
PM नेतन्याहू म्हणाले, "आम्ही याआधी हल्ले थोड्या काळासाठी थांबवले आहेत. मला विश्वास आहे की आम्ही परिस्थितीची तपासणी करू आणि मानवतावादी मदत, आमच्या ओलीसांसाठी हालचाली सुलभ करू
इस्रायल-हमास युद्धाला (Israel Hamas War) आज एक महिना पूर्ण झाला असून, यादरम्यान इस्रायली लष्कराने हमासवर अनेक हल्ले केले. हल्ल्यांच हे सत्र पुर्णपणे थांबलेलं नाही आहे. इस्रायलच्या हल्ल्यात सुमारे 4,100 मुलांसह 10,000 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. हा सगळा विध्वंस पाहता यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी तात्काळ युद्धबंदीचे आवाहन केले.
‘हा युद्धविराम नाही’
7 ऑक्टोबरला पासून इस्रायल-हमास युद्ध सुरु आहे. हे युद्ध कधी थांबणार असा प्रश्न जगभरातुन विचारल् जात असताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, इस्रायल गाझा पट्टीतून मदत पुरवठ्याच्या प्रवेशासाठी किंवा अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी लढाईत थोडा विराम देईल. मात्र, आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता पुन्हा एकदा युद्धबंदीचे आवाहन फेटाळण्यात आले आहे.
काय म्हणाले नेतन्याहू
PM नेतन्याहू म्हणाले, “आम्ही याआधी हल्ले थोड्या काळासाठी थांबवले आहेत. मला विश्वास आहे की आम्ही परिस्थितीची तपासणी करू आणि मानवतावादी मदत, आमच्या ओलीसांसाठी हालचाली सुलभ करू, परंतु मला वाटत नाही की तेथे सामान्य युद्धविराम होणार आहे. .” जेव्हा संघर्ष संपेल तेव्हा गाझाच्या सुरक्षेची जबाबदारी घेऊ असे नेतान्याहू म्हणाले. “गाझामध्ये संपूर्ण सुरक्षा जबाबदारी इस्रायलकडे असेल, कारण आमच्याकडे ती सुरक्षा जबाबदारी नसताना काय होते ते आम्ही पाहिले आहे,” तो म्हणाला.
आतापर्यंत 4100 मुलांसह 10 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू
गाझा आरोग्य अधिकार्यांचे म्हणणे आहे की इस्रायली हल्ल्यात सुमारे 4,100 मुलांसह 10,000 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. इस्रायल आणि हमास या दोघांनीही लढाई थांबवण्याचे वाढते आवाहन नाकारले आहे. ओलिसांना आधी सोडण्यात यावे, असे इस्रायलचे म्हणणे आहे. हमासचे म्हणणे आहे की गाझावर हल्ले होत असताना ते ओलीस सोडणार नाहीत किंवा लढाई थांबवणार नाहीत.