पाकिस्तानने पुन्हा खुपसला खंजीर (फोटो सौजन्य - PTI)
पाकिस्तानने राजौरीमध्ये पुन्हा गोळीबार सुरू केला आहे. पाकिस्तानला शांतता अजिबात आवडत नाही असेच आता म्हणावे लागेल. युद्धबंदी लागू होऊन चार तासही झाले नव्हते की पाकिस्तानने राजौरीमध्ये पुन्हा गोळीबार सुरू केला आहे. लोकांनी त्यांच्या घरातील दिवेही बंद केले. परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे असे वृत्तवाहिन्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे युद्धबंदीसाठी पुढे येऊन पाठीत खंजीर खुपण्यासारखेच हे झाले आहे आणि आता यावर भारताचा काय पलटवार असणार हे पहावे लागेल
जम्मूमधील आंतराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे आणि अवघ्या तीन तासांतच शस्त्रसंधीचे नुकसान झाल्याचेही दिसून आले आहे. याशिवाय पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला बीएसएफकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आल्याचेही समोर येत आहे. पाकिस्तानने काहीही केले तरीही भारतीय सेना तैनात असून कधीही स्वतःहून पहिल्यांदा हल्ला करणार नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे आणि आपल्या शब्दावर पाकिस्तान कधीही टिकून राहत नाही हेदेखील काही तासाताच जगालाही दिसून आले आहे. मात्र आता या हल्ल्यानंतर भारत पुन्हा काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
अमेरिका, इराण, सौदी..; भारत-पाकिस्तान युद्धविरामासाठी ‘या’ देशांनी निभावली मध्यस्थीची भूमिका
घोषणा आणि उल्लंघन
पाकिस्तानकडून ५ः३० वाजता शस्त्रसंधीची घोषणा आणि ८ः३० वाजता उल्लंघन करण्यात आले आहे. पंजाबमधील फिरोजपूरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आले असून जम्मू आरएसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानककडून गोळीबार करण्यात आल्याचेही वृत्त आहे. पाकिस्तानने एका बाजूला शस्त्रसंधीची वाट धरली तर दुसऱ्या बाजूला एका प्रकारे भारताच्या पाठीत खंजीरच खुपसला आहे असं म्हणावे लागेल. ही एक प्रकारची फसवणूक असून आता पाकिस्तानला भारताकडून करारा जबाव मिळणे अत्यंत गरजेचे आहे. पाकिस्तानच्या कोणत्याही शहरातील लोकांना भारताने अजूनही उपद्रव केलेला नाही. मात्र पाकिस्तान सतत भ्याड हल्ले करत असल्याचे दिसून येत आहे.
पाकिस्तानी ड्रोन रोखले
जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूरमध्ये शनिवारी रात्री उशिरा ब्लॅकआउट दरम्यान भारतीय हवाई संरक्षण दलाने पाकिस्तानी ड्रोनला यशस्वीरित्या रोखले. परिसरात मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. त्याच वेळी श्रीनगरमध्ये स्फोटांच्या अफवा पसरल्या, ज्यावर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटमध्ये प्रश्न उपस्थित केला, ‘युद्धविरामाचे काय झाले?’ दरम्यान, राजस्थानमधील बारमेरमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण शहर अंधारात टाकण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जाहीर केला आहे. सीमेवर अजूनही तणाव कायम आहे.
ओमर अब्दुल्ला यांचे ट्वीट
This is no ceasefire. The air defence units in the middle of Srinagar just opened up. pic.twitter.com/HjRh2V3iNW
— Omar Abdullah (@OmarAbdullah) May 10, 2025
20 मिनिटात श्रीनगरमध्ये 50 धमाके
शनिवारी रात्री उशिरा श्रीनगरमधील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे जेव्हा अवघ्या २० मिनिटांत ५० हून अधिक स्फोटांचे आवाज ऐकू आले. बेमिना परिसरातील पॉवर ग्रिड स्टेशनजवळ गोळीबार आणि स्फोटांचे दृश्य समोर आले आहेत. गुलमर्गमधूनही मोठ्या स्फोटांचे वृत्त आहे. असे म्हटले जात आहे की दाल तलाव, हरी पर्वत आणि लाल चौक यांना लक्ष्य केले जाईल. दुसरीकडे, संपूर्ण पठाणकोट जिल्हा पुन्हा अंधारात बुडाला आहे. सांबा येथेही वीजपुरवठा खंडित झाला आहे. राजस्थान सीमेवरील जिल्ह्यांमध्येही वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिस्थिती अजूनही अत्यंत संवेदनशील आहे.
9 पाकिस्तानी ड्रोन
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात पाकिस्तानकडून होणारे ड्रोन हल्ले पुन्हा एकदा तीव्र झाले आहेत. शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तापासून जिल्ह्यात एकूण ९ पाकिस्तानी ड्रोन दिसले आहेत. हरामी नाला आणि जखोना भागात ६ हून अधिक ड्रोन हालचाली नोंदवण्यात आल्या, तर खावडा परिसरात तीन ड्रोन दिसले असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे हे वातावरण आता पुन्हा एकदा तणावात जाणार हे नक्की.