
Iran Slams Pakistan
इराणच्या प्रसारमाध्यांमीन मुनीर यांना अमेरिकेचा पोस्टमॅन म्हणून संबोधले आहे. पाकिस्तान (Pakistan) निष्पक्षतेचा आव आणत असून अमेरिकेच्या तालावर नाचत असल्याचे इराणने म्हटले आहे.
इस्लामाबदमध्ये या आठवड्यात शांतता चर्चेची दुसरी फेरी पार पडणार होती. इराणने या चर्चेसाठी स्पष्ट नकार दिला होता. अमेरिकेच्या इराणी जहाजावरील नाकेबंदी हटवल्याशिवाय चर्चा होणार नसल्याचे इराणने म्हटले होते. या तणावादरम्यान मुनीर यांनी गेल्या आठवड्यात तेहरानचा दौरा केला होता.
इराणी तज्ज्ञांनी सांगितले की, मुनीर यांनी इराणचा एक औपचारिक मुद्दा अमेरिकेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेतली होती. परंतु यावर अद्यापही कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. यावर त्यांनी पूर्णपणे मौन पाळले आहे.
इराणी तज्ज्ञांच्या मते, त्यांनी मांडलेला १० कलमी प्रस्ताव अमेरिकेने मान्य केला होता. परंतु पाकिस्तानने इराणचा प्रस्ताव बाजूला सारत अमेरिकेचा १६ अटींचा प्रस्तावर इराणवर लाण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान, तुर्की, सौदी अरेबिया (Saudi Arabia) या देशांच्या तालावर नाचत इराणचे प्रादेशिक वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले. शिवाय पाकिस्तानी लष्करी इराणविरोधात खोटा प्रचार करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
इराणच्या मते, पाकिस्तान स्वतला शांतीदूत म्हणून सादर करत आहे, मात्र पडद्यामागे तो अमेरिकेच्या हितांचे रक्षण करत आहे. तसेच पाकिस्तानने, इराणची प्रतिमा चर्चेपासून पळ काढत असल्याची बनवली असल्याचाही आरोप केला आहे.परंतु वास्तवात पाकिस्तान बनावट अहवाला सादर करुन त्यांची बदनामी करत असल्याचा इराणचा आरोप आहे.
सध्या पाकिस्तान आणि इराणमधील या वादामुळे मध्यपूर्वेतील समीकरणात बदल होण्याची शक्यता आहे. इराण(Iran) च्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाच्चकी झाली असून पाकिस्तान यावर काय उत्तर देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
IT’S HAPPENED. IRANIAN REGIME SLAMS PAK.
GOOD INDIA STEERED CLEAR OF THE “MEDIATION” MINEFIELD.
Iranian state TV launches a tirade against Pakistan for it’s “double game” and for General Munir’s pro-U.S. “tilt”.
Here are 10 points that sum up the TV broadcast.
+ First open… pic.twitter.com/2qbGY1fKWu — Rahul Shivshankar (@RShivshankar) April 22, 2026
Ans: इराणच्या सरकारी माध्यमांनी पाकिस्ताने असीम मुनीर डबल गेम खेळत असल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तान निष्पक्ष मध्यस्थीऐवजी अमेरिकेच्या तालावर नाचत असल्याचा आरोप केला आहे. मुनीर यांनी इराणचा प्रस्ताव बाजूला सारुन अमेरिकेच्या अटी समोर केल्या असल्याचा आरोप इराणने केला आहे.
Ans: पाकिस्तानच्या इराणचा १० कलमी प्रस्ताव बाजूला सारुन अमेरिकेच्या आक्रमक मागण्या पुढे केल्या आहेत. पाकिस्तान इराणचा प्रादेशिक प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप इराणने केला आहे.
Ans: इराणने असीम मुनीर यांना अमेरिकेचा एजंट संबोधले आहे.