Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! भारतात येणाऱ्या 14 जहाजांना इराणच्या सैन्याने होर्मजमध्ये अडवलं; दोन जहाजांवर थेट गोळीबारच…

इराणी गनबोट्सनी दोन जहाजांवर थेट गोळीबार केला, ज्यामुळे एका भारतीय टँकरची विंडशील्ड फुटली. ही घटना ओमानच्या ईशान्येस सुमारे ३७ किलोमीटर अंतरावर असलेल्या केशम आणि लारक बेटांच्या दरम्यान घडली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 19, 2026 | 07:55 AM
मोठी बातमी ! भारतात येणाऱ्या 14 जहाजांना इराणच्या सैन्याने होर्मजमध्ये अडवलं; दोन जहाजावर थेट गोळीबारच...

मोठी बातमी ! भारतात येणाऱ्या 14 जहाजांना इराणच्या सैन्याने होर्मजमध्ये अडवलं; दोन जहाजावर थेट गोळीबारच...

Follow Us
Follow Us:

तेहरान : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात जगातील सर्वात संवेदनशील सागरी मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने (IRGC) भारताकडे निघालेल्या 14 मालवाहू जहाजांच्या मोठ्या ताफ्याला जबरदस्तीने अडवल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईदरम्यान इराणी गनबोट्सनी दोन जहाजांवर थेट गोळीबार केला, ज्यामुळे एका भारतीय टँकरची विंडशील्ड फुटली. ही घटना ओमानच्या ईशान्येस सुमारे ३७ किलोमीटर अंतरावर असलेल्या केशम आणि लारक बेटांच्या दरम्यान घडली. जहाजांचा ताफा सुरळीतपणे प्रवास करत असताना दोन इराणी गनबोट्सनी त्यांना घेरले आणि पूर्वसूचनेशिवाय गोळीबार सुरू केला. ज्या जहाजावर हल्ला झाला, ते कच्चे तेल घेऊन जात होते. या हल्ल्यानंतर, १३ जहाजांना आपला प्रवास सोडून पर्शियन आखातातील आपापल्या गंतव्यस्थानी परतण्यास भाग पडले.

दरम्यान, या तणावपूर्ण नाकेबंदीच्या दरम्यान एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी कच्चे तेल घेऊन जाणारे एक भारतीय जहाज होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करण्यात यशस्वी झाले. ते आता भारताच्या दिशेने निघाले आहे. उर्वरित १३ जहाजे सध्या लारक बेटाच्या दक्षिणेला अडकली आहेत.

भारताचा ध्वज असूनही अडवणूक

अडवलेल्या १४ जहाजांपैकी सात जहाजांवर भारतीय ध्वज होता, तर उर्वरित जहाजे लायबेरिया, मार्शल बेटे आणि व्हिएतनामची होती. यापैकी सहा जहाजे कच्चे तेल, तीन जहाजे एलपीजी गॅस आणि चार जहाजे खत घेऊन जात होती. या जहाजांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षित परतीची खात्री करण्यासाठी भारत सरकार इराणी अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे.

शस्त्रसंधी पुढील आठवड्यात संपणार

अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी पुढील आठवड्यात संपणार आहे. जोपर्यंत अमेरिकेने इराणच्या बंदरांवर नाकेबंदी कायम ठेवली आहे, तोपर्यंत होर्मुझच्या सामुद्रधुनीवर कडक नियंत्रण ठेवणार असल्याचे इराणने स्पष्ट केले आहे. जगातील एक-पंचमांश तेल व्यापार याच मार्गातून होतो.

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद

अमेरिका इराण संघर्ष (US Iran Conflict) पुन्हा विकोपाला पोहोचला आहे. शनिवारी (दि.१८) इराणने पुन्हा होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या सागरी चाचेगिरी(लूटमार)ला प्रत्युत्तर म्हणून हा निर्णय घेतला आहे. यामुळे जगभरात पुन्हा एकदा गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुन्हा जागतिक तेल पुरवठा धोक्यात आला आहे.

US Iran Peace Talks : इराण-अमेरिका वादात नवा ट्विस्ट! शांतता कराराला महिलांचा कडाडून विरोध, नेमकं प्रकरण काय?

Web Title: Iranian military detained 14 ships bound for india in the strait of hormuz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 07:25 AM

Topics:  

  • Crued Oil
  • Iran-Israel War
  • Strait of Hormuz

संबंधित बातम्या

US Iran Ceasefire : Iran Deal वर ट्रम्प यांचा मोठा दावा; ‘या’ आठवड्याच्या अखेरीस होणार अंतिम करार? नाहीतर…
1

US Iran Ceasefire : Iran Deal वर ट्रम्प यांचा मोठा दावा; ‘या’ आठवड्याच्या अखेरीस होणार अंतिम करार? नाहीतर…

Crude Oil Prices: पेट्रोल होणार आणखी महाग! इस्रायलच्या एका निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत 2 टक्क्यांनी वाढ; लेबनॉनमध्ये युद्ध
2

Crude Oil Prices: पेट्रोल होणार आणखी महाग! इस्रायलच्या एका निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत 2 टक्क्यांनी वाढ; लेबनॉनमध्ये युद्ध

US-Iran Deal: ‘तुमच्या कुटुंबाला माझा…’ डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली सिच्युएशन रूममध्ये तातडीची बैठक; इराणबाबत अंतिम निर्णय घेणार
3

US-Iran Deal: ‘तुमच्या कुटुंबाला माझा…’ डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली सिच्युएशन रूममध्ये तातडीची बैठक; इराणबाबत अंतिम निर्णय घेणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.