सद्दामपासून शेख हसीनांपर्यंत; जगातील अनेक शक्तिशाली नेत्यांना मृत्युदंडाची शिक्षा
१९७९ मध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांना फाशी देण्यात आली आणि हा पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वांत वादग्रस्त निकाल आहे. भुट्टी थाना पाकिस्तानातील लोकशाही राजकारणातील एक आधारस्तंभ मानले जात होते, परंतु जनरल झिया-उल-हक यांच्या लष्करी राजवटीने त्यांना एका राजकीय प्रतिस्पर्ध्याच्या हत्येचा दोषी ठरवून फाशी दिली.
१९९६ मध्ये अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नजीबुल्लाह यांना तालिबानने फाशी दिली. त्यांच्या फाशीपूर्वी, तालिबानने त्यांना भयानक क्रूरता सहन करावी लागली. त्यांना सार्वजनिकरित्या फाशी देण्यात आली. हा अफगाण इतिहासातील सर्वांत भयानक निकाल आहे आणि तालिबान राजवटीच्या कठोर दिवसांची आठवण करून देतो.
१९५६ च्या हंगेरियन क्रांतीमध्ये असलेले पंतप्रधान इमरे नागी हे स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा आवाज म्हणून जगभर प्रसिद्ध झाले, त्यांनी सोव्हिएत युनियनविरुद्ध बंडाचे नेतृत्व केले, परंतु क्रांती अयशस्वी झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. १९५८ मध्ये एक गुप्त खटला चालला आणि त्यांना दोषी ठरवून फाशी देण्यात आली.
दुसऱ्या महायुद्धात जपानचे पंतप्रधान जनरल हिदेकी तोजो यांना युद्ध गुन्हे, मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि आक्रमक लष्करी कारवायांसाठी दोषी आढळून आले. टोकियो खटल्यांनंतर १९४८ मध्ये त्यांना फाशी देण्यात आली. तोजो लाखो मृत्यू आणि भयानक विनाशासाठी जबाबदार मानले जातात.
इराकीचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसैन है आधुनिका इतिहासात मृत्युदंड देण्यात आलेल्या सर्वांत प्रसिद्ध नेत्यांपैकी एक आहेत. त्यानी १९८० आणि १९९० च्या दशकात इराकवर राज्य केले. २००३ मध्ये अमेरिकेने इराकवर हल्ला केल्यानंतर त्यांना पकडले.
Saudi Bus Accident : ४५ भारतीयांवर सौदीमध्येच होणार अंत्यसंस्कार; बस अपघातामध्ये गमवला होता जीव
१९८९ व्या क्रांतीदरम्यान रोमानियाचे अध्यक्ष निकोला चाउसेस्कू यांना अटक करण्यात आली आणि त्यांची पत्नी एलेना यांच्यासह लष्करी न्यायालयाने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.
१९७५ मध्ये, सौदी अरेबियाचे राजपुत्र मकसूद बिन अब्दुल अझीझ यांना एका वादग्रस्त प्रकरणासाठी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली, त्यांचा जाहीरपणे शिरच्छेद करण्यात आला, त्यांचा खटला अनेक महिने आतरराष्ट्रीय मथळे बनला.
१९४९ मध्ये सीरियन राष्ट्राध्यक्ष होस्नी झाम यांना फाशी देण्यात आली. ते लष्करी उठावाद्वारे सत्तेवर आले, परंतु अवघ्या चार महिन्यांतच त्यांना आणखी एका उठावाचा सामना करावा लागला, नवीन लष्करी राजवटीने त्यांना देशद्रोह आणि सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल दोषी ठरवले आणि गोळ्या घालून मृत्युदंड दिला.






