Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Strait: समुद्रात ‘घोस्ट फ्लीट’चा थरार! अमेरिकेच्या नाकाखालून इराणने विकलं अब्जावधींचं तेल; भारत-पाकिस्तान पण सामील

Hormuz Strait : अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सांगितले की, नाकेबंदी सुरू झाल्यापासून अमेरिकेच्या नौदलाने किमान २८ जहाजांना इराणी बंदरांवर परत येण्याचे निर्देश दिले आहेत. जाणून घ्या सविस्तर अपडेट.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 25, 2026 | 01:07 PM
iran breaks us blockade using india pakistan maritime route hormuz strait 2026

iran breaks us blockade using india pakistan maritime route hormuz strait 2026

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेची नाकेबंदी फेल?
  • भारत-पाकिस्तानचा ‘सेफ पॅसेज’
  • अब्जावधींचा महसूल

India Pakistan maritime route Iran oil : जागतिक राजकारणात सध्या होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) युद्धाचे केंद्र बनली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मार्गावर कडक नौदल नाकेबंदी लागू केली असली तरी, इराणने अमेरिकेला ‘हुलकावणी’ देण्याची नवी शक्कल लढवली आहे. ‘फायनान्शिअल टाइम्स’च्या (FT) ताज्या अहवालानुसार, इराणशी संबंधित ३४ टँकर्सनी अमेरिकेच्या नाकेबंदीला यशस्वीपणे बगल दिली आहे. विशेष म्हणजे, यासाठी त्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या सागरी क्षेत्राचा वापर केल्याचा दावा केला जात आहे.

काय आहे ‘इनोसंट पॅसेज’ आणि भारताचा सहभाग?

अमेरिकन संशोधक जिम बियान्को यांनी शेअर केलेल्या नकाशानुसार, इराणी जहाजे आंतरराष्ट्रीय पाण्यात न जाता भारत आणि पाकिस्तानच्या प्रादेशिक सागरी हद्दीतून (Territorial Waters) प्रवास करत आहेत. सागरी कायद्यावरील संयुक्त राष्ट्र कराराप्रमाणे (UNCLOS), कोणत्याही देशाच्या हद्दीतून ‘निर्दोष मार्ग’ (Innocent Passage) म्हणून जहाजांना जाण्याचा अधिकार असतो. अमेरिका या हद्दीत शिरून जहाजे थांबवू शकत नाही, कारण तसे करणे म्हणजे भारत किंवा पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन ठरेल. याच कायदेशीर पळवाटेचा फायदा घेत इराणी जहाजे खरग बेटापासून थेट मुंबईपर्यंत सुरक्षित प्रवास करत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Meloni Earrings: ‘मेरे कानो में है जो बाली!’ मेलोंनीचें झुमके बनले इंटरनेटचे VIRAL सेन्सेशन; कॉमेंट्समध्ये मोदीजींच्या नावाचाच गजर

‘घोस्ट फ्लीट’ आणि एआयएस स्पूफिंगचा थरार

इराणने अमेरिकेच्या आधुनिक रडार सिस्टीमला चकवण्यासाठी ‘डार्क ट्रान्झिट्स’चा वापर केला आहे. यामध्ये जहाजाचे ट्रान्सपॉन्डर (AIS) बंद केले जाते, ज्यामुळे उपग्रहाद्वारे जहाजाचे लोकेशन समजत नाही. ‘डोरेना’ सारख्या सुपरटँकरचे उदाहरण समोर आले असून, या जहाजाने मलेशियाजवळ समुद्रातच एका जहाजातून दुसऱ्या जहाजात तेल हस्तांतरित केले. या ‘फसव्या’ पद्धतींमुळे इराणने बंदी असूनही तब्बल १०.७ दशलक्ष बॅरल तेल जागतिक बाजारपेठेत पोहोचवले असून त्यातून ९१० दशलक्ष डॉलर्सचा महसूल मिळवला आहे.

