Herzi Halevi : इस्रायलचा सर्वात मोठा सायबर पराभव! माजी लष्करप्रमुखांचा फोन हॅक; 19000 गोपनीय फाईल्स इराणी हॅकर्सच्या ताब्यात ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Israel Former Army Chief Herzi Halevi phone hack : जगातील सर्वात प्रगत आणि अभ्येद्य समजल्या जाणाऱ्या इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणेला इराणशी संबंधित हॅकर्सनी जोरदार धक्का दिला आहे. इस्रायल संरक्षण दलाचे (IDF) माजी चीफ ऑफ स्टाफ हर्झी हालेवी यांचा वैयक्तिक फोन हॅक झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. इराण (Iran) समर्थित ‘हंदला’ (Handala) या हॅकर गटाने हा दावा केला असून, त्यांनी हालेवींच्या फोनमधून तब्बल १९,००० संवेदनशील फाईल्स चोरल्या आहेत. या घटनेमुळे इस्रायलच्या सायबर सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
‘हंदला’ गटाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर या हॅकिंगची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, ते गेल्या अनेक वर्षांपासून हालेवी यांच्या डिजिटल उपकरणांवर “अदृश्यपणे” लक्ष ठेवून होते. या काळात त्यांनी १९,००० हून अधिक गोपनीय फोटो आणि व्हिडिओ हस्तगत केले आहेत. या फाईल्समध्ये केवळ हालेवींचे वैयक्तिक फोटो नाहीत, तर इस्रायलच्या गुप्त लष्करी सुविधा, हाय-टेक कमांड सेंटर्स, संकट व्यवस्थापन कक्ष आणि युद्धाच्या वेळी वापरले जाणारे सामरिक नकाशे यांचा समावेश आहे. हॅकर्सनी इस्रायलची थट्टा करत म्हटले आहे की, “हालेवींच्या माध्यमातून संपूर्ण इस्रायली लष्करी रचना आता आमच्यासाठी एका उघड्या पुस्तकासारखी झाली आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran US Ceasefire: ‘पाकिस्तानला पुन्हा भारतात विलीन करा!’ नोबेल मागणाऱ्या शहबाज आणि मुनीर यांची ब्रिटिश पत्रकाराने मोडली खोड
या डेटा लीकमध्ये हर्झी हालेवी यांच्या अशा काही दौऱ्यांची माहिती समोर आली आहे, जी इस्रायलने कधीही अधिकृतपणे जाहीर केली नव्हती. सर्वात मोठा खुलासा म्हणजे, हालेवी यांनी जॉर्डनचे लष्करप्रमुख मेजर जनरल युसेफ हुनैती यांची अत्यंत गुप्तपणे भेट घेतली होती. हा दौरा इतका गोपनीय होता की, हालेवी लष्करी गणवेश न घालता साध्या कपड्यांमध्ये तिथे गेले होते. इतकेच नाही तर, कतारमधील अमेरिकन सेंट्रल कमांडचे माजी प्रमुख मायकल कुरिला यांच्यासोबत झालेल्या गुप्त बैठकांचे फोटोही हॅकर्सनी सार्वजनिक केले आहेत. याशिवाय, हालेवींच्या पत्नीचे ओळखपत्र आणि त्यांच्या खाजगी कौटुंबिक जीवनातील फोटो लीक झाल्याने ही केवळ सुरक्षा गळती नसून वैयक्तिक जीवनावरील मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे.
Pro-Iranian hacking group Handala claims it hacked former IDF chief Herzi Halevi’s phone, releasing alleged footage of classified meetings, maps, and personal data, including IDs, and Qatar talks, in an alleged breach.
Reporting by @JamesGenn https://t.co/m6EKzBvRHQ — The Jerusalem Post (@Jerusalem_Post) April 9, 2026
credit – social media and Twitter
इस्रायलची ‘मोसाद’ आणि सायबर युनिट ८२०० ही जगात सर्वोत्तम मानली जातात. मात्र, जर हॅकर्सचा हा दावा खरा ठरला, तर हा इस्रायलच्या इतिहासातील सर्वात मोठा सायबर पराभव मानला जाईल. हालेवी यांच्यासारख्या पदावर राहिलेल्या व्यक्तीचा फोन हॅक होणे म्हणजे देशाच्या रणनीतीची चावी शत्रूच्या हातात देण्यासारखे आहे. अद्याप आयडीएफ किंवा हालेवी यांच्याकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु इस्रायली लष्करी वर्तुळात मोठी अस्वस्थता पसरली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Geography: ‘दोन पर्वतरांगा, दोन वाळवंटे अन् दोन समुद्र’, इराणची सर्वात धोकादायक ‘शस्त्रे’; महासत्ता का थरथरते ‘या’ शक्तीसमोर?
इस्रायली नेतृत्वाला लक्ष्य करण्याची ‘हंदला’ गटाची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी माजी पंतप्रधान नफ्ताली बेनेट, माजी न्यायमंत्री आयलेट शकेड आणि पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या जवळच्या सहकाऱ्यांचे फोन हॅक केल्याचा दावा केला होता. सायबर युद्धाच्या या नव्या युगात इराण आता जमिनीवरील युद्धासोबतच डिजिटल प्लॅटफॉर्मवरही इस्रायलला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. हालेवी यांच्या फोनमधील माहिती जर खरोखरच इराणी गुप्तचर संस्थांपर्यंत पोहोचली असेल, तर आगामी काळात इस्रायलला आपल्या लष्करी रणनीतीमध्ये मोठे बदल करावे लागतील.
Ans: इराणशी संबंधित असलेल्या 'हंदला' (Handala) या हॅकर गटाने हर्झी हालेवी यांचा फोन हॅक केल्याचा दावा केला आहे.
Ans: हॅकर्सच्या दाव्यानुसार, १९,००० हून अधिक गोपनीय फोटो, व्हिडिओ आणि लष्करी रणनीतीशी संबंधित फाईल्स लीक झाल्या आहेत.
Ans: यामध्ये इस्रायलचे लष्करी नकाशे, कमांड सेंटर्सची माहिती आणि जॉर्डनच्या लष्करप्रमुखांसोबतच्या गुप्त भेटींचे पुरावे समाविष्ट आहेत.






