इराण: अमेरिका आणि इराण (America Vs Iran) यांच्यात तणावपूर्ण संबंध आहेत, ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. अशातच इराणने 1 हजार 650 किलोमीटर रेंजच्या एका क्रुज मिसाइलची निर्मिती केल्याची माहिती मिळाली आहे. युक्रेन युद्धात रशियाकडून इराणच्या ड्रोनचा वापर करण्यात आल्यानंतर हे क्षेपणास्त्र पश्चिमी देशांची चिंता वाढवू शकतं. इतकंच नाही तर रिव्होल्युशनरी गार्ड्स एरोस्पेस फोर्सचे प्रमुख अमीराली हाजीजादेह (Amir Ali Hajizadeh) यांनीही अमेरिकेला प्रमुख कमांडरच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी दिल्याची माहिती मिळाली आहे.
[read_also content=”काही उद्योगपतींना झुकतं माप दिल्याने देशाची अर्थव्यवस्था धोक्यात, काँग्रेसच्या महाअधिवेशनात सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका https://www.navarashtra.com/india/sonia-gandhi-speech-in-raipur-congress-convention-nrsr-372186.html”]
हाजीजादेहने म्हटलं आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याची आमची इच्छा आहे. शासकीय टीव्हीवर बोलताना त्यांनी सांगितलं की, 1 हजार 650 किमी रेंजच्या नव्या क्रूज मिसाइलला इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या मिसाइल शस्त्रागारात समाविष्ट करण्यात आलं आहे. याशिवाय पहिल्यांदाच या मिसाइलचे फुटेजही दाखवण्यात आलं. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इराणच्या कमांडरने दावा केला होता की, देशाने हायपरसोनिक बॅलेस्टिक मिसाइल विकसत केलं आहे.
हाजीजादेह यांनी म्हटलं की, बगदादमध्ये 2020 मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात इराणी सैन्य कमांडर कासिम सुलेमानींचा मृत्यू झाल्याच्या काही दिवसानतंर जेव्हा इराणने अमेरिकन नेतृत्वातील सैन्यावर बॅलेस्टिक मिसाइल हल्ला केला. तेव्हा त्यांचा हेतू बिचाऱ्या सैनिकांना मारण्याचा अजिबात नव्हता. अल्लाहची इच्छा असेल तर आम्ही ट्रम्पला मारू इच्छितो. माइक पॉम्पिओ(अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री) आणि सुलेमानी यांच्या हत्येचा आदेश देणाऱ्या सैन्य कमांडर्सना मारलं पाहिजे. यावर आता अमेरिकेकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहावं लागेल. पण सार्वजनिकरित्या थेट डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याची भाषा केल्याने इराणविषयी सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.
इराण कायमच सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेणार असं सांगत आहे. इराणने आपला मिसाइल प्रोग्रॅम विशेषत: बॅलिस्टीक मिसाइलचा विस्तार केला आहे. त्यामुले अमेरिका आणि युरोपीय देश विचारात पडले आहेत. मात्र हा सुरक्षात्मक कार्यक्रम असल्याचं सांगितलं जात आहे. इराणने सांगितलं की युक्रेन युद्धाआधी त्यांनी रशियाला ड्रोन दिले होते. युक्रेनमध्ये वीज वितरणाची ठिकाणं आणि काही मुख्य इमारतींना जमीनदोस्त करण्यासाठी इराणने दिलेल्या सुसाइड ड्रोनचा वापर रशियाने केला आहे.