How can dozens of ships defeat the US Blockade, as the FT repost below says is happening? The map shows how a tanker can travel from Kharg Island to Mumbai while remaining within the territorial waters of Pakistan and India. The US Blockade Rules and UNCLOS (UN Law of the Sea)… https://t.co/iDGHoQmqsu pic.twitter.com/2KUBorMnx8 — Jim Bianco (@biancoresearch) April 22, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hengli Petrochemical: ट्रम्प यांचा चीनवर ‘इकोनॉमिक बॉम्ब’; इराणला मदत करणारी चीनची मोठी रिफायनरी अमेरिकेने केली ब्लॅक लिस्ट

ट्रम्प प्रशासनाचे दावे आणि वास्तव

डोनाल्ड ट्रम्प यांनी ही नाकेबंदी यशस्वी झाल्याचे म्हटले होते. अमेरिकन सेंट्रल कमांडनुसार, आतापर्यंत २८ जहाजांना इराणी बंदरांवर परत पाठवण्यात आले आहे. मात्र, ३४ टँकर्सनी नाकेबंदी तोडल्याने अमेरिकेच्या सागरी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ‘मुरलिकिशन’ आणि ‘अलिसिया’ सारखी जहाजे, ज्यांच्यावर अमेरिकेने आधीच निर्बंध लादले होते, ती देखील होर्मुझच्या वादग्रस्त पाण्यातून बिनदिक्कत प्रवास करताना दिसली आहेत. यामुळे आखाती देशांमधील तणाव आता एका वेगळ्या वळणावर पोहोचला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराण अमेरिकेची नाकेबंदी कशी तोडत आहे?

    Ans: इराण 'एआयएस स्पूफिंग' (ट्रॅकिंग बंद करणे), 'घोस्ट फ्लीट' (ध्वज बदलणे) आणि भारत-पाकिस्तानच्या सागरी हद्दीचा वापर करून नाकेबंदी तोडत आहे.

  • Que: 'इनोसंट पॅसेज' म्हणजे काय?

    Ans: आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, एखादे जहाज दुसऱ्या देशाच्या सागरी हद्दीतून शांततापूर्ण हेतूने प्रवास करू शकते, ज्याला किनारपट्टीवरील देश किंवा इतर कोणतीही शक्ती रोखू शकत नाही.

  • Que: अमेरिकेने किती इराणी जहाजे रोखली आहेत?

    Ans: यूएस सेंट्रल कमांडच्या माहितीनुसार, नाकेबंदी सुरू झाल्यापासून आतापर्यंत २८ जहाजांना इराणी बंदरांवर परत जाण्यास भाग पाडले आहे.

Web Title: Iran breaks us blockade using india pakistan maritime route hormuz strait 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • America
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

पिझ्झा डिलिव्हरी ठरली जीवघेणी; अमेरिकेत भारतीय IT इंजिनियरची गोळ्या झाडून हत्या
1

पिझ्झा डिलिव्हरी ठरली जीवघेणी; अमेरिकेत भारतीय IT इंजिनियरची गोळ्या झाडून हत्या

Sriram Krishnan education: ट्रम्प प्रशासनाला ‘बाय-बाय’ म्हणणारे श्रीराम कृष्णन यांचे शिक्षण किती आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
2

Sriram Krishnan education: ट्रम्प प्रशासनाला ‘बाय-बाय’ म्हणणारे श्रीराम कृष्णन यांचे शिक्षण किती आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

World War 3: लक्ष्मणरेषा ओलांडली! इराणने इस्रायलवर डागली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे; ट्रम्प मैदानात तर अमेरिकेलाही महायुद्धाची धमकी
3

World War 3: लक्ष्मणरेषा ओलांडली! इराणने इस्रायलवर डागली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे; ट्रम्प मैदानात तर अमेरिकेलाही महायुद्धाची धमकी

‘अर्धा हिस्सा तर भारताचाच…’, तेल व्यापारावर रशियन CEO यांचं मोठं विधान
4

‘अर्धा हिस्सा तर भारताचाच…’, तेल व्यापारावर रशियन CEO यांचं मोठं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.