वॉशिंग्टन : अटलांटिक महासागरात (Atlantic Ocean) बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे (Titanic Ship) अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीचेही अवशेष, त्याच जहाजाच्या बाजूला पडलेले आहेत. या पाणबुडीत पर्यटनासाठी गेलेल्या 4 अब्जाधीशांचा यात मृत्यू झालाय. समुद्रातील पाण्याच्या दाबामुळं या पाणबु़डीचा झालेला स्फोट यामुळं पाचही जण मृत्युमुखी पडले. समुद्राच्या तळाला जाणं हे अंतराळात जाण्यापेक्षाही अधिक धोकादायक मानण्यात येतंय. एक छोटीशी चूक सगळं काही नेस्तनाबूत करु शकते. इतकं असूनही कोणत्याही नियमांविना, नियमावलींविना खोल समुद्रातील पर्यटन वाढताना दिसतंय. त्यासाठीचं एक-एक तिकिट हे कोट्यवधींना विकण्यात येतंय.
किती खोल आहे समुद्र?
1. समुद्र सपाटीचा वरचा भाग ज्या ठिकाणी हवा आणि प्रकाश असतो. समुद्रातील जीव याच परिसरात राहत असतात.
2. मानव समुद्रात 831 फुटांपर्यंत कोणत्याही उपकरणाशिवाय पोहचल्याचा रेकॉर्ड आहे. या ठिकाणी समुद्र सपाटीपेक्षा 26 पट जास्त दबाव असतो. यामुळं माणसाची फुफ्फुसं फुटण्याची शक्यता असते. या ठिकाणी सूर्याचा प्रकाश पोहचत नाहीत. या भागाला मिडनाईट झोन म्हणतात. त्याच्यापुढं प्रचंड अंधार असतो.
3. 3280 फूट- या तळाच्या खाली कोणताही सस्तन प्राणी सापडलेला नाही. या ठिकाणी केवळ व्हेलच सापडलेले आहेत.
4. 10,040 फूट- इतक्या तळाला टायटॅनिक जहाजाचे अवशेष आहेत. हे अंतर समुद्र सपाटीपासून 3.9 किमी खालच्या बाजूला आहे.
5. 12500 फूट ते 35,876 फूट- या भागाला चॅलेंजर टीप असे संबोधले जाते. मानव अद्याप पामबुडी घेून या भागापर्यंत पोहचलेला नाही. समुद्रसपाटीपासून हे अंतर 11 किमी खाली असल्याचं सांगण्यात येतंय.
6. आत्तापर्यंत मानव समुद्रातील केवळ 5 ते 10 टक्के भागापर्यंतच पोहचू शकलेला आहे. समुद्रातील अनेक रहस्य अद्याप जाणून घेण्यात आलेली नाहीत.
7. त्यासाठीच खोल समुद्रात मानवांचं पर्यंटन झपाट्यानं वाढताना दिसतंय.
पहिल्यांदा कधी झाला प्रयत्न?
1. 1521 साली फर्डिनेंडं मेगेलन यानं प्रशांत महासागराची खोली मोजण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 2400 फूट दोरीला खाली जड वस्तू बांधल्या आणि त्या समुद्रात सोडल्या. मात्र तरीही त्यांना तळ मोजता आला नाही.
2. 10 व्या शतकापर्यंत असं मानण्यात येत होतं की 1800 फूटांच्या खाली कोणताही जीव समुद्रात नाही. मात्र 1850 मध्ये मायकल सार्सनं समुद्रात 2600 फुटांखाली जैवीक व्यवस्था अस्तित्वात असल्याचा शोध लावला. अगदी समुद्राच्या तळाशीही जीव असल्याचं सांगण्यात येतंय.
3. 1930 मध्ये पाणबुड्यांचा शोध लागल्यानंतर समु्द्राच्या तळाशी जाणं सहज होऊ लागलं.
4. 1934 साली फ्रान्समध्ये जॅक कॉस्तू यानं 1943 साली एक्वा लंग म्हणजेच स्कूबाचा शोध लावला. यामुळं समुद्राच्या तळात प्रवास करणं मानवाला शक्य होऊ लागलं.
5. 1949 साली जैक पिकर्ड पाणबुडीच्या मदतीनं चॅलेंजर डीपपर्यंत पोहचला होता. त्यामुळे सग्या जगाचं लक्ष वेधलं होतं.
6. 21 व्या शतकात कमर्शिअल डी सीप पाणबुड्यांची सुरुवात झाली. त्यामुळं पर्यंटकांना हे अद्भूत जग पाहण्याची संधी उपलब्ध झाली.
7. 1943 साली स्कुबाचा शोध लागल्यानंतर आत्तापर्यंत 60 लाख प्रशिक्षित स्कुबा ड्रायव्हर्स आहेत. जे समुद्राच्या 1000 फुटांपर्यंत जाऊ शकतात.
8. गेल्या काही दिवसांत हेल्मेट डायविंगची कल्पना अस्तित्वात आली. यात पोहणं येण्याची किंवा स्कुबा ट्रेनिंगची गरज उरली नाही. तुम्ही थेट समुद्राच्या तळाशी जाऊन त्यावर चालू शकता. समुद्रातील जीवांसोबतचे क्षण अनुभवू शकता.
9. गेल्या काही काळात खोल समुद्रात जाऊन एक्सप्लोअर करण्यासाठी पामबुडी सवारी सुरु झाल्यात. यात मोठ्या आणि लहान लक्झरी पाणबुड्यांचा समावेश आहे.
10. याची मागणी वाढल्यानंतर याची किंमत कमी होील असं तज्ज्ञांचं मत आहे. याचा खर्च कमी झाला तर सर्वसामान्यही हे पर्यटन करु शकणारक आहेत.
डीप सी कंपन्यांची तिकिट किती?
1. मालदीवमध्ये डीप फ्लाईट चालवण्यात येते. यात एक पायलट आणि दोन व्यक्ती असतात. समुद्रातील जग बघण्याची ही चांगली संधी आहे., याचं तिकिट 1.25 लाख प्रति तासाला आहे.
2. कॅरिबियन बेटांवर लक्झरी पाणबुडी हॉटेल आहे. लव्हर्स डीप असं त्याचं नाव आहे. एक रात्री या पामबुडीत राहण्यासाठी 1.25 कोटी रुपये लागतात.
3. ओशन गेट कंपनी टायटानिक टुरिझम सुरु केलंय. प्रत्येक व्यक्तीला 2.50 लाख डॉलर्स म्हणजेच 2 कोटी द्यावे लागतात. 8 दिवस 7 रात्रींचा हा प्रवास आहे. यातले 8 तास पाणबुडीची सफर असते.
डीप सी टुरिझम किती धोकादायक?
समुद्राच्या तळात एका बिंदूनंतर सुरक्षा राहू शकत नाही. हे सगळं पर्यटन आंतरराष्टीय पाण्यात होतं. ज्या ठिकाणी कोणत्याही एका देशाचं सरकार नसतं. जाण्यापूर्वी कन्सेन्ट फॉर्म भरावा लागतो. त्यात जबाबदारी आपलीच असल्याचं निश्चित करण्यात येतं. कोणतीही नियमावली नसल्यानं कंपन्या पैसे कमवण्यावर जास्त लक्ष देतात.






