डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ग्रीनलँड (Greenland) अमेरिकेसाठी महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. परंतु ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवरील ताब्याला तीव्र विरोध केला जात आहे. यामुळे ग्रीनलँडमध्ये मोठे वाद निर्माण झाले आहेत. शनिवारी (१७ जानेवारी २०२६) हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. हे आंदोलन अधिक तीव्र होत आहेत. ग्रीनलँडच्या नागरिकांनी ट्रम्पच्या त्यावरील नियंत्रणाला तीव्र विरोध केला आहे. तसेच ग्रीनलँड हा अमेरिकला विक्रीसाठी नसल्याचे स्पष्ट केले आहे.
निदर्शनांमध्ये ग्रीनलँड विकला जाणार नाही, ग्रीनलँड अमेरिका भाग बनणार नाही अशा घोषणा दिल्या जात आहे. ग्रीनलँडची राजधानी नुउकमध्ये सुमारे २०,००० लोक रस्त्यावर उतरले आहे. राष्ट्रीयट ध्वज, पोस्टर्स आणि फलक घेऊन ट्रम्पविरोधी घोषणा दिल्या जात आहे. अमेरिकेच्या दूतावासापर्यंत ही निदर्शने काढण्यात आली आहेत. अनेक युरोपीय शहरांमध्ये निदर्शने सुरु आहेत.
Massive protest in Nuuk, Greenland 🇬🇱✊
Locals are marching against Trump’s plan for the U.S. to take over Greenland from Denmark 🇺🇸🇩🇰 Voices of resistance echo across the Arctic! ❄️🔥 pic.twitter.com/6uYdEn6swL — The Alternate Media (@AlternateMediaX) January 17, 2026
याच वेळी ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवरील नियंत्रणाला काही युरोपीय देशांनीही डेन्मार्कसह विरोध केला आहे. यामध्ये, फ्रान्स, जर्मनी, यूके, नॉर्वे, स्वीडन, नेदरलँडस आणि फिनलँड या देशांचा समावेश आहे. यामध्ये ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीने डेन्मार्कसह आपले सैन्य ग्रीनलँडवर पाठवले आहे. या देशांनी ग्रीनलँडच्या बचावासाठी लष्करी सराव सुरु केला आहे. यामुळे संतापून ट्रम्प यांनी या देशांवर १० टक्के टॅरिफ लादला आहे. तसेच ग्रीनलँडसोबत करार न झाल्यास टॅरिफ वाढवण्याची धमकीही दिली आहे. परंतु ट्रम्प यांच्या दबावाला ब्रिटन आणि फ्रान्सने सडेतोड उत्तर दिले आहे. आर्क्टिक प्रदेश आणि युरोपच्या बाह्य सीमांचे रक्षण करण्यापासून ते मागे हटणार नसल्याचे म्हटले आहे. सध्या यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
Ans: ग्रीनलँडवर अमेरिकेच्या नियंत्रणाची इच्छा डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या इच्छेविरोधात ग्रीनलँडचे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. ग्रीनलँड विक्रीसाठी नसल्याचे आणि गअमेरिका भाग होणार नसल्याचे नागरिकांनी ठामपण सांगितले आहे.
Ans: ग्रीनलँड अमेरिकेसाठी धोरणात्मक आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्वाच आहे. तसेच ट्रम्पच्या मते, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठीू ग्रीनलँड महत्त्वाचे आहे.
Ans: ग्रीनलँडवर अमेरिकेच्या नियंत्रणाला डेन्मार्कने तीव्र विरोध केला आहे. तसेच ग्रीनलँडवर तेथील डॅनिश लोकांचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. त्यांचा भविष्याचा निर्णय हा डॅनिश लोकांच्या आणि डेन्मार्कच्या हाती असून ग्रीनलँड अमेरिकेच्या विक्रीसाठी नसल्याचे डेन्मार्कने म्हटले आहे.






