
FIFA world cup 2026 france vs morocco london football violence news
France vs Morocco World Cup 2026 : फिफा विश्वचषक २०२६ (France vs Morocco World Cup 2026) मधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. फुटबॉलच्या मैदानावरील थरार आता रस्त्यावरील हिंसक संघर्षात बदलला आहे. गुरुवारी झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या उपांत्य पूर्व (Quarter-Final) सामन्यात फ्रान्सने मोरोक्कोचा २-० असा पराभव करत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. मात्र, या पराभवानंतर ब्रिटनची राजधानी लंडनच्या रस्त्यांवर मोरोक्कन चाहत्यांचा संताप अनावर झाला आणि तिथे भीषण हिंसाचार उसळला.
‘द सन’ या प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिलेल्या अहवालानुसार, फ्रान्सकडून मोरोक्कोचा पराभव झाल्याचे स्पष्ट होताच पश्चिम लंडनमध्ये मोठ्या संख्येने फुटबॉल चाहते रस्त्यावर उतरले. काही वेळातच या गर्दीला हिंसक वळण लागले. संतप्त दंगलखोरांच्या एका गटाने रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली आणि अनेक ठिकाणी जाळपोळ केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दंगलखोरांनी हल्ला केला. या चकमकीत एक पोलीस अधिकारी गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर या हिंसाचाराचे अनेक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून, त्यात सुरक्षा दल आणि दंगलखोर आमनेसामने आल्याचे दिसत आहे.
फ्रांस में मूल निवासी जब अपने देश की FIFA में क्वाटर फाइनल में जीत पर जश्न मनाना चाहते थे तभी उनके देश में बसी मजहबी विचारधारा एक बाहरी देश की हार पर पेरिस को फूंक रही है। यही France का डर भी था- फ्रांस जीते तो मोरक्को की हार पर पेरिस जला रहा है और अगर फ्रांस हारता तो मोरक्को… pic.twitter.com/QceoaGqg4K — Baliyan (@Baliyan_x) July 10, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : NATO Summit : शस्त्र की राजनैतिक खेळी? पंतप्रधान एर्दोगान यांनी ट्रम्प, मॅक्रॉन आणि स्टारमर भेट म्हणून दिली तुर्की बनावटीची पिस्तू
या ऐतिहासिक सामन्यात फ्रान्सच्या संघाने सुरुवातीपासूनच मोरोक्कोवर दबाव निर्माण केला होता. उत्तर आफ्रिकेची ताकद मानल्या जाणाऱ्या मोरोक्कोने पहिल्या हाफमध्ये फ्रान्सला गोल करू दिला नाही. फ्रान्सचा स्टार खेळाडू आणि कर्णधार किलियन एम्बाप्पे (Kylian Mbappé) याने पहिली पेनल्टी गमावली, पण त्यानंतर ६० व्या मिनिटाला त्याने एक अप्रतिम गोल करत फ्रान्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर अवघ्या ६ मिनिटांत (६६ व्या मिनिटाला) ओस्मान डेम्बेले (Ousmane Dembélé) याने दुसरा गोल करत फ्रान्सचा २-० असा विजय पक्का केला. या विजयासह फ्रान्सने सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
Paris🇫🇷 right now 💔 Morrocco fans have taken to the streets of Paris after losing World Cup to France.#Fifapic.twitter.com/rF1WYRSH4K — AajUpdate (@Rahul112113118) July 10, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Iran War: महासत्ता पुन्हा आमनेसामने; जिथे अली खामेनी यांना दफन केले जाणार दोन मोठे रेल्वे पूलच अमेरिकेने उडवले
सामन्यापूर्वी फ्रान्स आणि मोरोक्को यांच्यातील जुन्या वसाहतवादी इतिहासामुळे पॅरिसमध्ये मोठा हिंसाचार उसळण्याची भीती व्यक्त केली जात होती. हीच शक्यता लक्षात घेऊन फ्रेंच सरकारने संपूर्ण देशात २०,००0 हून अधिक आणि एकट्या पॅरिसमध्ये सुमारे ८,००० पोलीस कर्मचारी तैनात केले होते. सुदैवाने फ्रेंच सुरक्षा यंत्रणांच्या सर्तकतेमुळे पॅरिसमधील वातावरण पूर्णपणे शांत राहिले. तिथे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही आणि हजारो फ्रेंच चाहत्यांनी रस्त्यावर उतरून शांततेत विजयाचा जल्लोष साजरा केला. मात्र, पॅरिसऐवजी लंडनमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली.