हमासकडून ओलिसांची दुसरी तुकडी सोडण्यात आली, बंदिवासातून मुक्त झालेले 17 ओलिस पोहोचले इस्रायलला!

ओलिसांची देवाणघेवाण हमासने शुक्रवारी इतर १३ इस्रायली ओलिसांची सुटका केल्यानंतर झाली, ज्यामध्ये मुले आणि वृद्ध लोकांचा समावेश आहे, त्या बदल्यात 39 पॅलेस्टिनी महिला आणि तरुणांना इस्रायली तुरुंगातून सोडण्यात आले.

  पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला (Israel Hamas War) 51 दिवस पुर्ण झाले आहे आहे. मोठ्या प्रमाणावर झालेला नरसंहार पाहता आता 47 दिवसांच्या इस्रायल-हमास युद्धानंतर (Israel Hamas War) अखेर युद्धविराम (ceasefire) झाला आहे. बुधवारपासून सुरू असलेल्या युद्धविरामचा रविवारी चौथा  दिवस आहे. हमासने युद्धबंदीच्या पहिल्याच दिवशी २४ ओलिसांची सुटका केली. हे सर्व २४ ओलिस इस्रायलला पोहोचले आहेत.आता ओलिसांची दुसरी तुकडी हमासकडून शनिवारी सोडण्यात आली आहे. हमासच्या बंदिवासातून मुक्त झालेल्या 17 ओलिस रविवारी इस्रायलला पोहोचले, ज्यात 13 इस्रायली आणि 4 थाई नागरिकांचा समावेश आहे.

  हमासने 17 ओलिसांना सोडलं

  हमास आणि इस्रायल यांच्यात कतारच्या मध्यस्थीने युद्धबंदीबाबत करार झाला. त्यानुसार हमासकडून 50 ओलिसांची सुटका करण्यात येणार आहे. चार दिवसांच्या युद्धविराम दरम्यान हमासने युद्धबंदीच्या पहिल्याच दिवशी २४ ओलिसांची सुटका केली ज्यामध्ये 13 इस्रायली नागरिक होते. तर, थायलंडमधील 10 आणि फिलिपाइन्समधील एका नागरिकाचाही समावेश होता. आता शनिवारी पुन्हा हमासने 17 ओलिसांना सोडलं आहे. ज्यामध्ये 13 इस्रायली आणि 4 थाई नागरिकांचा समावेश आहे.

  39 पॅलेस्टाईन कैद्यांचीही तुरुंगातून सुटका

  हमास आणि इस्त्रायल मध्ये झालेल्या करारानुसार, इस्रायल  150 पॅलेस्टिनी कैद्यांचीही सुटका करणार आहे. हमासने ओलिसांना सोडल्याच्या बदल्यात इस्रायलने तुरुंगातून 39 पॅलेस्टिनी महिला आणि मुलांना सोडले. अल जझीरा टीव्हीने इस्रायली कारागृहातून इस्त्रायली-व्याप्त वेस्ट बँकमधील बीटूनिया शहराच्या दिशेने मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी कैद्यांना घेऊन जाणाऱ्या रेड क्रॉस बसचे थेट फुटेज जारी केले. मुत्सद्देगिरीशी परिचित असलेल्या एका पॅलेस्टिनी अधिकाऱ्याने सांगितले की, हमास इस्रायलशी सहमत चार दिवसांचा युद्धविराम कायम ठेवेल. 7 ऑक्टोबर रोजी, हमासच्या सैनिकांनी दक्षिण इस्रायलमध्ये हल्ला केला. या हल्ल्यात 1,200 लोक मारले आणि जवळपास 240 लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते.