Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराण युद्ध केवळ एक नाटक? Kamala Harris यांचा मध्यपूर्वेतील संघर्षावरुन खळबळजनक दावा, Trump यांच्यावर गंभीर आरोप

US Iran War : अमेरिका इराण युद्ध काही थांबवण्याचे नाव घेईना. दोन्ही देशांमध्ये सध्या होर्मुझवरुन वाद पेटला आहे. याच पार्श्वभूमीवर कमला हॅरिल यांनी खळबळजनक दावा केला आहे. यामुळे अमेरिकेच्या राजकारणात मोठा गोंधळ उडाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 19, 2026 | 04:47 PM
Kamala Harris on Donald Trump

Kamala Harris on Donald Trump

Follow Us
Follow Us:
  • कमला हॅरिस यांचा डोनाल्ड ट्रम्पवर थेट हल्लाबोल
  • इराण युद्धावरुन मोठा दावा
  • अमेरिकेच्या राजकारणात खळबळ
Kamala Harris on US Iran War : वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. याच दरम्यान अमेरिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. इराण युद्धावरुन हॅरिस यांनी मोठा दावा केला आहे.

Trump Malacca Strategy : ट्रम्प यांचा मलाक्कावरही डोळा? होर्मुझवरुन इराणशी तणावादरम्यान साधला मोठा डावा, इंडोनेशियासोबत मोठा करार

अंतर्गत अपयशापासून लक्ष भरकटवण्याची रणनीती

कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी आरोप केला आहे की, इराणसोबत छेडलेले युद्ध हे केवळ एपस्टीन फाइल्स आणि सरकारच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरुन जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी रचलेले षड्यंत्र आहे.  मिशिगनमधील एका कार्यक्रमात बोलताना हॅरिस यांनी म्हटले की, ट्रम्प प्रशासन ऑपरेशन एपिक फ्युरी यांसारख्या लष्करी कारवायांचा वापर सरकारच्या अंतर्गत अपयश आणि वादग्रस्त एपस्टीन फाइल्स लपवण्यासाठी करत आहेत. अमेरिकन जनतेला हे युद्ध नको आहे, परंतु ट्रम्प केवळ स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी देशाला संघर्षात ओढत असल्याचा दावा हॅरिस यांनी केला आहे.

नेतन्याहूंच्या इशाऱ्यावर नाचत आहेत ट्रम्प?

हॅरिस यांनी असाही आरोप केला की, हे युद्ध इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्या सांगण्यावरुन होत आहे. नेतन्याहूंनी ट्रम्प यांना या युद्धात ओढल्याचा दावा केला आहे. यामुळे जागतिक राजनैतिक संबंधात तणाव निर्माण झाला आहे. सध्या या युद्धामुळे जगासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिका एकटी पडत चालली असल्याचे हॅरिस यांनी म्हटले.

इतर गंभीर आरोप

त्यांनी ट्रम्प सरकारवर टीका करत इतिहासातील सर्वात भ्रष्ट आणि अयोग्य सरकार संबोधले. त्यांच्या मते, ट्रम्प आंतरराष्ट्रीय नियमांना, करारांना पायदळी तुडवत आहेत. यामुळे इतर देशांची अमेरिकरती विश्वासार्हता कमी होत आहे. हॅरिस यांच्या मते, ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला, आरोग्य सेवा आणि महिलांच्या अधिकारांनाही पायदळी तुडवले आहे. अमेरिकन नागरिकांचे लक्ष सध्याच्या महागाई आणि आरोग्याच्या समस्यावरुन हटवण्यासाठीच युद्ध सुरु असल्याचे त्यांनी म्हटले.

अमेरिका इराण वादाची सद्यस्थिती

सध्या अमेरिका इराणमध्ये स्ट्रेट ऑफ होर्मुझ(Strait of Hormuz)वरुन मोठा वाद पेटला आहे. युद्धविरामाच्या घोषणेनंतर इराणने होर्मुझचा मार्ग खुला केला होता. मात्र अमेरिकेने इराणी जहाजांची नाकेबंदी सुरुच ठेवल्याने हा मार्ग पुन्हा बंद झाला आहे. यामुळे जगावर महागाईचे संकट पुन्हा ओढावले आहे.

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! US Iran युद्धाआड चीनची मोठी खेळी; सुरु केली ‘ही’ गुप्त तयारी

Web Title: Kamala harris makes explosive claims on middle east conflict accuses trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Kamala Harris
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटप करारावरुन पुन्हा तणाव; भारताच्या ‘या’ निर्णयावर भडकला पाकिस्तान
1

Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटप करारावरुन पुन्हा तणाव; भारताच्या ‘या’ निर्णयावर भडकला पाकिस्तान

Sukhoi SJ 100: भारत आणि रशिया पुन्हा एकत्र! 200 सुपरजेट विमानांबाबत मोठा संकेत; विमान वाहतूक क्षेत्रात घडवू शकतो मोठे बदल
2

Sukhoi SJ 100: भारत आणि रशिया पुन्हा एकत्र! 200 सुपरजेट विमानांबाबत मोठा संकेत; विमान वाहतूक क्षेत्रात घडवू शकतो मोठे बदल

India Venezuela संबंधांना नवी दिशा; राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांची PM मोदींसोबत महत्त्वपूर्ण बैठक
3

India Venezuela संबंधांना नवी दिशा; राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांची PM मोदींसोबत महत्त्वपूर्ण बैठक

Abu Dhabi : मुस्लिम देशात वसलेल्या भारतीय संस्कृतीचा जगभर गौरव; अबू धाबीतील BAPS हिंदू मंदिराला ‘Global Tolerance Award 2026’
4

Abu Dhabi : मुस्लिम देशात वसलेल्या भारतीय संस्कृतीचा जगभर गौरव; अबू धाबीतील BAPS हिंदू मंदिराला ‘Global Tolerance Award 2026’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.