Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Tension : ‘व्यापारी जहाजांवरील हल्ले तातडीने थांबवा’ ; होर्मुझबाबत भारताची कठोर भूमिका

Hormuz Tension : होर्मुझमधील व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांचा भारताने तीव्र निषेध नोंदवला आहे. तसेच संबंधित देशांना तातडीने हल्ले थांबवण्याची आणि सागरी वाहतूकीचा मार्ग पुन्हा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 14, 2026 | 04:48 PM
India on Hormuz Attacks

India on Hormuz Attacks

Follow Us
Follow Us:
  • भारताकडून हल्ल्यांबाबत तीव्र चिंता व्यक्त
  • होर्मुझबाबत भारताची कठोर भूमिका
  • हल्ले तातडीने थांबवण्याची मागणी
Hormuz Tension : नवी दिल्ली : होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांचा भारताने तीव्र निषेध नोंदवला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत अधिकृत निवेदन जारी केले. या निवेदनात होर्मुझमधील व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांचा कठोर शब्दांत निषेध करण्यात आला.

US Iran War : चीन-रशियाला मोठा धक्का? अमेरिकेने उडवला इराणमधील सर्वात महत्त्वाचा पूल

काय म्हणाला भारत?

आंतरराष्ट्रीय सागरी मार्ग सुरक्षित आणि निर्बंधविरहित सुरु करण्याची मागणी भारताने केली.परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, व्यापारी जहाजे आणि नागरिकांच्या पायाभूत सुविधांवरील हल्ले तातडीने थांबवावेत. संबंधित देशांनी संवाद आणि राजनैतिक मार्गाने हा वाद सोडवावा, असे आवाहन भारताने केले आहे.

तसेच भारताने नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासातील प्रमुखांना बोलावूनही होर्मुझमधील हल्ल्यांचा अधिकृतपणे तीव्र निषेध केला. भारताने व्यापारी जहाजांवरील आणि भारतीयांवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत, हेही स्पष्ट केले.

दोन व्यापारी जहाजांवर हल्ला

अलीकडे होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या दोन व्यापारी जहाजांवर हल्ला करण्यात आला होता. यामध्ये यूएईच्या अल-बाहिया आणि एमचटी मोम्बासा यांचा सामावेश असून यावर एकूण ४६ नाविक होते. ज्यामध्ये ३० भारतीय होते. यातील अल-बाहिया जहाजावरील १२ भारतीयांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी आहे. तर मोम्बासा जहाजावरील १८ भारतीयांपैकी ९ जण जखमी असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

मृत भारतीय नाविकांच्या कुटुंबीयांप्रती भारताने दु:ख व्यक्त केले असून जखमींच्या बरे होण्याची प्रार्थना केली आहे. तसेच यूएईमधील परिस्थितीवरही भारत सरकार बारकाईन लक्ष ठेवून आहे. जखमी भारतीयांना आवश्यक ती मदत मिळावी यासाठी यूएई सरकारच्या संपर्कात आहे.

यूएईकडून हल्ल्याचा तीव्र निषेध

यूएईकडून देखील या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. युएईने या हल्ल्याला निर्लज्ज संबोधले आहे. सोमवारी (१३ जुलै) ओमानजवळील होर्मुझच्या दक्षिणेकडील मार्गावर हा हल्ला झाला होता. क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यामुळे जहाजाला भीषण आग लागली होती.

India is deeply concerned by the attacks on two vessels, MT Al Bahiyah and MT Mombasa, during their transit through the Strait of Hormuz today. Both the vessels were carrying 30 Indian seafarers, among their combined crew of 46. Of the 12 Indian nationals onboard MT Al Bahiyah,… pic.twitter.com/1ljmpNobfg — IANS (@ians_india) July 14, 2026

Hormuz Tension : होर्मुझमध्ये भारतीयाचा मृत्यू ! सरकारने थेट इराणला ‘हा’ इशाराच दिला; राजदूतालाही समन्स

Web Title: Hormuz tension india demands end to attacks on merchant ships

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • Iran News
  • MEA
  • Strait of Hormuz
  • World news

संबंधित बातम्या

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा
1

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा

UAE-Iran Tension : इराणी ड्रोन हल्ल्यावर UAE संतप्त; प्रत्युत्तराचा कायदेशीर अधिकार राखून ठेवला
2

UAE-Iran Tension : इराणी ड्रोन हल्ल्यावर UAE संतप्त; प्रत्युत्तराचा कायदेशीर अधिकार राखून ठेवला

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा
3

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?
4

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.