे पालन करावे लागेल आणि ट्रॅफिक फी द्यावी लागेल.

    या अंडरसी केबल्सच्या दुरुस्ती आणि देखभालीचे संपूर्ण नियंत्रण केवळ इराणी कंपन्यांनाच दिले जावे, अशी अट इराणने ठेवली आहे.

  • 18 May 2026 11:25 AM (IST)

    18 May 2026 11:25 AM (IST)

    Gold Rate Today India - 18 May 2026:  सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांना दिलासा 

    Gold Rate Today India - 18 May 2026:    सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजारातून ग्राहकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोमवार, १८ मे २०२६ रोजी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत लक्षणीय घसरण नोंदवण्यात आली आहे. अधिकमासाच्या (धोंड्याचा महिना) शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.

    प्रमुख शहरांमधील आजचे दर (प्रति १० ग्रॅम):

    राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव घसरून १,५७,०७० रुपये इतका झाला आहे.

    गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळाली होती, ज्यामध्ये २४ कॅरेट सोन्यात ६,५४० रुपये तर २२ कॅरेट सोन्यात तब्बल ६,४७० रुपयांची वाढ झाली होती. मात्र, आज झालेल्या घसरणीमुळे ही दरवाढ काहीशी आटोक्यात आली आहे.

  • 18 May 2026 11:20 AM (IST)

    18 May 2026 11:20 AM (IST)

     तमिळ सिनेसृष्टीला मोठा धक्का; प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते के. राजन यांची नदीत उडी मारून आत्महत्या

    Tragic News from Tamil Cinema : तमिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते के. राजन (वय ८५) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्या या अचानक जाण्याने संपूर्ण दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गेल्या काही काळापासून ते आपल्या कुटुंबीयांपासून वेगळे आणि एकटेच राहत होते, अशी माहिती समोर आली आहे.

    आत्महत्येच्या दिवशी के. राजन हे त्यांच्या चालकासोबत (ड्रायव्हर) वॉशरमॅनपेट येथून कारने निघाले होते. त्यांची कार जेव्हा चेन्नईमधील अड्यार येथील कूवम नदीच्या पुलावर पोहोचली, तेव्हा त्यांनी चालकाला गाडी थांबवण्यास सांगितली. 'मी थोडं चालून येतो,' असे सांगत ते कारमधून खाली उतरले आणि पुलावरून पुढे गेले.  चालक काही समजण्याच्या आतच, त्यांनी अचानक पुलावरून कूवम नदीच्या पात्रात उडी घेतली.

  • 18 May 2026 11:15 AM (IST)

    18 May 2026 11:15 AM (IST)

    Crime Against Women: अकाली दलाच्या बड्या नेत्याकडून बोर्डिंग स्कूलच्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन 

    देशभरात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच, पंजाबमधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका बड्या राजकीय नेत्याने बोर्डिंग स्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा खळबळजनक आरोप झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिरोमणी अकाली दलाचे नेते जसकरणजीत सिंग देओल (रा. लुधियाना) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    बोर्डिंग स्कूलच्या पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी नेत्याने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीने या कृत्याला कडाडून विरोध केला असता, तिला गुंडांमार्फत धमकावण्यात आले आणि तोंड बंद ठेवण्यास सांगण्यात आले.

  • 18 May 2026 11:10 AM (IST)

    18 May 2026 11:10 AM (IST)

    Miraculous Rescue in Betul: देव तारी त्याला कोण मारी! भरधाव कार ३५ फूट खोल विहिरीत कोसळली   

    सध्या देशभरात बेजबाबदारपणे आणि अतिवेगाने वाहने चालवल्यामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या चिंताजनक रितीने वाढली आहे. अशीच एक थरारक आणि अंगावर काटा आणणारी घटना मध्य प्रदेशातील बेतुल जिल्ह्यात घडली आहे. ब्रेक निकामी झाल्यामुळे एक भरधाव कार थेट ३५ फूट खोल विहिरीत कोसळली. या कारमध्ये महाराष्ट्रातील अमरावती येथील तीन तरुण प्रवास करत होते. मृत्यू डोळ्यांसमोर दिसत असतानाच, 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यक्ष प्रत्यय या तरुणांना आला आणि त्यांचे प्राण थोडक्यात वाचले.

    अपघाताचा थरार आणि बचावकार्य:

     कारचा वेग जास्त असताना अचानक तिचे ब्रेक निकामी झाले आणि नियंत्रण सुटल्याने कार थेट ३५ फूट खोल विहिरीत जाऊन कोसळली.

     अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक गावकऱ्यांनी मदतीसाठी तातडीने विहिरीकडे धाव घेतली. गावकऱ्यांनी आणि '१०८' रुग्णवाहिकेच्या पथकाने जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरून तिन्ही तरुणांना यशस्वीपणे बाहेर काढले.

    वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी हे तिन्ही तरुण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या भैंसदेही येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 18 May 2026 11:05 AM (IST)

    18 May 2026 11:05 AM (IST)

    IPL 2026: DC vs RR: मिचेल स्टार्कची भेदक गोलंदाजी आणि अक्षर-आशुतोषची फटकेबाजी 

    आयपीएल २०२६ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने (DC) आपल्या घरच्या मैदानावरील शेवटच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा (RR) ५ गडी राखून पराभव केला आणि प्ले-ऑफच्या शर्यतीतील आपले आव्हान कायम राखले आहे. दिल्लीच्या या विजयाचा शिल्पकार ठरला धुरंधर गोलंदाज मिचेल स्टार्क, ज्याने शानदार गोलंदाजी करत ४ बळी घेतले. त्यानंतर विजयासाठी मिळालेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना अखेरच्या षटकांमध्ये अक्षर पटेल आणि इम्पॅक्ट प्लेयर आशुतोष शर्मा यांनी झंझावाती फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

    आयपीएल गुणतालिकेत (Points Table) मोठी उलथापालथ: या सामन्यानंतर प्ले-ऑफच्या गणितात मोठे बदल पाहायला मिळत आहेत:

    दिल्ली कॅपिटल्स (DC): १३ सामन्यांत १२ गुणांसह दिल्लीचा संघ आता थेट सातव्या स्थानावर पोहोचला आहे.

    राजस्थान रॉयल्स (RR): या पराभवामुळे राजस्थानचा संघ १२ सामन्यांत १२ गुणांसह सहाव्या स्थानावर घसरला आहे.

    चेन्नई सुपर किंग्ज (CSK): चेन्नईचेही १२ सामन्यांत १२ गुण आहेत, मात्र सरस नेट रनरेटच्या (NRR) जोरावर ते पाचव्या स्थानावर कायम आहेत.

Web Title: 18th may 2026 maharashtra to national and international breaking news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 08:48 AM

Topics:  

  • international news
  • Maharashtra Breaking News update
  • Middle East War Impact
  • national news

संबंधित बातम्या

130th  Constitutional Amendment Bill: ३० दिवस तुरुंगात राहिल्यास मुख्यमंत्री-पंतप्रधानांचे पद जाणार! १३० वे घटनादुरुस्ती विधेयक
1

130th Constitutional Amendment Bill: ३० दिवस तुरुंगात राहिल्यास मुख्यमंत्री-पंतप्रधानांचे पद जाणार! १३० वे घटनादुरुस्ती विधेयक

US Military Bases : अमेरिकेची आखाती देशांतून मोठी माघार; 89 लष्करी तळांपैकी निवडक तळ बंद होणार, का वाढली भारताची चिंता?
2

US Military Bases : अमेरिकेची आखाती देशांतून मोठी माघार; 89 लष्करी तळांपैकी निवडक तळ बंद होणार, का वाढली भारताची चिंता?

धक्कादायक! व्हेनेझुएलातुन राकेशचा मृतदेह भारतात आणताच कुटुंब हादरलं! शरीरातून हृदय आणि मेंदूसह २१ अवयव गायब; नेमकं काय घडलं?
3

धक्कादायक! व्हेनेझुएलातुन राकेशचा मृतदेह भारतात आणताच कुटुंब हादरलं! शरीरातून हृदय आणि मेंदूसह २१ अवयव गायब; नेमकं काय घडलं?

Maharashtra Breaking News Updates Today: मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनचा जोर  वाढला
4

Maharashtra Breaking News Updates Today: मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनचा जोर  वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.