Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Greenland Dispute : ‘ब्लॅकमेलिंगला बळी पडणार नाही’ ; टॅरिफ धमकीवर डेन्मार्कचा ट्रम्पला स्पष्ट इशारा

US Denmark Tension : ग्रीनलँडमुद्द्यावरून अमेरिका-युरोप तणाव शिगेला पोहोचला आहे. ट्रम्प यांनी युरोपीय देशांवर टॅरिफ लादले असून करार न झाल्या हे आणखी वाढवण्याची धमती दिली आहे. यावर डेन्मार्कने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 19, 2026 | 12:49 PM
Greenland Dispute

Greenland Dispute

Follow Us
Close
Follow Us:
  • ग्रीनलँड मुद्द्यावरून अमेरिका-युरोप तणाव शिगेला
  • ट्रम्पच्या टॅरिफ धमकीवर डेन्मार्कचे सडेतोड उत्तर
  • युरोप कोणत्याही ब्लॅकमेलला बळी पडणार नाही
US Denmark Tension Over Greenland : नूक : ग्रीनलँडवरुन अमेरिका (America) आणि युरोपमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ग्रीनलँडवर अमेरिकेच्या नियंत्रणाला युरोपमध्ये तीव्र विरोध होत आहे. यामुळे ट्रम्प यांनी संतापून 8 युरोपीय देशांवर टॅरिफ लावले आहे. तसेच ग्रीनलँड-अमेरिका करार न झाल्यास टॅरिफ अधिक वाढवण्याची धमकीही दिली आहे. दरम्यान ट्रम्प यांच्या या धमकीवर डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांनी कडक प्रतिक्रिया दिली आहे.

Greenland Protest : ‘आम्ही बिकाऊ नाही’ ; ग्रीनलँडमध्ये अमेरिकेच्या नियंत्रणाविरोधात जनआंदोलन अधिक तीव्र, VIDEO

डेन्मार्कच्या पंतप्रधानांची ट्रम्पच्या धमकीवर कठोर भूमिका

डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसेन यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या टॅरिफ धमकीवर कठोर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी युरोपला ब्लॅकमेल करणे सोपे नाही असे म्हटले आहे. तसेच ट्रम्प यांच्या कोणत्याही दबावाला डेन्मार्क आणि इतर युरोपीय देश बळी पडणार नाही असेही फ्रेडरिकसेन यांनी स्पष्ट केले आहे.त्यांनी हेही स्पष्ट केले आहे की, ग्रीनलँडच्या भविष्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा केवळ तेथील नागरिकांना आणि डॅनिश लोकांना आहे. तसेच ग्रीनलँड हा डेन्मार्कच्या नियंत्रणाखालील स्वतंत्र देश असून त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी डेन्मार्कची आहे. यामुळे डेन्मार्क ग्रीनलँडचे सर्वोतोपरी रक्षण करेल असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांना का हवे आहे ग्रीनलँड

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या सुरुवातीपासून ग्रीनलँड विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. अमेरिकेच्या सुरक्षेसाठी ग्रीनलँड गरजेचे असल्याचे ट्रम्प यांचे मत आहे. तसेच ट्रम्प यांच्या मते या आर्क्टिक प्रदेशात रशिया आणि चीनचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. यामुळे अमेरिकेच्या सुरक्षेला धोका वाढला आहे. हा धोका टाळण्यासाठी ट्रम्प यांनी ग्रीनलँड हवे आहे. यामुळे यामध्ये अडथळा आणणाऱ्या देशांवर टॅरिफ लादले जाईल अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती.

युरोपीय देशांवर टॅरिफ

ग्रीनलँडवर अमेरिकेच्या नियंत्रणाला डेन्मार्क आणि इतर काही युरोपीय देशांनी तीव्र विरोध केला आहे. यामुळे नाटो संपुष्टात येऊ शकते असे युरोपीय देशांनी म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवर हल्ल्याच्या धमकीनंतर फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनीने डेन्मार्कसह ग्रीनलँडमध्ये लष्करी तैनाती केली आहे. यामुळे ट्रम्प यांनी संतापून या देशांवर टॅरिफ लादले आहे. यामध्ये फ्रान्सह, डेन्मार्क, जर्मनी, यूके, नॉर्वे, स्वीडन, नेदरलँडस आणि फिनलँड या देशांचा समावेश आहे.

ग्रीनलँडमध्ये ट्रम्पविरोधी निदर्शने

याच वेळी दुसरीकडे ग्रीनलँडच्या नागरिकांनी देखील ट्रम्प यांच्या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. ग्रीनलँड हे विक्रीसाठी नाही, ग्रीनलँड (Greenland) हे ग्रीनलँडच्या लोकांचेच आहे, अशा घोषणा देत हजारो लोक ट्रम्पविरोधात रस्त्यावर उतरले आहे.

Greenland Dispute : टॅरिफवर युरोपचा पलटवार! ब्रिटन-फ्रान्सचे सडेतोड उत्तर, ट्रम्पला पंगा पडणार महागात?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीवर डेन्मार्कने काय भूमिका घेतली आहे?

    Ans: ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीवर डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसेन यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी युरोप ट्रम्पच्या कोणत्याही दबावाला, ब्लॅकमेलिंगला बळी पडणार नसल्याचे म्हटले आहे,

  • Que: ट्रम्पने युरोपीय देशांवर टॅरिफ का लादला आहे?

    Ans: ट्रम्प यांनी ग्रीनलँड अमेरिकेच्या नियंत्रणाखाली हवे आहे, परंतु युरोपीय देशांनी याला तीव्र विरोध केला असल्याने ट्रम्प यांनी त्या देशांवर टॅरिफ लादला आहे.

  • Que: ट्रम्प यांनी युरोपीय देशांवर किती टॅरिफ लादला आहे?

    Ans: ट्रम्प यांनी युरोपीय देशांवर १० टक्के टॅरिफ लागू केले आहे. परंतु ग्रीनलँडसोबत करार न झाल्यास ट्रम्प यांनी १ जून २०२६ पासून युरोपीय देशांवर २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे.

Web Title: Greenland dispute denmark clear warning to trump over tariff threat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Greenland
  • World news

संबंधित बातम्या

US AI Services: भारत-चीनसाठी अमेरिकन संसाधनांचा वापर का? ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवरो यांचा हल्ला
1

US AI Services: भारत-चीनसाठी अमेरिकन संसाधनांचा वापर का? ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवरो यांचा हल्ला

Spain हादरलं! दोन हाय-स्पीड ट्रेनची जोरदार धडक, 70 हून अधिक जखमी, थरारक VIDEO
2

Spain हादरलं! दोन हाय-स्पीड ट्रेनची जोरदार धडक, 70 हून अधिक जखमी, थरारक VIDEO

मृत्यूचा थरार! चिलीच्या जंगलात भीषण आग; 300 हून अधिक घरे जळून खाक, हजारो बेघर VIDEO
3

मृत्यूचा थरार! चिलीच्या जंगलात भीषण आग; 300 हून अधिक घरे जळून खाक, हजारो बेघर VIDEO

डिस्पोजिबल पॅकेजिंगवर आता ‘अल्लहा’ चे नाव लिहिण्यास बंदी; ‘या’ देशाने घेतला सर्वात मोठा निर्णय
4

डिस्पोजिबल पॅकेजिंगवर आता ‘अल्लहा’ चे नाव लिहिण्यास बंदी; ‘या’ देशाने घेतला सर्वात मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.